आरोग्य व रोग स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Arogya va Rog swadhyay std 8th General Science digest prashna uttare

 







1. फरक स्पष्ट करा.


संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग

उत्तर


संसर्गजन्य


१) दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी) याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय.


२) हे रोग जिवाणू, विषाणू यांच्यामुळे उद्भवतात.


३) क्षयरोग, कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर, डेंग्यू, एड्स इत्यादी


असंसर्गजन्य रोग


१) पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशीसमूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यांसारख्या अवयवांत रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो.


२) अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा (फळे व पालेभाज्यांचा) समावेश नसणे, अति प्रमाणात जंकफूड (वडापाव, पिझ्झा, इत्यादी) खाणे. यांसारखी अनेक कारणे असू शकतात. अनुवांशिकता हेही एक कारण असू शकते.


३) कर्करोग, मधुमेह, हृदयविकार इत्यादि



2. वेगळा शब्द ओळखा.



अ. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू


उत्तर - कावीळ



आ. प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय 



उत्तर - एड्स




3. एक ते दोन वाक्यांत उत्तरे दया.


अ. संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते ?


उत्तर


१) दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी)




आ. असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हांला सांगता येतील ?


उत्तर -


१) दमा, संधिवात, मोतीबिंदू, हृदयरोग , अंधत्व, मानसिक रोग इत्यादि





इ. मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती ?


उत्तर -


मधुमेहाची करणे 


  १) अनुवंशिकता


  २) व्यायामाचा/कष्टाचा अभाव 

 

  ३) अतिलठ्ठपणा


   ४) मानसिक ताण 



हृदविकाराची कारणे -


धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता.



4. तर काय साध्य होईल /तर काय टाळता येईल / तर कोणत्या रोगांना आळा बसेल?



अ. पाणी उकळून व गाळून पिणे.


उत्तर -


१) पाणी उकल्यामुळे त्यातील जंतू नष्ट होतात ज्यामुळे ते पाणी पिऊन होणारे रोग धोका टाळता येतो 


२) अशुद्ध पाणी पिण्याने विविध रोग संभवतात जसे अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर 


३) म्हणून पाणी उकळून प्यावे




आ. धूम्रपान, मद्यपान न करणे. 


उत्तर -


१) धूम्रपान केल्यामुळे कर्करोग होऊ शकतो


२) मद्यपानाने यकृताचे विकार होतात 


३) म्हणून धूम्रपान, मद्यपान या दोन्ही गोष्टी मानवासाठी घातक ठरतात 




इ. नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे.


उत्तर -


१) संतुलित आहारामुळे आहारी पडण्याची शक्यता खूप कमी असते आपले शरीर सदृढ राहते


२) मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते.


३) व्यायामामुळे आपले शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते तसेच व्यायामामुळे शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो.







ई. रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली.


उत्तर -


१) प्रत्येक माणसाचा ठराविक रक्तगट असतो


२) हा रक्तगट जर जुळला नाही तर तर ज्या व्यक्तीला रक्त दिले जात आहे त्या व्यक्तीच्या शरीरात रक्त गोठून त्याचा मृत्यू होऊ शकतो.


२) तसेच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तवाटे हिपॅटायटीस B , एड्स अशा रोगांचे संक्रमण होऊ शकते.





5. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे दया.


"गौरव 3 वर्षांचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत (झोपडपट्टीत) राहतात. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मदयपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही."



अ. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात ?


उत्तर -


१) घराच्या जवळच सार्वजनिक शौचालय असल्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे.

२) गौरवाचे वडील मद्यपान करत  असतील तर  त्यांनाही यकृताचे आजार होण्याची शक्यता आहे

३) जर गौरवच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व माहीत नसेल तर यामुळे शरीराला योग्य पोषण न मिळाल्यामुळे रोगप्रतिकरकशक्ती कमी होऊन निरनिराळ्या रोगांचा सामना करावा लागेल


आ. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल ?


उत्तर 


१) त्याला व त्याच्या पालकांना संतुलित आहाराचा समावेश करण्याची माहिती देऊ शकतो जसे फळे, भाज्या , दूध ..


२) गौरवच्या वडिलांना  मद्यपान घातक असू शकते याबद्दल महिती देऊ शकतो.




इ. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे ?


उत्तर -

 

१) यकृताचे आजार, हृदयविकार तसेच किडनीचे आजार होण्याची शक्यता आहे. 






खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा.


अ. डेंग्यू

उत्तर 


१) हा रोग एडीस या डासाच्या चावण्यामुळे होतो 

२) यामुळे आपल्या सभोवताली पाणी साचून राहणे या गोष्टी टाळाव्यात जेणे करून डासांची पैदास होणार नाही.



आ. कर्करोग


उत्तर


१) तंबाखू, गुटखा, बिडी, सिगरेट या गोष्टींपासून दूर राहावे

२) आहारात फळे व पालेभाज्यांचा समावेश असावा.

३) अती जंकफूड खाणे टाळावे.


इ. एड्स

उत्तर

१) असुरक्षित लैंगिक संबंध हे एड्सचे मुख्य कारण आहे

२) रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला जर एड्स हा रोग असला तर त्या रक्तवाटे रक्त घेणाऱ्या माणसाला हा रोग होतो कारण रक्तद्वारे व्हायरस ट्रान्स्फर होतो.






महत्त्व स्पष्ट करा.


अ. संतुलित आहार 

उत्तर -

१) संतुलित आहारामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती आहे वाढते 

२) यामुळे आपले आजारी होण्याचे प्रमाण कमी होते 

३) शरीराला योग्य पोषण मिळते



आ. व्यायाम / योगासने

उत्तर -

१) व्यायामामुळे रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते 

२) शरीरात लवचिकता येते

३)अनेक प्रकारची योगासने आहेत ज्यांनी आपण शरीरातील आजार घालवू शकतो 





8. यादी करा.


अ. विषाणूजन्य रोग


उत्तर - रेबीज, पोलिओ, एड्स, कावीळ, एन्फ्लूएन्झा


आ. जीवाणूजन्य रोग


उत्तर - कॉलरा, क्षय, विषमज्वर, कुष्ठरोग


इ. कीटकांमार्फत पसरणारे रोग 


उत्तर - मलेरिया, डेंग्यू


ई. अनुवंशिकतेने येणारे रोग


उत्तर - मधुमेह, हिमोफिलिया, हृदयविकार





9. कर्करोगावरील आधुनिक निदान व वैदयकीय उपचार पद्धती विषयी माहिती लिहा.


उत्तर -


कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिशू डायग्नोसिस, सी.टी. स्कॅन, एम. आर. आय.स्कॅन, मॅमोग्राफी बायप्सी, इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो तर उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात.




3 Comments

Previous Post Next Post