भौतिक राशींचे मापन स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान Bhautik rashinche mapan Swadhyay iyatta satavi samanya vidnyan

 





1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते ?

उत्तर - पृथ्वी एखाद्या वस्तूला गुरुत्वाकर्षणाने आकर्षित करते. एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. प्रत्येक ग्रहावरील गुरुत्वाकर्षण वेग वेगळे असते.  यामुळे प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे भरते.



आ. दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल ?

उत्तर - 

(1) कोणतेही मापन करतांना योग्य साधने वापरावीत. (2) या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करावा.

(3) आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरीत्या मोजल्या आहेत की नाहीत याची खात्री करावी.

(4) दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात, त्याच्यावर प्रमाणित असल्याचा छाप आहे की नाही, तराजू आणि त्याचा काटा स्थिर आहे की नाही, तराजूच्या पारड्यांची खालची बाजू कशी आहे या सर्व बाबी प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहिल्या पाहिजेत. (5) वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्यांच्याऐवजी एखादा दगड वापरला जातो हे लक्षात घेतले पाहिजे.



इ. वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे ? 

उत्तर - 


वस्तुमान


1. पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात.

2. वस्तुमान ही अदिश राशी आहे.

3. वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते.


 वजन 

 

1. वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्या स्तूचे वजन असे म्हणतात. 

2. वजन ही सदिश राशी आहे.

3. वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगळे असते.




2. सांगा लावू मी कोणाशी जोडी ?


'अ' गट



1. वेग - मीटर/सेकंद


2. क्षेत्रफळ - चौरस मीटर


3. आकारमान - लीटर


4. वस्तुमान - किलोग्रॅम


5. घनता - किलोग्रॅम / घनमीटर





3. उदाहरणांसहित स्पष्ट करा.



अ. अदिश राशी

उत्तर - 


केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. 

उदाहरणार्थ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. 

उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन किलोमीटर, 101° फॅरनहाइट ताप इत्यादी.



आ. सदिश राशी

उत्तर -

परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय.

विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. 

उदाहरणार्थ, 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान.




4. मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.


उत्तर - मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी


1. योग्य साधनांचा वापर न करणे.

उदा. भाजीवाले,दुकानदार काही वेळेस प्रमाणित वजने न वापरता त्यांच्या जागी दगड किंवा इतर तत्सम साधने वापरतात.

 

2. साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे.

उदा. तराजू, वजने,मोजमाप टेप , इतर मापणाची साधने यांचा योग्य पद्धतीने वापर नाही केला तर मोजमापात त्रुटी निर्माण होतात. यांमध्ये साधन वापरण्याची अयोग्य पद्धत याचा समावेश आहे. 


5. कारणे लिहा.


अ. शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.

उत्तर - कारण  शकतात जसे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची मापे वेगळी असतात यामुळे मोजमापात त्रुटी निर्माण होऊ शकते म्हणून शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.



आ. ठरावीक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते.

उत्तर - कारण ठराविक कालावधीनंतर वजन व माप त्यांची जी वैशिष्ट्य आहेत त्याची खात्री करण्यासाठी प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. 

उदा. - पेट्रोल पंपावर जेवढे लीटर पेट्रोल घेतल्याचे दर्शवले जाते, तितके पेट्रोल प्रत्यक्षात मिळाले आहे का याची खात्री करण्यासाठी प्रमाणित मापाने ते अधूनमधून तपासणे गरजेचे असते, यालाच प्रमाणीकरण असे म्हणतात. बाजारातील वजने व मापे वेळोवेळी प्रमाणित करणे गरजेचे असते.



6. अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा.

उत्तर - मापन किती अचूक असावे, हे मापन कशासाठी होणार यावर ठरते. त्याप्रमाणे योग्य त्या साधनाचा वापर मापनासाठी करावा लागतो. मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. जसे, अत्यंत महत्त्वाच्या क्रीडास्पधांशी निगडित अंतरे व काळ, सोन्याचे वस्तुमान, शरीराचे तापमान,

 

Post a Comment

Previous Post Next Post