परीक्षा रद्द झाल्या तर विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही, कारण त्यामुळे कोणालाही अभ्यास करण्याची सक्ती नसेल, कोणत्याही विद्यार्थ्याला पालकांकडून परीक्षेत कमी मार्क्स का पडले याबद्दल बोलणी ऐकावी लागणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्याला कमीपणा वाटणार नाही की कोणाला जास्त मार्क्स आहेत तर मला कमी आहेत. काही विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावर जी भीती वाटते की नापास झालो तर काय होईल या भीतीने खूप तणावामध्ये जातात आणि काही जण चुकीचे पाऊल ही उचलतात ह्या गोष्टी पूर्णपणे बंद होतील, शिक्षकांना पेपर तपासात बसणे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले म्हणून शिक्षा करणे या गोष्टीतून सुटका होईल, विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवण्याच्या मागे न धावता आपल्या आवडीच्या विषयावर अभ्यास करता येईल.
पण याउलट जर विचार केला तर परीक्षा रद्द झाल्या तर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार नाही आणि मग नोकरीच्या ठिकाणी हुशार , अभ्यास न करणारी सर्व मुले सर्व मुलांची गर्दी होईल मग कोण किती योग्य आहे हे ठरवताचं येणार नाही मग अयोग्य व्यक्तीही उच्च पदावर जाऊन बसेल आणि त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील.
आज परीक्षांची खरी परिस्थिती बघता कळते की विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता चाचणी दूर राहून विद्यार्थ्यांमध्ये शर्यत लागली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे खरे महत्त्व कळलेले नाही. काही विद्यार्थी फक्त पहिला नंबर मिळवण्यासाठी अभ्यास करतात त्यांना त्या विषयात काहीही रस नसतो यामुळे शैक्षणिक क्षेत्र हे स्पर्धेचे मैदान बनत चालले आहे. कारण मला असे वाटते जर एखाद्या विषयात विद्यार्थ्याची आवड असेल तर तो त्याचे अजून जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करतो.पण परीक्षांमुळे विद्यार्थी बांधला गेला आहे.
पण परीक्षा घेण्यामागचा खरा हेतू आपल्याला विसरता येणार नाही. परीक्षा ह्या खरे पाहता विद्यार्थ्यांमधील योग्य बौद्धिक आणि त्याची विषयामध्ये असलेली पकड या दोन्ही गोष्टी तपासण्यासाठी होतात जेणेकरून पुढे जाऊन विशिष्ट क्षेत्रामध्ये तो नाव कमवतो.
परीक्षा रद्द झाल्या तर विद्यार्थ्यांची अभ्यासातून सुटका नक्कीच होईल पण जी व्यवस्था आज परीक्षा असल्यामुळे टिकून आहे ती नक्कीच विस्कळीत होईल हे लक्षात घेतले पाहिजे.
1st class very nice
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteDhanyawad
ReplyDeleteBest post
ReplyDeleteIt's such a good aap . So easy to find answer using it and best thing is that .....it's free
ReplyDelete