विश्वाचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Vishwache Antarang swadhyay std 6th General Science digest prashna uttare

 



प्रश्न १. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा 


 १) आपली आकाशगंगा ज्या इतर आकाशगंगांच्या समूहामध्ये आहे, त्या समूहाला.......म्हणतात.

उत्तर - स्थानिक दीर्घिका


२) धूमकेतू हे.......व.......पासून तयार झालेले असतात.

उत्तर - धूळ व बर्फ


३) हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो

उत्तर - युरेनस


४) हा वादळी ग्रह आहे.

उत्तर - गुरू


५) ध्रुव तारा ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे.

उत्तर - रूपविकारी


आम्हांला ओळखा 

उत्तर - 


(१) ताऱ्यांचे जन्मस्थान - प्रामुख्याने धूलिकण आणि वायू यांच्यापासून बनलेला तेजोमेघ.


(२) सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरू.


(३) आपल्या शेजारील आकाशगंगा - देवयानी.


(४) सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह - शुक्र.


(५) सर्वांत जास्त उपग्रह असणारा ग्रह - गुरू.


(६) आम्हांला एकही उपग्रह नाही - बुध व शुक्र.


(७) माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे - शुक्र.


 (८) मी शेपटी घेऊन वावरतो - धूमकेतू.





जोड्या जुळवा

उत्तर

(१) आकाशगंगा - सर्पिलाकार

(२) धूमकेतू - हॅले

(३) सूर्यसदृश तारा - व्याध

(४) शनी - ३३ उपग्रह

(५) शुक्र - पूर्वेकडून पश्चिमेकडे




चूक की बरोबर ओळखा .


१) शुक्र हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे.


उत्तर - चूक (बुध हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे.) 


२) बुध ग्रहाला 'वादळी ग्रह' म्हणतात. 


उत्तर - चूक (गुरू ग्रहाला 'वादळी ग्रह' म्हणतात.)


३) गुरू हा सर्वांत मोठा ग्रह आहे.

उत्तर - बरोबर.



खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय ? 

उत्तर -

हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा लालसर दिसतो, रंग म्हणून त्याला 'लाल ग्रह' असे ही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वांत उंच व लांब पर्वत 'ऑलिम्पस मॉन्स' हा आहे.



आ. दीर्घिकेचे प्रकार कोणते ?

उत्तर -

चक्राकार किंवा सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित- असे दीर्घिकांचे प्रमुख प्रकार आहेत.



इ. आकाशगंगेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो ?

उत्तर -

आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायुचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका 'देवयानी' या नावाने ओळखली जाते.



 ई. ताऱ्यांचे प्रकार कोणते ?

उत्तर 

सूर्यसदृश तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे.



उ. धूमकेतुंचे प्रकार कोणते? कशावरून?

उत्तर

धूमकेतुंचे वर्गीकरण दोन मुख्य प्रकारांमध्ये करण्यात येते.


दीर्घ मुदतीचे धूमकेतु - या धूमकेतुंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.


अल्प मुदतीचे धूमकेतु - या धूमकेतुंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो.



ऊ. धूमकेतुमध्ये काय काय असते ?

उत्तर 

धूमकेतु हे धूळ व बर्फ यांपासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा मुख्य प्रकारांमध्ये व एक घटक आहे.धूमकेतु गोठलेल्या द्रव्यांनी व धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतुतील द्रव्याचे वायूंत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध या धूमकेतुंना सूय दिशेस फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतु लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात.


ए. उल्का व अशनी यांमध्ये कोणता फरक आहे?

उत्तर 

लघुग्रहाच्या पट्ट्यातून पृथ्वीकडे येणाऱ्या शिलाखंडांना 'उल्का' किंवा 'अशनी' असे म्हणतात. यांपैकी छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात शिरताना उष्णतेने पूर्ण जळून जातात. त्यांना 'उल्का' म्हणतात. परंतु ज्या वेळी शिलाखंड न जळता, पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळतात, तेव्हा त्यांना 'अशनी' म्हणतात.


 ऐ. नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर

सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे ४१ वर्षांचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात.

Post a Comment

Previous Post Next Post