रक्षाबंधन निबंध मराठी rakshabandhan nibandh in marathi

 




                  रक्षाबंधन भाऊ व बहीण यांच्या प्रेमळ नात्याचे प्रतीक असणारा सण आहे. या दिवशी बहीण भावाला हाताच्या मनगटावर राखी बांधते व त्याला त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते तसेच भाऊसुद्धा बहिणीला तिची रक्षा करण्याचे वचन देतो. 

                रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात येतो. आपल्या भारतात रक्षाबंधन या सणाचे खूप महत्त्व आहे. बहीण भावाला जी राखी बांधते तो फक्त एक धागा नसून पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते. 

                या दिवशी भाऊ बहीण नवीन कपडे घालतात बहिणीने आपल्या लाडक्या भावासाठी राखी निवडलेली असते व भाऊही स्वतःच्या स्व खर्चाला मिळालेल्या पैशातून तिला भेटवस्तू घेऊन देतो.

               काही शाळांमध्येही हा सण साजरा होतो तसेच काही बहिणींचे भाऊ त्यांच्या पासून दूर राहत असतात पण तरीही ते न चुकता त्यांना राखी पोस्टाद्वारे का असेना पण पाठवतात या मुळे भावावरील बहिणीचे निश्चल प्रेम व्यक्त होते.  

              भावा बहिणीचे नाते मुळात खूप सुंदर असते त्यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी खूप असतात पण यामुळे त्यांचे एकमेकांवरील प्रेम कमी होत नाही.

              प्रत्येक बहीण जी आपल्या भावावर प्रेम करते ती मनापासून रक्षाबंधनाचा वाट पाहते आणि भाऊही बहिणीसाठी भेटवस्तू देण्यास उत्सुक असतो.

             भावा बहिणीच्या  मधील या निस्वार्थ प्रेमाला एक ओळख देणारा हा सण आहे 














रक्षाबंधन वर निबंध 

Rakshabandhan varil Marathi nibandh

रक्षाबंधन वरील निबंध 

रक्षाबंधन विषयी माहिती 

Rakshabandhan vishayi mahiti 

Rakshabandhan nibandh marathi madhye 

Rakshabandhan Marathi nibandh

रक्षाबंधन मराठी निबंध




Post a Comment

Previous Post Next Post