भूमी उपयोजन स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल Bhumi upayojan swadhyay std 8th geography

 



प्रश्न १. खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा.


(अ) खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही.

उत्तर - अयोग्य

दुरुस्त विधान : खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे.



(आ) केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात.

उत्तर - अयोग्य 

दुरुस्त विधान : केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने,बँका, कार्यालये असतात.


(इ) नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते.

उत्तर - योग्य



(ई) ग्रामसेवक सातबाराचा (७/१२ उतारा देतो.

उत्तर - अयोग्य

दुरुस्त विधान : तलाठी सातबाराचा (७/१२) उतारा देतो.


(3) ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते.

उत्तर - अयोग्य

दुरुस्त विधान : ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते.



(ऊ) उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्रक आहे.

उत्तर - योग्य



(ए) उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.

उत्तर - अयोग्य

दुरुस्त विधान : उतारा क्रमांक १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.




प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.


(अ) नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

उत्तर - लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यशासन किंवा केंद्रशासन करते या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदा., रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राऊंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवासुविधांमुळे शमला जातो.



(आ) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते.

उत्तर - बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगरभूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते. सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क, इत्यादी.



(इ) भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

उत्तर - 

(१) ज्या देशात शेतजमीन, माळरान इत्यादी प्रकारातील भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल, तर अशा देशाचा विकसनशील देशात समावेश होतो.

(२) ज्या देशात औदयोगिक क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजन सेवांचे क्षेत्र इत्यादी भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल, तर अशा देशाचा विकसित देशांत समावेश होतो.

 अशा प्रकारे, भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.



प्रश्न ३. उत्तरे लिहा.


(अ) ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते ? 

उत्तर - ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. ग्रामीण भागात जास्तीत जास्त जमीन ही शेतीसाठी वापरली जाते तसेच शेती मुळेच इतर उद्याग धंद्यांना कच्च्या मालाची पूर्तता होते,देशात अन्नधान्याच्या गरजा शेतीमुळे पूर्ण होतात. 

म्हणुन ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते.



(आ) भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा.

उत्तर - 





(इ) ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा.

उत्तर -

1) ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते तर नागरी भागात लोकसंख्या जास्त असते. व जमिनीची उपलब्धता मर्यादित असते. 

2) ग्रामीण भूमी उपाययोजन वर्गीकरण - शेतजमीन, पडीक जमीन, वन जमीन, गायरान/माळरान

3) नागरी भूमी उपयोजन - व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणे, मिश्र भूमी उपयोजन



(ई) सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यांतील फरक स्पष्ट करा.

उत्तर -  

१) सातबारा संदर्भातील नोंदणी महसूल खात्याकडे केली जाते. तर मिळकत पत्रिका नगर भूमापन विभागाकडून मिळते. 

२) सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. 

३) बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते.

11 Comments

  1. Hii,👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  2. Hii,👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  3. 88ej9iq8je8ii4jilwoishyebwjijwjwjuwojhehuiijquuhej7jjjeiiowojsuudjdjrjruikkeiuhryvceygv4riirjruienwbdbuduffabbrjkosdhn

    ReplyDelete
  4. Ramesh talbhandare

    ReplyDelete
  5. So beautiful, so elegant, just looking like a wow 😂😂😂

    ReplyDelete
  6. Thanks👍🏻👍🏻

    ReplyDelete
  7. Thanks👍🏻👍🏻

    ReplyDelete
  8. Wahat is mean by bhogol

    ReplyDelete
Previous Post Next Post