1. खाली काही वाक्ये दिली आहेत, ती कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडतात ते सांगा.
अ. दिल्लीत भरदिवसा धुके असल्याचे जाणवते.
उत्तर - हवा प्रदुषण
आ. पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा त्रास होतो.
उत्तर - पाणीप्रदुषण - अशुद्ध पाणी
इ. बरेचदा बगीच्यात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रास होतो.
उत्तर - हवा प्रदूषण
ई. काही भागांतील मातीत पिकांची वाढ होत नाही.
उत्तर - मृदाप्रदूषण
उ. जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना श्वसनाचे रोग, धाप लागणे असे त्रास होतात.
उत्तर - हवा प्रदूषण
2. परिच्छेद वाचून त्यात कोणकोणते प्रदूषणाचे विविध प्रकार आलेत व कोणत्या वाक्यात आलेत ते नोंदवा.
निलेश शहरी भागात राहणारा व इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा आहे. दररोज तो शाळेत बसने जातो, शाळेत जाण्यासाठी त्याला एक तास लागतो. शाळेत जाताना त्याला वाटेत अनेक चार चाकी, दोन चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्याला शहरापासून लांब राहण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाच्या गावाला पाठविले. निलेश जेंव्हा गावात रला तेंव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले, अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती, काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला.
उत्तर -
हवा प्रदूषण - शाळेत जाताना त्याला वाटेत अनेक चार चाकी, दोन चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते.
हवा प्रदूषण - अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती
जल प्रदूषण - छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले
3. 'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून प्रदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.
'अ'स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणी - अर्धांगवायू
2. मिथेन वायू - त्वचेचा कॅन्सर
3. शिसेमिश्रित पाणी - मतिमंदत्व
4. सल्फर डायऑकसाइड - डोळे चुरचुरणे
5. नायट्रोजन डायऑक्साइड - फुफ्फुसांवर सूज येणे
चूक की बरोबर ठरवा.
अ. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही.
उत्तर - चूक ( नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्याने ते पाणी प्रदूषित होते )
आ. विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितके प्रदूषण जास्त होते.
उत्तर - बरोबर ( वीजनिर्मितीसाठी कोळसा जा लागतो ज्यामुळे वायु प्रदुषण होते )
5. खालील प्रश्नांची उत्तरे दया,
अ. प्रदूषण व प्रदूषके म्हणजे काय ?
उत्तर -
नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या, अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर) घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात.
आ. आम्लपर्जन्य म्हणजे काय ?
उत्तर -
कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते. ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.
इ. हरितगृह परिणाम म्हणजे काय ?
उत्तर -
CO2 वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील शंभर वर्षांमध्ये औदयोगिकीकरणामुळे वातावरणामधील CO2 चे प्रमाण वाढले आहे. या CO2 चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम' होय.
ई. व अदृश्य प्रदूषके कोणती ?
उत्तर -
1) दृश्य प्रदूषके - जे प्रदूषणकारी पदार्थ डोळयांना सहज दिसून येतात. त्यांना आपण दृश्य प्रदूषके म्हणू शकतो. उदा. घनकचरा प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिक पिशव्या पाण्यात तरंगणारे पदार्थ, धातुच्या वस्तू इत्यादी,
2) अदृश्य प्रदूषके - जे प्रदूषके पाण्यात अथवा हवेत पूर्णपणे मिसळून जातात व ते आपल्याला दिसत नाही अशा प्रदूषकाना अदृश्य प्रदूषके म्हणतात
उदा. हवेत फवारलेली कीटकनाशके इत्यादी
4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
आ. वाहनांमुळे प्रदूषण कसे घडते ? कमीत कमी प्रदूषण ज्यामुळे घडते अशा काही वाहनांची नावे सांगा.
उत्तर -
1) पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू व गॅसोलिन यांसारख्या इंधनांच्या ज्वलनातून CO2 वायू बाहेर टाकता जातो.
2) सी एन जी वर चालणारी वाहने कमी प्रदूषण करतात.
इ. जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती ते लिहा.
उत्तर -
1. जलपर्णीची वाढ
-प्राणवायू कमी होतो.
- पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो.
2. कुजणारे पदार्थ
- प्राणी व वनस्पतीचे अवशेष सडणे व कुजणे इ. मुळे
3. गाळामुळे
- नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे
4. जमिनीची धूप
- जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यांसारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक, अजैविक घटक पाण्यात मिसळतात.
5. कवक
-पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रीय पदार्थांवर कवक व जीवाणूंची वाढ होते.
6. शैवाल
- जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते.
7. कृमी
-जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात.
ई. हवा प्रदूषणा वर कोणतेही चार प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.
उत्तर -
हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय
1. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात, हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदा. निरोधक यंत्रणा (Arresters), गाळणीयंत्र (Filters) यांचा वापर करावा.
2. शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.
3. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे.
4. CFC निर्मितीवर बंदी/बंधने आणावीत.
उ. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध स्पष्ट करा./परिणाम सांगा.
उत्तर -
CO2 वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील शंभर वर्षांमध्ये औदयोगिकीकरणामुळे वातावरणामधील CO2 चे प्रमाण वाढले आहे. या CO2 चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम' होय.
वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चालले आहे. यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे दिसून येत आहे.
7. खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा.
सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.
मानवनिर्मित - सांडपाणी, रासायनिक खते, वाहनांचा धूर, किटकनाशके
निसर्गनिर्मित - धूळ, परागकण, शैवाल, पशुपक्ष्यांची विष्ठा.
Hi
ReplyDelete