सजीवांतील पोषण स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा चौथा Sajivantil poshan swadhyay dhada chautha prashna uttare

 




1. अन्नप्रकारांनुसार वर्गीकरण करा.

वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कवके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ, गोचीड.

उत्तर - 

* शाकाहारी प्राणी - गाय, हरीण, म्हैस, शेळी

* मांसाहारी प्राणी - वाघ, सिंह, बेडूक 

* मिश्राहारी प्राणी - चिमणी, मानव, झुरळ

* स्वच्छताकर्मी - गिधाड

* विघटक - मृतोपजीवी - जिवाणू, कवके 

        परजीवी - गोचीड





2. योग्य जोड्या जुळवा.

'अ' गट


1. परजीवी वनस्पती - अमरवेल

2. कीटकभक्षी वनस्पती - ड्रॉसेरा

3. मृतोपजीवी वनस्पती - भूछत्र

4. सहजीवी वनस्पती - दगडफूल



3. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 


अ. सजीवांना पोषणाची गरज का असते ?

उत्तर

पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.

पोषणाची गरज

1. काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा

2. शरीराची वाढ व विकास करणे.

3. पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे.

4. शरीराला रोगांपासून वाचवणे.



आ. वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. 

उत्तर - 

वनस्पती स्वत:चे अन्न स्वतः कसे तयार करतात ? वनस्पतींनासुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषकतत्त्वे व हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य (Chlorophyll) व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला 'प्रकाशसंश्लेषण' (Photosynthesis) म्हणतात.

वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात.



इ. परपोषी वनस्पती म्हणजे काय ? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा.

उत्तर -

ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी (Parasitic) वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ, बांडगूळ, अमरवेल इत्यादी.


हरितद्रव्ये नसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतींवरच अवलंबून असते, म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात.


कीटकभक्षी वनस्पती (Insectivorous plants) - 

 काही वनस्पती कीटकभक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवतात, या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात.

 उदा. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखादया फुलासारखी असते.


मृतोपजीवी वनस्पती - 

सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात.

कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत. या मृत अवशेषांवर पाचकरस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषकद्रव्ये मिळवतात.



ई. प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे / पायऱ्या स्पष्ट करा.

उत्तर -

1. अन्नग्रहण (Ingestion) - अन्न शरीरात घेणे.

2. पचन (Digestion) - अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे यास 'अन्नपचन' असे म्हणतात. 

3. शोषण (Absorption) - पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे.

4. सात्मीकरण (Assimilation) - शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जानिर्मिती केली जाणे.

5. उत्सर्जन (Egestion) - पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्नघटक शरीराबाहेर टाकले जातात.




उ. एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते ?

उत्तर -

पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमीबा, युग्लीना आणि पॅरामेशिअम, हे सारे एकपेशीय सजीव आहेत.








4. कारणे लिहा.


अ. कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. 

उत्तर - कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वत:कडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो.



आ. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

उत्तर - कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. याचा वापर करून ते अन्नग्रहण करते.




5. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषणपद्धतीनुसार 'ओघतक्ता तयार करा.

उत्तर - 





6. विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे दया.


अ. आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो,म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का ? 

उत्तर - आपण जे वेगवेगळे अन्नपदार्थ घरी तयार करतो ते आपल्याला निसर्गाकडून प्राप्त होते जसे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी यांसाठी आपण या पिकांवर अवलंबून आहोत म्हणजेच आपण स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही 

म्हणून आपण स्वयंपोषी नाही



आ. स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते ? का

उत्तर - स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते. कारण या 

स्वयंपोषी सजीवांवरच अनेक परपोषी जीव जगत असतात. जर स्वयंपोषी सजीवांची संख्या कमी झाली तर परपोषी जीव सुद्धा नष्ट होतील. म्हणून अन्नसाखळीमध्ये स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते



इ. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का?

उत्तर -  

१) वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील कमी संख्येने असतात. त्यामुळे अवलंबून राहणारे परपोषी कमी असतात. 

२) समुद्रात खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती-प्लवक नावाचे तरंगणारे जीव असतात. 

३) त्यांच्यावर आणि प्राणी प्लवकांवर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते.


 म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात.



ई. हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही ?


उत्तर - हिरव्या भागांत हरितद्रव्य असते. हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश-संश्लेषण होते. त्यातून अन्ननिर्मिती होते. म्हणून हिरव्या भागांव्यातिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.





उ. बाह्य परजीवी व अंतः परजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते ?


उत्तर - 

इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे भन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्यपरजीवी पोषण असे म्हणतात. जसे , डास, उवा, चीड, ढेकूण. यांमुळे मलेरिया, डेंग्यू यांसारखे रोग होऊ शकतात.


पट्टकृमी, गोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला अंतःपरजीवी पोषण असे म्हणतात. 

हे परजीवी शरीरात राहत असल्यामूळे अनेक प्रकारचे रोग निर्माण करू शकतात





Post a Comment

Previous Post Next Post