अन्नपदार्थाची सुरक्षा स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान Annapadarthachi suraksha Swadhyay iyatta satavi samanya vidnyan

 





1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.


(किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक)


अ. शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला .......असे म्हणतात.


उत्तर - निर्जलीकरण



आ. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला......... असे म्हणतात.


उत्तर - पाश्चरीकरण



इ. मीठ हे...... आहे.


उत्तर - नैसर्गिक परिरक्षक 




इ. व्हिनेगर हे......आहे.


उत्तर - रासायनिक परिरक्षक




2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.



अ. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात ? 

उत्तर - दूध 80° सेल्सिअसला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते.



आ. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?

उत्तर - काही भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.



इ. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात ?

उत्तर - पाठ्यपुस्तक क्रमांक ३६ 


ई. अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते ?

उत्तर - अन्नपदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यांमध्ये बदल होणे व त्यांतील पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्नबिघाड होय. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते. जसे, अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ, उदा., दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते.



उ. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल ?

उत्तर - पाठ्यपुस्तक क्रमांक ३६



3. काय करावे बरे ?


अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.

उत्तर - उपड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये. त्यावर हमखास माश्या बसलेल्या असतात, असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्नसुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे.



आ. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. 

उत्तर -  अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरुक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची त्याला करून दयावी. आपण अशा ठिकाणी खाणे टाळावे.




इ. बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.

उत्तर - बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत, व्यवस्थित धुवून कोरडी करावीत. त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रिज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत नीट झाकून ठेवावीत.




ई. उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.

उत्तर - अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जिथे उंदीर व झुरळे फिरकणार नाहीत अशी उंचावरील जागा निवडावी. फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील.




4. आमच्यातील वेगळा कोण हे शोधा.


अ. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, बेन्झोएट. सोडिअम

उत्तर - मीठ



आ. लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल यलो, हळद पावडर.

उत्तर - हळद पावडर



इ. केळी, सफरचंद, पेरू, बदाम.

उत्तर - बदाम



ई. साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे.

उत्तर - साठवणे





5. खालील तक्ता पूर्ण करा.



पदार्थ   =   भेसळ


1. हळद पावडर - मेटॅनिल यलो


2. मिरी - पपईच्या बिया


3. रवा - लोहकीस 


4. मध - गुळाचे पाणी





6. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.


अ. गुणात्मक अन्ननासाडी होत आहे. 

उत्तर - अन्नरक्षण करताना अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, तसेच द्राक्षे, आंबे यांची अयोग्य हाताळणी इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात.

उपाय -या वरील गोष्टी टाळल्या तर गुणात्मक अन्न नासाडी होणार नाही


आ. शिजवलेला भात कच्चा लागत आहे.

उत्तर - भात शिजवताना पुरेसे पाणी त्यात घातलेले नसेल, तर भात कच्चा राहतो. 

उपाय - अशा भाताला पुन्हा वाफ काढावी आणि तो खावा. फेकून देऊ नये.




इ. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. 

उत्तर - बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते...

उपाय - गहू उन्हात वाळत घालावा. अशा प्रकारे तीन-चार वेळा उन्हात वाळवल्यावर कोरड्या, हवाबंद डब्यात भरून ठेवावा.



ई. दह्याची चव आंबट / कडवट लागत आहे.

उत्तर - दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल, तर दही आंबट किंवा कडवट लागते. कधी कधी जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दहयाची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते.

उपाय - कडवट दही टाकूनच दयावे लागते. आंबट दह्याचे ताक करून किंवा साखर घालून वापरता येते.





उ. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.

उत्तर - कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते काळे पडते. 

उपाय - कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावला तरी हे काळे पडण्याचे प्रमाण कमी होते.







7. कारणे लिहा.


1. 5° सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.

उत्तर - कमी तापमानाला अन्नपदार्थांतील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो त्यामुळे  अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठीच घरातील शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) उपयोग करतात.




2. सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.

उत्तर - बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण-खाणे प्लेटमध्ये घ्यायचे असते. यामुळे अन्नाचा अपव्यय होत नाही. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी होते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.





Post a Comment

Previous Post Next Post