बल व दाब स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Bal Va Dab Swadhyay std 8th General Science digest prashna uttare

 





रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 


अ. SI पद्धतीत बलाचे एकक हे आहे.


(डाईन, न्यूटन, ज्यूल)


उत्तर - न्यूटन



आ. आपल्या शरीरावर हवेचा दाब.......दाबा इतका असतो 


(वातावरणीय, समुद्राच्या तळावरील, अंतराळातील) 


उत्तर - वातावरणीय




इ. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या द्रवात

प्लावक बल ..............असते.

(एकसारखे, घनतेच्या, भिन्न, क्षेत्रफळाच्या) 


उत्तर - घनतेच्या



ई. दाबाचे SI पद्धतीतील एकक आहे.


(N/m^3, N/m^2, kg/m^2 ,Pa/m^2)


उत्तर - N/m^2



2. सांगा पाहू माझा जोडीदार !




'अ' गट




1. द्रायू - सर्व दिशांना सारखा दाब


2. धार नसलेली सुरी - कमी दाब 


3. अणकुचीदार सुई - जास्त दाब

 

4. सापेक्ष घनता - विशिष्ट गुरुत्व   

 

5. हेक्टोपास्कल - वातावरणीय दाब

 



3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.



अ. पाण्याखाली प्लॅस्टिकचा ठोकळा सोडून दिला. तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल ? कारण लिहा.


उत्तर - 


१) प्लॅस्टिकचा ठोकळा पाण्यात बुडेल की पाण्यावर तरंगेल हे प्लास्टिकच्या ठोकळ्याचे वजन वा त्यावर कार्य करणारे प्लावक बल यावर अवलंबून असते.

२) प्लास्टिकच्या ठोकळ्याचे वजन प्लावक बला पेक्षा जास्त असला तर तो ठोकळा बुडेल

३) प्लास्टिकच्या ठोकळ्याचे वजन प्लावक बला पेक्षा कमी असले तर तो ठोकळा तरंगेल


आ. माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते ? 


उत्तर -


 बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो. अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त असल्याने रस्त्याच्या संपकांत येणारे चाकांच्या भागांचे क्षेत्रफळ वाढते. यामुळे दाब कमी होतो व टायर फुटत नाहीत.



इ. आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो ? तो आपल्याला का जाणवत नाही ?


उत्तर -


     आपल्या डोक्यावर हवेचा भार सुमारे 101 x 10^3 Pa इतका असतो. वातावरणाचा दाब सतत डोक्यावर बाळगत असतो. परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्येही हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते व त्यातील दाब वातावरणीय दाबाइतकाच असतो. त्यामुळे पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही, वातावरणाचा दाब संतुलित होतो.


असे का घडते ?


अ. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते.


उत्तर - 


१) समुद्राच्या पाण्याची घनता गोड्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते

२) यामुळे जहाजावर प्रयुक्त होणारे प्लावक बल कमी असते


आ. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात.


उत्तर -


१) क्षेत्रफळ जितके कमी तितके बल जास्त असते

२) आणि चाकू हा धारदार असल्यामुळे बल कमी क्षेत्रफळावर कार्य करते.

३) यामुळे धारदार चाकूने फळ सहज कापता येतात






इ. धरणाची भिंत तळाशी रुंद असते.


उत्तर - 


१) धरणातील पाण्याचा दाब वराच्यापेक्षा तळाशी जास्त असतो. 

२) या दाबामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ नये 

३) म्हणून धरणाची भिंत तळाशी रुंद असते.



ई. थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात.


उत्तर -


१) जडत्वाच्या गुणधर्मानुसार जेव्हा अचानक बस वेग घेते तेव्हा प्रवास्याचे शरीर आपली मूळ दिशा काय ठेवण्याचा प्रयत्न करते

२) यामुळे थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात.



* खालील सारणी पूर्ण करा.








* एका धातूची घनता 10.8x10 kg/m आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा. (उत्तर: 10.8) 

 

उत्तर -


धातूची सापेक्ष घनता 


= धातूची घनता / पाण्याची घनता


= 10.8 × 10^3 kg/m^3 ÷ 10^3 kg/m^3



धातूची सापेक्ष घनता = 10.8 kg/m^3



* एका वस्तूचे आकारमान 20 cm आणि वस्तुमान 50g आहे. पाण्याची घनता 1gcm3 तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल ? (उत्तर : बुडेल)


उत्तर -


दिलेले :- पाण्याची घनता = 1g/cm^3



ठोकळ्याची घनता 


 = 200 ÷ 50


= 4 g/cm^3



ठोकळ्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने तो पाण्यात बुडेल





एका 500g वस्तुमानाच्या, प्लॅस्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 cm इतके आहे. पाण्याची घनता 1gcm3 असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल ? खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल ? (उत्तर : बुडेल, 350g)



उत्तर -


खोक्याची घनता


 = 500 ÷ 350


= 10/7 g/cm^3



खिक्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने ते खोके पाण्यात बुडेल


खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान 


= खोक्याचे वस्तूमान × पाण्याची घनता


= 350 cm^3 × 1 g/cm^3

  

= 350g






Click here to join

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप फॉर रेगुलर अपडेट

3 Comments

  1. बहुत खूब. आपको मेरी शुभकामनाये और भी विद्यार्थियों को साया करे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद

    ReplyDelete
Previous Post Next Post