पावसाळ्यातील एक दिवस - प्रसंगलेखन मराठी निबंध Pavasalyatil ek divas Prasanglekhan Marathi Nibandh

 




           पावसाळा हा ऋतू खूप जणांना आवडतो. आणि या ऋतूमध्ये पहिल्या पावसाचा आनंद खूप जण घेतात. मी ज्या दिवसाचे वर्णन करणार आहे तो ही पावसाळ्याचा पहिला दिवसच होता.

         दुपारची वेळ होती रविवार होता म्हणून शाळेला सुट्टी होती आणि बाबांनाही आज कामाला सुट्टी होती, आई किचनमध्ये कामात व्यस्त होती, मी सुद्धा अभ्यास करत बसलो होतो. आज सकाळ पासून वातावरण ढगाळ होते उन थोड्या वेळासाठी यायचे आणि पुन्हा ढगांमध्ये झाकले जायचे लांबवर नजर टाकली तर काळेकुट्ट ढग दिसायचे आणि सौम्य थंड हवा सारखी जाणवत होती यावरून कोठेतरी मुसळधार पाऊस पडतोय याची जाणीव होत होती.

      मला मित्रांसोबत क्रिकेट खेळायला मैदानावर जायचे होते पण आज भरपूर अभ्यास असल्यामुळे मी गेलो नव्हतो आईने आवाज दिला की जेवण तयार झाले आहे जेवण झाल्यावर सगळे टीव्ही बघु लागले आणि मी अभ्यासात व्यस्त झालो अभ्यास करता करता कधी चार वाजले मला कळले नाही आणि मी अभ्यास पूर्ण करून उठलो आणि घराच्या दरात उभा राहिलो वातावरण पूर्ण ढगाळ झाले होते भर चार वाजता अंधार झाला होता आभाळात काळे कीट ढग दिसत होते सोबत ढगांचा गडगडाट ही होत होता आणि थेंब थेंब पाण्याची सुरुवात झाली थंड हवेची झुळूक अंगाला घासू लागली मन प्रसन्न करणारा मातीचा सुगंध नाकात दरवळू लागला मला पावसाळा हा ऋतू आवडत नाही पण पाऊस पडताना जो मातीचा सुगंध येतो तो मला फार आवडतो. 

        मी दारातच उभा असल्यामुळे मला सगळे दृश्य दिसत होते हळू हळू कॉलनीमधील लहान मुले घराच्या बाहेर येऊ लागली आणि पहिल्या पावसाचा आनंद घेऊ लागले त्यांनी तर अंगावरील शर्ट ही काढून टाकली पाऊस अजून वाढला नव्हता शांतच होता पण जमीन पूर्णपणे भिजली होती लहान मुळे आनंदाने नाचत होती त्या मुलांना पाहून मला पण पावसात भिजण्याची इच्छा होऊ लागली पण भिजणे मला आवडत नव्हते त्यामुळे मी एका जागी उभा राहून त्यांना पाहू लागलो एकीकडे वातावरणात एक प्रसन्नता होती. तर बाहेरून येणारी काही लोक लगबगीने घराकडे धाव घेत होती अचानक पाऊस चालू झाल्यामुळे ही धावपळ चालू होती पहिलाच पाऊस असल्यामुळे कोणालाच अंदाज नव्हता पावसाचा वेग आता हळू हळू वाढत होता रस्त्यावरील घाण कॉलनीमधील पावसाच्या पाण्यासोबत वाहत होती. पप्पांनी आईला चहा बनविण्यास सांगितली ते ही आद्रक टाकून हे ऐकून मला फार आनंद झाला मला थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा प्यायला फार आवडते. चहा तयार झाला मी चहाचा कप हातात घेऊन दरात उभा राहिलो आणि चहा पिता पिता बाहेरील दृश्य बघू लागलो हळू हळू पावसाने वेग पकडला जी मुले पावसात भिजत होती त्यांच्या आईंनी त्यांना आता घरात बोलावण्यास सुरुवात केली. पाहता पाहता रस्ता रिकामा झाला ढगांचा गडगडाट सोबत विजा चमकू लागल्या आणि जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वारा आमच्या घराच्या विरुद्ध दिशेने वाहत होता त्यामुळे मी दारात उभा राहून पाऊस बघु शकत होतो पण आईने मला दार बंद करण्यास सांगितले मी दार बंद केले बाबांनी टीव्हीवर बातम्या सुरु केल्या. "पुणे शहरात पावसाची हजेरी" अश्या हेडलाईन्स दिसत होत्या तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातही जोरदार पाऊस पडत होता. 

             बघता बघता रात्र झाली आणि रात्रीचे जेवण झाले पाऊस अजूनही चालूच होता पावसाच्या आवाजातच आम्ही झोपी गेलो सकाळी आईने उठविले तेव्हा पाऊस बंद झाला होता आणि स्वच्छ सूर्यप्रकाश खिडकीतून येत होता.

2 Comments

Previous Post Next Post