सूर्य,चंद्र व पृथ्वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी भूगोल धडा दुसरा Surya chandra va pruthvi swadhyay iyatta satavi dhada dusara

 






प्रश्न १. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.


(१) चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. 

उत्तर - चूक. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.


(२) पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.

उत्तर - चूक. पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी यांचा सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो.


(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे.

उत्तर - चूक. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५० चा कोन करते.


(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.

उत्तर - चूक. चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते.


(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.

उत्तर - चूक. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे योग्य ठरते.


(६) चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

उत्तर - चूक. चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.



२. योग्य पर्याय निवडा.


(१) सूर्यग्रहण  




उत्तर - (आ)


(२) कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब 



उत्तर - (आ)


(३) चंद्राची अपभू स्थिती 



उत्तर - (अ)




प्रश्न ३.पुढील तक्ता पूर्ण करा.

उत्तर



 



४. आकृती काढा व नावे लिहा.


(१) खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण.

उत्तर  (tap on image to zoom) 




(२) खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण.

उत्तर - ( tap on image to zoom)




प्रश्न ५. उत्तरे लिहा.


(१) दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत ?


उत्तर - पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते. परिणामी, चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो. प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो १८०° असतो. असे असले तरीही प्रत्येक अमावास्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत.



(२) खग्रास सूर्यग्रहण होत पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते ? 


उत्तर - सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. अशी सावली दोन प्रकारे पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा अंशतः ग्रासलेले दिसते, ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते.



(३) ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा.

उत्तर - ग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत व ग्रहणांत शुभ-अशुभ असे काहीही नसते हे पाठ्यपुस्तकातील विविध कृतींच्या व प्रात्यक्षिकांच्या आधारे समजावून सांगणे.


(४) सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल ?

उत्तर - सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळणे,  सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगल्सचा वापर करणे.


(५) उपभू स्थितीत सूर्यग्रहणे होतील ?

उत्तर - उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील.






Click here to join

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप फॉर रेगुलर अपडेट

1 Comments

Previous Post Next Post