योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा.
अ. स्थायूच्या कणामध्ये आंतररेण्वीय बल........ असते.
(i) कमीत कमी
(ii) मध्यम
(iii) जास्तीत जास्त (iv) अनिश्चित
उत्तर - जास्तीत जास्त
आ. स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावरसुद्धा त्यांचे
आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला म्हणतात.
(i) आकार्यता
(ii) असंपीड्यता
(iii) प्रवाहिता (iv) स्थितिस्थापकता
उत्तर - स्थितिस्थापकता
इ. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना .....हा निकष लावला जातो.
(i) द्रव्याच्या अवस्था
(ii) द्रव्याच्या प्रावस्था
(iii) द्रव्याचे रासायनिक संघटन
(iv) यांपैकी सर्व
उत्तर - द्रव्याचे रासायनिक संघटन
ई. दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या
द्रव्याला म्हणतात.
(ii) संयुग
(iii) मूलद्रव्य
(iv) धातुसदृश
उत्तर - मिश्रण
उ. दूध हे द्रव्याच्या ह्या प्रकाराचे उदाहरण आहे.
(i) द्रावण
(ii) समांगी मिश्रण
(iii) विषमांगी मिश्रण
(iv) निलंबन
उत्तर - विषमांगी मिश्रण
ए. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण तीनही ...... आहेत.
(i) द्रवपदार्थ
(ii) संयुगे
(iii) अधातू
(iv) मूलद्रव्ये
उत्तर - द्रवपदार्थ
ए. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण तीनही आहेत.
(i) द्रवपदार्थ
(ii) संयुगे
(iii) अधातू
(iv) मूलद्रव्ये
ऐ. कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डाय ऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात रासायनिक बंध असतात.
(i) 1 (ii) 2 (iii) 3 (iv) 4
उत्तर - 2
2. गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया.
अ. सोने, चांदी, तांबे, पितळ
उत्तर -पितळ
आ. हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ
उत्तर -हायड्रोजन
इ. दूध, लिंबूरस, कार्बन, पोलाद ई. पाणी, पारा, ब्रोमीन, पेट्रोल
उत्तर -कार्बन
उ. साखर, मीठ, खाण्याचा सोडा, मोरचूद
उत्तर -साखर
ऊ. हायड्रोजन, सोडिअम, पोटॅशिअम, कार्बन
उत्तर - कार्बन
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड व पाणी यांच्यापासून ग्लूकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. या प्रक्रियेतील चार संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा.
उत्तर -
6CO (कार्बन डायऑक्साइड) + 6H₂O (पाणी)
सूर्यप्रकाश ------> क्लोरोफिल
C6H1206 (ग्लुकोज) + 6O2 (आक्सिजन)
आ. पितळ ह्या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले: तांबे (70%) व जस्त (30% ). यामध्ये द्रावक, द्राव्य व द्रावण कोण ते लिहा.
उत्तर -
पितळ या संमिश्रात तांबे (70%) व जस्त (30%) असते. सर्वाधिक प्रमाण द्रावणाचे असते. यात तांबे हे द्रावक आहे. द्रावकापेक्षा कमी प्रमाण असणारे जस्त हे द्राव्य आहे व पितळ हे द्रावण आहे.
इ. विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%, भूमध्य समुद्र : 3.8%, मृत समुद्र : 33.7%. या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर -
१) मिश्रणाच्या घटकांमध्ये कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही. (पाण्यातील क्षार प्रमाण).
2 ) मिश्रणातील घटक पदार्थ हे एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळलेले असतात.
3) भौतिक पद्धती मिश्रणातील घटक सहज वेगळे करता येतात.
4. प्रत्येकी दोन उदाहरणे दया.
अ. द्रवरूप मूलद्रव्य
उत्तर - पारा (Hg), ब्रोमीन (Br)
आ. वायुरूप मूलद्रव्य
उत्तर- हायड्रोजन (H2), ऑक्सिजन (O2).
इ. स्थायुरूप मूलद्रव्य
उत्तर - लोह (Fe), तांबे (Cu), चांदी (Ag).
