युग संगणकाचे मराठी निबंध वैचारिक निबंध Yug sanganakache marathi nibandh vaicharik nibandh

     



      संगणक आजच्या आधुनिक युगाचा आत्मा आहे, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आज जी अद्भुत प्रगती झाली आहे त्यामध्ये संगणकाचा मोठा वाटा आहे. 

      आजच्या काळात संगणकाशिवाय अनेक कामे अपूर्ण आहेत. संगणकामध्ये उपलब्ध असणारे सॉफ्टवेअर जसे Ms-office, Ms-exel, PowerPoint इत्यादी विविध प्रकारचे सॉफ्टवेअर आज मोठ्या प्रमाणावर  माहिती स्टोअर करण्यासाठी वापरली जातात जसे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची यादी त्यांची फीस बद्दलची यादी तसेच शाळांमधील ऑनलाईन पद्धतीने शिकवले जाणारे शिक्षण, खाजगी कार्यालयांमध्ये कंपनीच्या रोजच्या उलाढालींची सर्व माहिती ही संगणाकामध्ये स्टोअर असते, आयटी  क्षेत्र हे पूर्णपणे संगणकावर अवलंबून आहे ,तसेच सरकारी कार्यालयांतही सरकारी कामकाजाशी निगडित सर्व फाईल्स ह्या आता हार्डकॉपी नसून सॉफ्टकॉपी मध्ये कन्व्हर्ट होऊ लागल्या आहेत. बँकांमधील कारभारही ऑनलाइन पद्धतीवर अवलंबून आहे. संगणकाद्वारे आपण इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या अनेक कामे पूर्ण करतो जसे ऑनलाईन रिचार्ज, लाईटबिल , पानीबिल भरणे तसेच ईमेल, व्हॉट्सॲप मेसेंजर्स च्या माध्यमातून आपण दूरवर असलेल्या माणसासोबतही फाईल्स ची देवाणघेवाण करू शकतो. फोटोग्राफी क्षेत्रातील फोटो एडिटिंग वर अनेक जणांचा रोजगार आहे , चित्रपट क्षेत्रातील व्हिडिओ एडिटिंग संगणकाशिवाय शक्य नाही अश्या अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात आहेत ज्या आपण कल्पना देखील करू शकत नाही. 

           पण संगणकाचे जसे फायदे आपल्याला माहिती आहेत  तसे तोटेही आहेतच जसे ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या पैशांच्या देवाण घेवानिमध्ये अनेक गुन्हे होत असून सायबर क्राईम मध्ये वाढ झाली आहे. सामान्य लोकांना पैशांचे आमिष दाखवून लूट होत आहे , तसेच ऑनलाईन माध्यमांमधून शॉपिंग करणे हे सामान्य व्यापाऱ्यांना तोट्याची गोष्ट आहे कारण आज काल ऑनलाईन शॉपिंग इतकी वाढली आहे की त्यामुळे कोणी दुकानात जाण्याचा विचार करतच नाही ग्राहकांना घरबसल्या वस्तूंच्या किमती मध्ये सुट मिळत असल्यामुळे ते ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. लहान मुले संगणकावर तासनतास गेम खेळतात , मुविज बघतात ज्यामुळे त्यांच्या मनावर वाईट परिणाम होत आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण हे काही मुलांना योग्य वाटते तर काही मुलांना ते अवघड जाते 

           वरील सर्व गोष्टी पाहता संगणकाचे फायदे आणि तोटेही आहेत पण आपण सर्वांनी संगणकाचा सदुपयोग करायला हवा लहान मुलांवर पालकांनी योग्य नजर ठेवून त्यांना संगणकाच्या आहारी न जाऊ देता त्यांना आवश्यक तितकाच वापर करू द्यायला हवा. तसेच संगणकाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकिंपासून वाचण्यासाठी सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यायला हवी जर आपण सर्वांनी संगणकाचा योग्य वापर केला तर आपण खूप प्रगती करू शकतो.वरील सर्व गोष्टी पाहता आजचे युग संगणकाचे आहे हे मान्य करावे लागेल .





1 Comments

Previous Post Next Post