रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा.
(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरुत्वाकर्षण, विभवांतर,
विभव, अधिक, कमी, 0V)
अ. धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते, याचे कारण .....
उत्तर - गुरुत्वाकर्षण
आ. एखादया परिपथात इलेक्ट्रॉन्स .......असलेल्या बिंदूपासून विभव विभव असलेल्या ......बिंदूकडे वाहतात.
उत्तर - कमी, अधिक
इ. विदयुतघटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विदयुत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे .........होय.
उत्तर - विभवांतर
ई. 1.5 V विभवांतराच्या 3 विदयुतघटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर........ V इतके असेल.
उत्तर - 4.5V
उ. एखादया विदयुतवाहक तारेतून जाणारी विदयुतधारा तारेभोवती ..... निर्माण करते.
उत्तर - चुंबकत्व
2. 3 कोरड्या विदयुतघटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे. तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा.
4. एका विद्युतपरिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत दोन समान विभवांतराचे घट बसविले आहेत. जर बल्ब प्रकाशित होत नसेल, तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल ?
उत्तर -
१) बल्बमधील कुंतल अखंड आहे की तुटलेले आहे हे तपासा.
२) विद्युत घटाची रचना खालील प्रमाणे आहे का ते तपासा
4. प्रत्येकी 2 V विभवांतराचे विद्युतघट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत. दोन्ही जोडण्यांत बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल ?
उत्तर -
(i) 2 V + 2 V + 2 V + = 6 V
(ii) 2 V + 2 V + 2 V + 2 V = 8 V
5. कोरड्या विदयुतघटाची रचना, कार्य व उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या साहाय्याने करा.
उत्तर -
एक निकामी झालेला कोरडा विदयुतघट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा. त्याच्या आत एक पांढरट धातूचे आवरण
या विदयुतघटात ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते. म्हणून मोठा विदयुतप्रवाह यातून मिळवता येत नाही. द्रवपदार्थांचा वापर करणाऱ्या विदयुतघटांच्या तुलनेत त्यांची साठवण कालमर्यादा (shelf life) अधिक असते. कोरडे विदयुतघट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे, आडवे, तिरपे, कसेही ठेवता येतात व चल साधनांमध्येही सहजपणे वापरता येतात.
6. विदयुतघंटेची रचना व कार्य आकृतीच्या साहाय्याने वर्णन करा.
उत्तर -
दारावरची साधी विदयुतघंटा अनेकांनी पाहिली असेल. एखादी बंद पडलेली अशी घंटा खोलून पहा. आकृती मध्ये विद्युतघंटेचे बाह्य आवरण काढलेले आहे. आपल्याला दिसते आहे की त्यात विदयुतचुंबकही आहे. ह्या घंटेचे कार्य कसे चालते ते पाहूया. तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विदयुतचुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विदयुतचुंबकाजवळ बसवलेली असते. ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. विदयुत परिपथ आकृती मध्ये दाखविल्याप्रमाणे जोडलेला असतो. स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विदयुतप्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विदयुतचुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विदयुतप्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विदयुतचुंबकाचे चुंबकत्व नाहिसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विदयुतप्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खणाणते.