ई. समांगी मिश्रण
उत्तर - समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद.
उ. कलिल
उत्तर - दूध, रक्त
ऊ. सेंद्रिय संयुग
उत्तर - ग्लुकोज, युरिआ
ए. जटिल संयुग
उत्तर - क्लोरोफिल, हिमोग्लोबिन
ऐ. असेंद्रिय संयुग
उत्तर - सोडा, गंज, चुनखडी
ओ. धातुसदृश
उत्तर - सिलिकॉन, अर्सेनिक
औ. संयुजा I असलेले मूलद्रव्य
उत्तर - सोडिअम (Na), पोटॅशिअम (K), क्लोरीन (Cl).
अं. संयुजा 2 असलेले मूलद्रव्य
उत्तर - मॅग्नेशियम (Mg) कॅल्शियम (Ca)
5. पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून त्या त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा.
KCI, HBr, MgBr, K, O, NaH, CaCl,, CCI, HI, HS, Na, S, FeS, BaCl,
1. KCI
(K) पोटॅशिअम व (Cl) क्लोरीन
K - 1 CI - 1
2. HBr
(H) हायड्रोजन (Br) ब्रोमीन
H - 1. Br - 1
3. MgBr,
(Mg) मॅग्नेशिअम (Br) ब्रोमीन
Mg - 2 Br - 1
4. K.O
(K) पोटॅशिअम (O) ऑक्सिजन
K- 1 O - 2
5. NaH
(Na) सोडिअम (H) हायड्रोजन
Na - 1 H - 1
6. CaCl
(Ca) कॅल्शिअम (Cl) क्लोरीन
Ca - 2. CI - 1
7. CCI4
(C)कार्बन (CI) क्लोरीन
C - 4 CI - 1
8. HI
(H) हायड्रोजन (I) आयोडीन
H - 1 I - 1
9. H₂S
(H) हायड्रोजन (S) सल्फर
H - 1 S - 2
10. Na2S
(Na) सोडिअम व (S) सल्फर
Na - 1 S - 2
11. FeS
(Fe)आयन (S) सल्फर
Fe - 2 S -2
12. BaCl
(Ba) बेरिअम व (Cl) क्लोरीन
Ba - 2 Cl - 1
7. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते.
उत्तर -
हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग बनलेले आहे. संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्य या पासून वेगळे असतात म्हणून पाणी जळत नाही किंवा ज्वलनाला मदत सुद्धा करीत नाही.
आ. कलिलाचे घटक पदार्थ गाळणक्रियेने वेगळे करता येत नाहीत.
उत्तर -
कलिलांचे कण गालन कागदातून सहजपणे आरपार होतात. कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे मोठी असतात. म्हणून कलिलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाहीत.
इ. लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते.
उत्तर -
लिंबू सरबत हे मिश्रण आहे. लिंबू रस, साखर, मीठ व पाणी यांपासून लिंबू सरबत तयार करतात. लिंबू सरबत बनवताना कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही. मिश्रणातील मूळ घटकांचे गुणधर्म बदलत नाहीत म्हणून लिंबू सरवताला गोड, आंबट व खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते.
ई. स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात.
उत्तर -
1) स्थायूमध्ये आंतररेण्वीय बल अतिशय प्रभावी असते.
2) त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठरावीक जागी स्पंद पावत राहतात. यामुळे स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात.
8. पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा.
उत्तर - CLICK
अ. C (संयुजा 4) व Cl (संयुजा 1)
आ. N (संयुजा 3) व H (संयुजा 1 )
इ. C (संयुजा 4) व O (संयुजा 2)
ई. Ca (संयुजा 2) व O (संयुजा 2)
द्रव्यांचा मुख्य प्रकार ओळखा.
उत्तर -
मिश्रण
संयुग
मूलद्रव्य
मिश्रण
संयुग
मूलद्रव्य
मूलद्रव्य
मिश्रण
मूलद्रव्य
संयुग
संयुग
मिश्रण

