मजेशीर होड्या स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Majeshir hodya swadhyay iyatta tisari balbharati

 




प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(१) ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले ?

उत्तर - बंडूच्या घराबाहेरच्या वेलीवरून चढून ठेंगू खिडकीच्या पट्टीवर पोहोचले.


(२) बंडू थक्क का झाला ?

उत्तर - ठेंगूला खिडकीत पाहिल्यामुळे बंडू थक्क झाला. 


(३) बंडूने कशाच्या होड्या बनवल्या?

उत्तर - बंडूने अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या बनवल्या.


(४) कोणते नवे लचांड निर्माण झालं?

उत्तर - चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो सोडवायला गेला तो त्याला चिकटला, असे नवे लचांड निर्माण झाले.


(५) जंगल सोडून ठेंगूंना कोठे राहायला जायचे होते ? 

उत्तर - जंगल सोडून ठेंगूना नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात राहायला जायचे होते.


(६) ठेंगूंना बंडूची माहिती कोणी दिली? 

उत्तर - टेंभूंना बंडूची माहिती एका सशाने दिली.


(७) ठेंगूची एकूण संख्या किती होती?

उत्तर - ठेंगूची एकूण संख्या अकरा होती. 


(८) बंडूने एकूण किती होड्या केल्या?

उत्तर - बंडूने एकूण बारा होड्या केल्या.


(९) बंडूने बारावी होडी कशासाठी केली ? 

उत्तर - बंडूने ठेंगूंचे सामान ठेवण्यासाठी बारावी होडी केली.


प्रश्न २. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा


(१) सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली ? 

उत्तर - एकदा जंगलाची जागा कुणीतरी विकत घेतली. तिथे कामगारांसाठी तात्पुरती घरे तयार झाली होती. म्हणून ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा सोडावी लागली.


(२) सशाने ठेंगूंना बंडूचे नाव का सुचवले?

उत्तर - बंडू खूप चांगला व दयाळू मुलगा होता. तो सर्वांना मदत करणारा होता. एकदा बंडूने सापळ्यात अडकलेल्या सशाला बाहेर काढले होते म्हणून सशाने डेंगूंना बंडूचे नाव सुचवले. 


(३) ठेंगू खुश का झाले?

उत्तर - ठेंगूना नदी पार करण्यासाठी बंडूने अक्रोडाच्या टरफलाच्या होड्या तयार केल्या. एकेका ठेंगूला बंडूने एकेका होडीत बसवले आणि होड्या पाण्यात सोडल्या. होड्या चांदण्याच्या प्रकाशात डौलाने पाण्यातून जाताना पाहून डेंगू खुश झाले.


प्रश्न ३. बंडूने तयार केलेल्या होडीची कृती सांगा. तुम्हीही तुमच्या मनाने अशी एखादी होडी तयार करा. 

उत्तर - बंडूने स्वयंपाकघरातून सहा अक्रोड घेतले. ते नीट मधोमध फोडले. आतील भाग ठेंगूना खायला दिला. एका डबीत वापरून झालेल्या काड्यापेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या, त्या काढल्या. न कागदाची शिडं करून ती काड्यांना टाचणीनं टोचली. गोंदानं शिडं डोलकाठीला म्हणजे आगकाडीला घट्ट चिकटवली. आणि होडी तयार झाली. ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते.



प्रश्न ४. गोष्टीतल्या कोणत्या गोष्टीचे तुम्हांला नवल वाटले? का?

उत्तर - बंडूने अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या तयार केल्या, शिवाय कागदाच्या शिडांना काड्यापेट्यांच्या डोलकाठ्या केल्यामुळे होड्या तयार झाल्या.



प्रश्न ६. गोष्टीला 'मजेशीर होड्या' असे नाव का दिले आहे?

उत्तर - ठेंगूना नदी ओलांडण्यासाठी बंडूने अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या केल्या. ही बंडूची मजेशीर कल्पना असल्यामूळे या पाठाला 'मजेशीर होड्या' असे नाव दिले 






Post a Comment

Previous Post Next Post