शेरास सव्वाशेर स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Sheras savvasher swadhyay iyatta tisari balbharati

 




प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा 


(१) नानाकाका आनंदाने का डोलत होते ?

उत्तर - वाऱ्यावर डोलणारे पिकलेल्या भाताचे पीक पाहिल्यामुळे नानाकाका आनंदाने डोलत होते.



(२) सर्वच उंदीर पिंपापासी का धावत आले ?

उत्तर - तळलेल्या भज्यांच्या खमंग वासामुळे सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले..



(३) झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते ?

उत्तर - झाडाच्या आडोशाला नानाकाका लपून बसले होते.



(४) फळीच्या पिंपावरच्या टोकाला नानाकाकांनी काय ठेवले? 

उत्तर - फळीच्या पिंपावरच्या टोकाला नानाकाकांनी तळलेली खमंग भजी ठेवली.



प्रश्न २. तर काय झाले असते?


(१) नानाकाकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर....

उत्तर - सर्व उंदीर पिंजऱ्यात अडकले असते.


(२) नानाकाकांच्या शेतात साप असते तर.....

उत्तर -  सापांनी उंदीर खाल्ले असते.


(३) नानाकाकांच्या शेतात उंदीर नसते तर.... 

उत्तर -  नानाकाकांच्या शेताची नासाडी झाली नसती.


(४) नानाकाकांच्या शेतात मांजर असते तर...

उत्तर - मांजराने उंदीर खाल्ले असते.




प्रश्न ३. पुढील शब्दांच्या सुरुवातीला 'अ' लावून नवीन शब्द तयार करा.


(१) धीर - अधीर

(२) शक्य - अशक्य 

(३) स्वस्थ - अस्वस्थ 

(४) प्रकाशित - अप्रकाशित



प्रश्न ३. पुढील शब्दांत लपलेले शब्द शोधा


(१) नासाडी - नाडी, साडी.

(२) कपाळावर - कर, पाक, पाव, पार, वर, रव, पावक, कपावर.



प्रश्न ४. पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.



(१) अधीर होणे.

वाक्य - गावातील यात्रा बघण्यासाठी श्रेयसीचे मन अधीर झाले. 


(२) फस्त करणे.

वाक्य - सौरभने सर्व लाडू फस्त केले.



(३) सामसूम होणे.

वाक्य - रात्री दहा नंतरच गावातील रस्ते  रस्ता सामसूम होतो.


(४) कूच करणे.

वाक्य - भारतीय सैनिकांनी सीमेकडे कूच केले.


(५) कपाळावर हात मारणे. 

वाक्य - लॉटरी न लागल्यामुळे चंदूने कपाळावर हात मारला.


(६) युक्ती सफल होणे.

वाक्य - दिशाची परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची युक्ती सफल झाली. 



प्रश्न ५. शेरास सव्वाशेर' यासारख्या शब्दसमूहांना 'म्हणी' म्हणतात. तुम्ही ऐकलेल्या वाचलेल्या अशा म्हणी सांगा. 


उत्तर - 


(१) कोल्ह्याला द्राक्षे आंबट  

(२) करावे तसे भरावे 

(३) जशास तसे 

(४) वरातीमागून घोडे

(५) चोरावर मोर 




Post a Comment

Previous Post Next Post