संख्याज्ञान स्वाध्याय इयत्ता पाचवी गणित sankhya dnyan udaharansangrah 2 iyatta pachavi




1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 या अंकांचा वापर करून दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा व वाचा.


दोन अंकी : 


10 - दहा


21 - एकवीस


32 - बत्तीस


43 - त्रेचाळीस 


54 - चोपन्न


65 - पासष्ट


76 - शहात्तर


87 - सत्याऐंशी

 

98 - अठ्याण्णव


18 - अठरा



तीन अंक :


321 - तीनशे एकवीस

 

432 - चारशे बत्तीस


786 - सातशे शहाऐंशी

 

823 - आठशे तेवीस


912 - नवशे बारा


510 - पाचशे दहा


613 - सहाशे तेरा


143 - एकशे त्रेचाळीस


257 - दोनशे सत्तावन्न




चार अंकी :


1010 - एक हजार दहा


2129 - दोन हजार एकशे एकोणतीस 


3238 - तीन हजार दोनशे अडतीस

  

4347 - चार हजार तीनशे सत्तेचाळीस

 

5456 - पाच हजार चारशे छपन्न


6566 - सहा हजार पाचशे सहासष्ट

  

7645 - सात हजार सहाशे पंचेचाळीस

  

8463 - आठ हजार चारशे त्रेसष्ट


9164 - नऊ हजार एकशे चौसष्ट


2200 - दोन हजार दोनशे



 

पाच अंकी : 


19089 - एकोणीस हजार एकोनेंशी एकोणनव्वद


28170 - अठ्ठावीस हजार एकशे सत्तर


38464 - अडतीस हजार चारशे चौसष्ट

 

42654 - बेचाळीस हजार सहाशे चोपन्न


51946 - एकावन्न हजार नवशे शेहचाळीस


64515 - चौसष्ट हजार पाचशे पंधरा


71659 - एकाहत्तर हजार सहाशे एकोणसाठ


86455 - शहाऐंशी हजार चारशे पंचावन्न


94578 - चौऱ्याण्णव हजार पाचशे अट्ठ्याहत्तर


19040 - एकोणावीस हजार चाळीस




2. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरांत लिहा.






१) २,३५९ - 2359 - दोन हजार तीनशे एकोणसाठ

२) ३२,७५६ - 32756 - बत्तीस हजार सातशे छपन्न

३) ६७,८५९ - 67859 - सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ

४) १,०३४ - 1034 - एक हजार चौतीस 

५) २७,८९५ - 27895 - सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव


3.  'प्लॅस्टिकचा वापर टाळा' या योजनेअंतर्गत जिल्हापरिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजीविक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा.


कोपरगाव - 12740

उत्तर - बारा हजार सातशे चाळीस


शेवगाव - 28095

उत्तर - अठ्ठावीस हजार पंच्याण्णव


कर्जत - 31608

उत्तर - एकतीस हजार सहाशे आठ


संगमनेर - 10972

उत्तर - दहा हजार नवशे बहात्तर



4. एकूण किती रुपये होतील ते लिहा.


(1) 1 हजार रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा

उत्तर -

एक हजार रुपयांच्या वीस नोटा - 

     1000 × 20 = 20000

शंभर रुपयांच्या पाच नोटा - 

     100 × 5 = 500

दहा रुपयांच्या चौदा नोटा

       10 × 14 = 140 


20000 + 500 + 140 = 20640

वीस हजार सहाशे चाळीस



(2) 1 हजार रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 12 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा व रुपयाची 5 नाणी.


 1 हजार रुपयांच्या 15 नोटा = 15000

 100 रुपयांच्या 12 नोटा = 1200

10 रुपयांच्या 8 नोटा व रुपयाची 5 नाणी 

 = 80 + 5 

 =85


15000 + 1200 + 85 = 16285

सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी



5. 4,5,03,7 हे अंक एकेकदा वापरून सर्वांत मोठी व सर्वांत लहान पाच अंकी संख्या लिहा.

 उत्तर  -

सर्वात मोठी संख्या - 75430

सर्वात लहान संख्या - 30457




6. गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.






(1) सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते ? त्याची लोकसंख्या किती ? 

उत्तर - वाशी 92,173



(2) मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे ?

उत्तर - मोरेगाव - 87012


(3) सर्वांत कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते ? त्याची लोकसंख्या किती ? 

उत्तर - गगनबावडा 35,777


Post a Comment

Previous Post Next Post