खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यांतील संबंध व कारणे स्पष्ट करा.
उत्तर -
विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा-फर्टीमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते, वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे म्हणतात.
दरड कोसळण्याची कारणे
1. भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम म्हणून दरडी कोसळण्यासारखे प्रकार घडतात. 2. बेसुमार वृक्षतोडीमुळेही जमिनीची धूप होते.
3. डोंगराळ/घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड/खडक कोसळतात.
आ. भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा
उत्तर -
भूकंपाच्यावेळी तुम्ही घरामध्ये असाल, तर
भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता सैरावैरा न पळता, आहे त्याच जागी शांत उभे राहावे. जमिनीवर बसा, टेबल, पलंग कोणत्याही एखादया फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल, तर घराच्या एखादया कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा. चालत्या वाहनात असाल, किंवा घराबाहेर असाल, तर
सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनाच्या आत थांबा, बाहेर येण्याचे टाळा. इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका.
भूकंपाच्या वेळी हे करू नका.
1. बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नका. जिना वापरा. 2. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करा.
3. भूकंपानंतर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागू शकते. हे टाळण्यासाठी घरातील मेन स्वीच दक्षतापूर्वक बंद करा. अशा प्रसंगी मेणबत्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करू नका. बॅटरी / टॉर्चचा वापर करा.
इ. भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर -
जमिनीची ठराविक मर्यादेपर्यत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात. इमारतींच्या बांधकामांसाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत. आय एस. 456 प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी 'आय एस 1893 (भूकंपरोधक आरेखनांच्या संरचनांचे मानदंड) आणि आय एस 13920 (भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचनाचा ताणीय विस्तार) वापरले जातात. भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते.
भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी लेसर रेंजिग, व्हेरी लाँग, बेसलाईन, गायगर कौंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यांसारखी आधुनिक साधने वापरली जातात.
ई. दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा.
उत्तर -
दरड कोसळण्याचे परिणाम
१) नदयांना अचानक पूर येतात. नदयांचे मार्ग बदलतात.
२) धबधब्याचे स्थानांतरण होते. कृत्रिम जलाशय निर्माण होतात.
३) दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात. उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात. हे सर्व दगड-मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते.
४) वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळली की, वाहतूक विस्कळीत होते.
५) भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते.
उ. धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय ? तो स्पष्ट करा.
उत्तर
१) धरणात खूप जास्त प्रमाणात पाणी साठवलेले असते
यामुळे जमिनीवर वजन पडते.
आणि धरण जर अश्या ठिकाणी असेल जेथे वारंवार भूकंप होतो तर येथे धोका जास्त वाढतो .
शास्त्रीय कारणे दया.
अ. भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.
उत्तर -
१) भूकंपाच्या वेळी छप्पर, वर ठेवलेल्या वस्तू किंवा एखादी जड वस्तू आपल्या डोक्यावर पडू शकते म्हणून जर आपण पलंग , टेबल याखाली लपलो तर यापासून वाचू शकतो
२) म्हणुन भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.
आ. पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये.
उत्तर -
१) पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी भुस्लखन होण्याची शक्यता असते ज्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो
२) डोंगरावरील माती, खडके या आपल्या अंगावर येऊ शकतात.
इ. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये.
उत्तर
१) भूकंपाच्या वेळी आपण लिफ्टचा वापर केला आणि जर भूकंपाची तीव्रता जास्त असेल तर लिफ्ट ही कोसळू शकते किंवा वीजपुरवठा खंडित होऊन आपण त्यामध्ये अडकू शकतो
२) यामुळे भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते
ई. भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.
उत्तर
१)भूकंप रोधक इमारतींचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो. भिंतो कमी वजनाच्या किंवा लाकडाच्या असतात. जड सामानांनी बांधलेल्या घरांपेक्षा भूकंपरोधक इमारती वेगळ्या प्रकारच्या असतात.
• भूकंपानंतर मदतकार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील
उत्तर -
१) अनावश्यक गर्दीमुळे आपत्तिग्रस्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होईल.
२) गर्दीमुळे बचावकार्य मंदावेल.
👍👍👍👍🙏🙏🙏
ReplyDelete