१. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्ट
करा.
उत्तर -
वनस्पती | प्राणी |
---|---|
१) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकत नाही. | १) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकतात |
२) वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. | २) प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही ते अन्नाच्या शोधात असतात. |
३) वनस्पतींची वाढ पूर्ण आयुष्य होत राहते | ३) प्राण्यांची वाढ ही एका विशिष्ट वयापर्यंत सीमित असते. |
४) वनस्पतींची श्वसनक्रिया पानांवर असलेल्या सूक्ष्म छिद्रांद्वारे होते. | ४) प्राण्यांच्या श्वसनक्रियांसाठी विशिष्ट अवयव असतात. |
५) वनस्पती कार्बन डायॉक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात | ५) प्राणी ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. |
६) वनस्पती बिया, देठ याद्वारे निर्माण होतात | ६) प्राण्यांमध्ये प्रजनानाद्वरे प्राणी जन्म घेतात. |
आ. वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट
करा.
उत्तर - १) वनस्पती आणि प्राणी हे सजीव आहेतं
२) वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये पेशी रचना असते.
३) वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये श्वसनक्रिया, वाढ, उत्सर्जन,
या सर्व गोष्टी होतात.
४) वनस्पती आणि प्राणी दोघांना जगण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे.
इ. वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे?
उत्तर - १) वनस्पती पासून आपल्याला फळ, फुले,लाकूड इत्यादी गोष्टी मिळतात
२) वनस्पतींच्या औषधी गुणधर्मामुळे त्यांचा अनेक रोगांच्या निदानासाठी उपयोग होतो.
३) वनस्पती मानवाला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन पुरवतात
ई. प्राणी सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे?
उत्तर - १) कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. जसे कुत्रा घराची राखण करतो, गाय आणि म्हैस दूध देतात.
२) मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. मेंढी पासून लोकर मिळते.
३) घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. घोडा वाहतुकीसाठी, बैल शेतिकामासाठी आणि उंट वाळवंटातील वाहतुकीसाठी उत्तम असतात.
उ. सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत ?
उत्तर १) सजीवांमध्ये चेतना असते ज्याने ते सभोवतालच्या गोष्टींना अनुभवू शकतात. निर्जीवांमध्ये चेतना नसते.
२) सजीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकतात निर्जीव हालचाल करू शकत नाही.
३) सजीव श्वसनक्रिया करतात. त्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते निर्जीव गोष्टींना अन्नाची गरज नसते.
४) सजीवांमध्ये प्रजाननामुळे जीव जन्माला येतात तर निर्जीव गोष्टीमध्ये प्रजनन होत नाही.
कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो ?
अ. मासा - कल्ले
आ. साप - नाक व फुफ्फुस
इ. करकोचा - फुफ्फुस
ई. गांडूळ - त्वचा
उ. मानव - नाक व फुफ्फुस
ऊ. वडाचे झाड - पानावरील सूक्ष्म छिद्रे
ए. अळी - अंगावरील लहान छिद्रे
३. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
अ. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला........ म्हणतात.
उत्तर - प्रकाश संश्लेषन
आ. शरीरात .......वायू घेणे व ........ वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात.
उत्तर - ऑक्सिजन , कार्बनडायऑक्साइड
इ. शरीरातील निरूपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे.......होय.
उत्तर - उत्सर्जन
घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला.......... म्हणतात
उत्तर - चेतना क्षमता
उ. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव ..पावतो.
उत्तर - मृत्यू
४. प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा.
प्राणी: मधमाशी, शार्क मासा, याक, मेंढी, गांडूळ, कुत्रा, शिंपले, घोडा, उंदीर,
१) मधमाशी -
* मध
* औषधी गुणधर्म - निरोगी त्वचा,
२) शार्क -
* अन्न म्हणून खाल्ले जाते
* शार्क लीवर ऑईल हे कॅन्सर च्या निदानात उपयोगी
३) याक -
* प्रोटीनयुक्त दूध मिळते
४) मेंढी -
* लोकर मिळते
५) गांडूळ -
* शेतातील माती लुसलुशीत करतो
* विघटन
६) कुत्रा
* पाळीव प्राणी
* पोलिसांना गुन्हेगार शोधासाठी उपयोगी
७) शिंपले -
* मोत्याचे उत्पादन
८) घोडा -
* वाहतुकीसाठी उपयोग
९) उंदीर -
* नवीन औषध निर्मितीच्या वेळेस प्रथम प्रयोग उंदरांवर केला जातो
वनस्पती आले, आंबा, निलगिरी, बाभूळ, साग,पालक, कोरफड, हळद, तुळस, करंज, मोह, तुती, द्राक्ष
१) आले -
* जेवणामध्ये वापरतात
* औषधी गुणधर्म
२) आंबा -
* फळ म्हणून उपयोगी
३) निलगिरी -
* सुगंधी द्रव्ये
* औषधी गुणधर्म
४) बाभूळ -
* टूथपेस्ट मध्ये उपयोग
*औषधी गुणधर्म
५) साग -
* सुतारकामात उपयोगी
६) पालक -
* जेवणामध्ये
७) कोरफड -
* औषधी गुणधर्म
८) हळद -
* जेवण
* औषधी गुणधर्म
९) तुळस -
* अध्यात्मिक गोष्टीमध्ये उपयोग
* औषधी गुणधर्म
१०) करंज -
* त्वचा
* औषधी गुणधर्म
११) मोह -
* औषधी गुणधर्म
१२) तुती -
* फळ
१३) द्राक्ष -
* फळ
* दारू बनविणे
यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ?
१) साप - सरपटणारा प्राणी
२)कासव - संथ गतीने चालणे
३)कांगारू - दोन पायाच्या आधाराने उड्या मारणे
४)गरुड - उंच आकाशात उडणे
५)सरडा- चार पायांचा प्राणी
६)बेडूक- बेडूक उड्या मारणे
७)गुलमोहर- प्रकाशाच्या दिशेने वाढ
८)रताळ्याचा वेल- जमिनीवर किंवा एखाद्या वस्तूच्या आधारावर वाढ
९)डॉल्फिन- पोहणे
१०)मुंगी- चालणे
११)रॅटल साप- सरपटने
१२)नाकतोडा- उडणे,चालणे
१३)गांडूळ- सरपटणे
६. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कसे आहेत. याविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर - उपयुक्त वनस्पती - १) घरगुती तसेच औदयोगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात.
२)जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो.
उपयुक्त प्राणी -
१) प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात.
२) कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात.
३) मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात,
४) घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
अपायकारक प्राणी -
१) डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात.
२) उवा, गोचिड यांमुळे अनेक रोग पसरतात
३) विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो.
४) जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात.
अपायकारक वनस्पती -
१)खाजकुइलीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते.
२)कण्हेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोतरा ही वनस्पती विषारी आहे.
३) कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली, की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतात.