प्रश्न. न. १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
(१) हवा प्रसरण पावली, की
(अ) घन होते.
(इ) विरळ होते.
(आ) नाहीशी होते.
(ई) दमट होते.
उत्तर - विरळ होते.
(२) वारे हवेच्या जास्त दाबाकडून
अ) आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात.
(आ) थंड हवेच्या दाबाकडे वाहतात.
इ) हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.
ई) आहे तेथेच राहतात.
उत्तर - हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.
(३) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे
(अ) दक्षिणेकडे वळतात.
(आ) पूर्वेकडे वळतात.
(इ) पश्चिमेकडे वळतात.
(ई) उत्तरेकडे वळतात.
उत्तर - पश्चिमेकडे वळतात
(४) भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात
(अ) आग्नेयेकडून वायव्येकडे असते.
(आ) नैऋत्येकडून ईशान्येकडे असते.
(इ) ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.
(ई) वायव्येकडून आग्नेयेकडे असते.
उत्तर - ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.
(५) 'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात...
(अ) विषुववृत्ताकडे वाहतात.
(आ) ४०° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.
(इ) ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात.
(ई) ४०° उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात.
उत्तर - ४०° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.
२. खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा.
(१) नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात.
उत्तर - नैऋत्य मोसमी वारे
(२) उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून ६०° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते.
उत्तर - ध्रुवीय वारे
(३) डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगरपायथ्याशी दरीखोऱ्यांत हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते.
उत्तर - दरिय वारे
प्रश्न ३. पुढे हवेचा दाब क्रमवार मिलिबारमध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा.
९९०, ९९४, ९९६, १०००.
उत्तर -
१०३०, १०२०, १०१०, १०००.
उत्तर -
प्रश्न ४. एकच भौगोलिक कारण लिहा.
(१) विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.
उत्तर - विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे ५° अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत; म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा (Doldrums) असे म्हणतात.
(२) उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.
उत्तर - दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. | दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंचसखलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात.
(३) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून, तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.
उत्तर -
1)उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त असतो. त्यामुळे परिवल उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात.
२) हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने कमी असतो त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
(४) वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
उत्तर - पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिजासमांतर दिशेने होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, तेथे वारे मंद गतीने वाहतात. . सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल, तेथे वारे वेगाने वाहतात.
प्रश्न ६. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवेचा दाब जास्त का असतो ?
उत्तर - ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवेचा दाब जास्त असतो.
(२) पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो ?
उत्तर - संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो.
(३) आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात ?
उत्तर -एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात.
यामुळे आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात.
(४) आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा.
उत्तर - आवर्त वाऱ्याची कारणे - एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात.
आवर्त वाऱ्याचे परीणाम - आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचे प्रभावक्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते.
प्रश्न ५. पुढील ओघतक पूर्ण करा.
सतीश
ReplyDeleteHigif
ReplyDelete