प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) रमाईंना कोणी लिहायला-वाचायला शिकवले ?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईना लिहायला-वाचायला शिकवले.
(आ) डॉ. आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते ?
उत्तर - डॉ. आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते.
(इ) रमाईंचे संपूर्ण जीवन कसे गेले ?
उत्तर - स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व दीन-दलित समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी रमाईंनी संपूर्ण जीवन झिजवले.
(ई) बाबासाहेबांनी वसतिगृहे का काढली ?
उत्तर - पददलितांचे स्वावलंबन, स्वाभिमान व आत्मोद्धारासाठी बाबासाहेबांनी वसतिगृहे काढली.
(उ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो.
(ऊ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला ?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन-दलित समाजासाठी त्यांना मानसन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला.
प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार' का म्हणतात ?
उत्तर - भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असे म्हणतात.
(आ) रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले ?
उत्तर - क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या. त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले.
प्र. ३. कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्ये लिहा.
( वणंद गाव, आई व बहुजनांच्या, कारुण्याची, गरिबीची)
(अ) रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील..... येथे झाला.
उत्तर - वणंद गाव
(आ) रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत.........होती.
उत्तर - गरिबीची
(इ) रमाईंना..... मूर्ती संबोधले जाते.
उत्तर - कारुण्याची
(ई) रमाई दीन-दलितांच्या..... व .......सावली झाल्या.
उत्तर - आई व बहुजनांच्या
प्र. ४. खालील वाक्प्रचार असलेली पाठातील वाक्ये शोधा व पुन्हा लिहा.
(अ) खंत न बाळगणे - खूप दुःखे वाट्याला आली, तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही.
(आ) हुरळून जाणे - प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले, तर त्या हुरळूनही गेल्या नाहीत.
(इ) न डगमगणे - त्यांच्यासमोर संकटांचे डोंगर उभे होते, तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत.
(ई) भारावून जाणे - रमाईंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली.
प्र. ५. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
(अ) अन्याय x न्याय
(आ) अपमान x सन्मान
(इ) दुर्लक्ष x लक्ष
रिकाम्या चौकोनात योग्य अक्षरे लिहून योग्य शब्द तयार करा.
१. कारल्याची चव - कडू
२. चहा पिण्यासाठी वापरतात - कप
३. गव्हाचे पीठ - कणीक
४. पदार्थ तळतात ते भांडे - कढई
५. लाकूड कापण्याचे एक हत्यार - करवत
Thank you to learn my examination coming 😅😘
ReplyDelete👍👍👍
DeleteThanks
ReplyDelete