प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा
१) लीलाला कसली हौस होती ?
उत्तर : लीलाला खोड्या करण्याची हौस होती.
(२) लीलाला काय खायचे होते ?
उत्तर : लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता.
(३) नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती ?
उत्तर : नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती.
(४) आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता ?
उत्तर : आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेढ्यांचा डबा ठेवला होता.
(५) पेढा घेऊन लीला कोठे गेली ?
उत्तर: पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली.
प्रश्न ३. कोण, कोणाला म्हणाले ?
१) "नको बुडवू शाळा."
उत्तर - "नको बुडवू शाळा." असे लीलाची ताई लीलाला म्हणाली.
२) 'काय खाऊ आणलास?"
उत्तर - 'काय खाऊ आणलास?" असे लीला भोलामामांना म्हणाली.
३) "तू बदामी पेढे नदीत टाकलेस!"
उत्तर - "तू बदामी पेढे नदीत टाकलेस!" असे आई नीलाला म्हणाली.
४) 'काय गं लीला, नदी तुझ्याशी बोलते ?"
उत्तर - 'काय गं लीला, नदी तुझ्याशी बोलते ?" असे लीलाची आजी (माई) लीलाला म्हणाली.
५) आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय!"
उत्तर - आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय!" असे आजी (माई) स्वतःशीच म्हणाली.
प्रश्न २. पुढील शब्दांचे अनेकवचन करा.
(१) डबा डबे
(२) बैल - बैल
(३) नदी - नदया
(४) डोळा डोळे
(५) दिवस दिवस
(६) पेढा - पेढे
प्रश्न ३. दोन अक्षरी शब्द 'गळा', तीन शब्द- घोटाळा , चार अक्षरी शब्द- 'चळाचळा' यांसारखे शेवटी 'ळा' हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा.
अक्षरी शब्द घोटाळा', चार अक्षरी
उत्तर :
(१) दोन अक्षरी शब्द- मळा, काळा, निळा, गोळा.
(२) तीन अक्षरी शब्द- सावळा, कावळा, कंटाळा, पिवळा.
(३) चार अक्षरी शब्द- चळाचळा, खुळखुळा, कळवळा, घननिळा.
शब्दार्थ -
* वावर - शेत शिवार
* बिनधास्त - बेफिकीर, कसलीही काळजी न करता.
* शिंकाळे - छताला टांगलेले दोरीचे जाळे यात दही, दुधाची भांडी ठेवतात.
* बुट्टी - बांबूची टोपली.
* परस - घरामागची मोकळी जागा.