तक्ता पूर्ण करा
धातूंचे गुणधर्म - दैनंदिन जीवनात उपयोग
उत्तर
(i) तन्यता - सोन्या चांदीचे दागिने
(ii) वर्धनीयता - अल्युमिनियम , गल्वनाइज्ड पत्रे
(iii) उष्णतेचे वहन - तांब्याची भांडी, स्टेनलेस स्टीलची भांडी
(iv) विदयुतवहन - तांब्याच्या तारा
(v) नादमयता - पितळाच्या वस्तू
गटात न बसणारा शब्द ओळखा.
अ. सोने, चांदी, लोह, हिरा
उत्तर - हिरा ( इतर सर्व धातू आहेत )
आ. तन्यता, ठिसूळता, नादमयता, वर्धनीयता
उत्तर - ठिसूळता ( इतर सर्व धातूंचे गुणधर्म आहेत )
इ. C, Br, S, P
उत्तर - Br ( इतर सर्व स्थायू आहेत )
ई. पितळ, कांस्य, लोखंड, पोलाद
उत्तर - लोखंड ( इतर सर्व संमिश्रे आहेत )
3. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो
उत्तर
१) तांब्याची ऊष्णता वाहण्याची क्षमता स्टेनलेस स्टीलच्या भांड्यापेक्षा चांगली असते
२) यामुळे अन्नपदार्थ शिजणे वगैरे अशा गोष्टींसाठी कमी वेळ लागतो
३) सोबतच इंधनाची बचत ही होते
आ. तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात ?
उत्तर
१) लिंबुच्या रसामध्ये आम्ल असते
२) तांब्याची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन कोपर ऑक्साईड तयार होते
३) कोपर ऑक्साईडची हवेतील कार्बन डायॉक्साईड सोबत क्रिया होऊन तांब्यावर कोपर कार्बोनेट चा हिरवा थर जमा होतो
३) लिंबूच्या रसात आम्ल असल्याने कोपर कार्बोनेट चा थर विरघळतो त्यामुळे तांबे व पितळाची भांडी स्वच्छ होतात
इ. सोडिअम धातूला केरोसीनमध्ये ठेवतात.
उत्तर
१) सोडियम हवेतील ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायॉक्साईड सोबत अभिक्रिया होत होऊन तो पेत घेतो
२) सोडियमची केरोसीन सोबत अभिक्रिया होत नाही म्हणून सोडिअम धातूला केरोसीनमध्ये ठेवतात.
4. खालील प्रश्नांची उत्तरे दया.
अ. धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल ?
उत्तर
१) लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते यामुळे धातूचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनीक अभिक्रिया न झाल्याने क्षरण होत नाही
२) तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो
३)धातूवर तेल, वारनिश, ग्रीस, रंगाचे थर दिले जातात,
आ. पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूंपासून बनलेली आहेत ?
उत्तर
१) पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनले आहे.
२) कांस्य हे संमिश्र तांबे व कथिल यांपासून बनले आहे.
इ. क्षरणांचे दुष्परिणाम कोणते ?
उत्तर
१) क्षरणामुळे चांदी, तांब्याच्या वस्तूंची चकाकी नाहीशी होते
२) लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो.
३)तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो.
४) चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो.
ई. राजधातूंचे उपयोग कोणते ?
उत्तर
१) सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो.
२) चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. (Antibacterial property)
३) सोन्या चांदीची पदकेही तयार करतात.
४)काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने ह्यांचा
उपयोग होतो.
5. प्लॅटिनम, पॅलेडिअम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक (Catalyst) म्हणून सुद्धा होतो.
खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षानळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे दया.
अ. परीक्षानळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही ?
उत्तर
तेलामुळे खिळ्याचा व पाण्याचा हवेशी संपर्क तुटतो म्हणून खिळ्यावर गंज चढत नाही
आ. परीक्षानळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल ?
उत्तर
पाणी व हवा यांच्या संपर्कात खिळा येत असल्याने ऑक्सीडिकरण होते
इ. परीक्षानळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का ?
उत्तर
कॅल्शिअम क्लोराइड हे ओलावा, दमटपणा झोपून घेते. त्यामुळे शुष्क हवा तयार होते व खिळ्यावरोल गंज रोखला जातो.
Super
ReplyDelete