प्रश्न १ . कारणे दया.
(१) हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.
उत्तर -
हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते, तसे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.
(२) हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते.
उत्तर -
सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धांदरम्यान बदलत जाते; त्यामुळे तापमानपट्टे व त्यांवर अवलंबून असलेल्या दाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो. हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात ५° ते ७° उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात ५° ते ७° दक्षिणेकडे असा असतो. यालाच हवादाबपट्ट्यांचे आंदोलन (Oscillation of pressure belts) म्हणून ओळखले जाते.
प्रश्न २. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो ?
उत्तर -
तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो.
(२) उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो ?
उत्तर -
पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिक दृष्ट्या वक्राकार आहे. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते. या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
प्रश्न ३. टिपा लिहा.
(१) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे
उत्तर -
विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते, उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते. जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धांत २५° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी, उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते; त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.
(२) हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण
उत्तर -
पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिजसमांतर दशेत वायुदाब सारखा नसतो. वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो. हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिजसमांतर वितरण म्हणतात.
प्रश्न ४. गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(१) हवा उंच गेल्यावर .....होते.
(दाट, विरळ, उष्ण, दमट)
उत्तर - विरळ
(२) हवेचा दाब ......या परिमाणात सांगतात.
(मिलिबार, मिलीमीटर, मिलिलिटर, मिलिग्रॅम)
उत्तर - मिलिबार
(३) पृथ्वीवर हवेचा दाब .........आहे.
( समान, असमान, जास्त, कमी)
उत्तर - असमान
(४) ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान दाबाचा पट्टा आहे.
(विषुववृत्तीय कमी, धुव्रीय जास्त, उपधुव्रीय कमी, मध्य अक्षवृत्तीय जास्त)
उत्तर - विषुववृत्तीय कमी
प्रश्न ५. ३०° अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो ? तो भाग वाळवंटी का असतो?
उत्तर -
विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते, उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते. जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धांत २५° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी, उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते; त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.
प्रश्न ६. हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे दया.
उत्तर -