प्रश्न १.खालील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.
उत्तर - उत्तर चूक. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात.
(२) प्रेअरी प्रदेशाला 'जगातील गव्हाचे कोठार म्हणतात.
उत्तर - बरोबर
(३) भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते.
उत्तर - चूक - भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते, झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
(४) उष्ण वाळवंटी प्रदेशात 'उंट' हा महत्त्वाचा प्राणी आहे. कारण तो अन्नपाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच तो वाहतुकीसाठी उपयोगी आहे.
उत्तर - बरोबर
(५) वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशांत जास्त आढळतात.
उत्तर - चूक - बाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात.
२. भौगोलिक कारणे दया.
(१) मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.
उत्तर -
(१) मोसमी प्रदेशात नैर्ऋत्य मान्सून यान्यापासून ठरावीक ऋतूत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी २५० से २५०० मिमी पाऊस पडतो.
(२) या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २७° से ते ३२° से असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे १५ से ते २४° से असते. ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.
(२) विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात.
उत्तर -
(१) विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान २७ से व उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे ३० से असते
(२) या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो व पावसाचे प्रमाण हे सरासरी २५०० ते ३००० मिमी असते
(३) या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात. भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यांमुळे या प्रदेशातील वनस्पती झपाट्याने दाटीवाटीने वाढतात परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुवृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात.
(३) टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते.
उत्तर -
(१) टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २०° ते ३०° से असते. हवामानाची ही स्थिती वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक नसते.
(२) टुंड्रा प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे १०° से असते. या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे, गवत इत्यादी वनस्पती वाढतात. परंतु हिवाळ्यात या वनस्पती अतिशय थंड हवामानामुळे नष्ट होतात. त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते.
प्रश्न ३. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे?
उत्तर - तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे ५५ ते ६५° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे.
(२) सुदान प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे ?
उत्तर -
(अ) सुदान प्रदेशातील तीन तृणभक्षक प्राणी जिराफ, क्षेत्रा, कांगारू
(ब) स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली व्यवस्था सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता, तृणभक्षक प्राण्यांना त्यांच्या चपळ पायांनी मांसभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगात दूर पळणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करता येते.
(३) मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर -
स्थान व प्रदेश -
विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला १०° ते ३०° अक्षवृत्तांच्या दरम्यान.
• भारत, फिलिपाइन्स, वेस्टइंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी
हवामान -
• उन्हाळ्यातील तापमान २७° से. ते ३२° से.
• हिवाळ्यातील तापमान १५° से. ते २४° से.
• पाऊस २५० ते २५०० मिमी होतो.
• नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांपासून ठरावीक ऋतूंत पाऊस पडतो.
• पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते.
नैसर्गिक वनस्पती -
• पानझडी व निमसदाहरित वने. पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार. उदा., वड, पिंपळ, साग, शिसव, चंदन, खैर, सिंकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झाडे, झुडुपे व गवत.
प्राणि जीवन -
• वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकीळ इत्यादी वन्य प्राणी व पक्षी.
• गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हे पाळीव प्राणी.
मानवी जीवन -
• लहान-लहान असंख्य खेडी आहेत.
• अन्न व पोशाखात बरीच विविधता.
• लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते.
• शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.