पाणी किती खोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता तिसरी बालभारती Pani kiti khol iyatta tisari balbharati swadhyay

 







प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा 


१) म्हशीला काय चावता येत नव्हते ? 

उत्तर - म्हशीला कडबा चावता येत नव्हता..


२) पाणी कमी आहे, असे कोणाचे म्हणणे होते?

उत्तर - पाणी कमी आहे, असे वैलकाकांचे म्हणणे होते.


३) झाडावरून कोण हाक मारत होते ? 

उत्तर - झाडावरून खारूताई हाक मारत होती.


४) खारूताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली?

उत्तर - खारूताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली; कारण नदीला खूप पाणी होते.


५) नदी पार केल्यावर रेडकाने काय केले ?

उत्तर - नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले. 


६) रेडकाला म्हशीने नदीपलीकडे कशासाठी पाठवले?

उत्तर - कडबा कापून आणण्यासाठी म्हशीने रेडकाला नदीपलीकडे पाठवले.


(७) रेडकापेक्षा कोण उंच व कोण बुटके होते?

उत्तर - रेडकापेक्षा बैलकाका उंच होते व खारूताई बुटकी होती.




प्रश्न २. थोडक्यात उत्तरे सांगा


(१) रेडकू नदी ओलांडायला का घाबरले?


उत्तर - नदीत पाणी भरपूर होते व पाण्याचा मोठा आवाज होत होता. रेडकाला बैलकाकांनी रेडकाला पाणी कमी आहे असे सांगितले, पण खारूताईने तिची एक मैत्रीण वाहून गेल्याचे सांगितले. खारूताईचे हे म्हणणे ऐकल्यामुळे रेडकू नदी ओलांडायला घाबरले. 


(२) म्हशीने रेडकाला कसे समजावले?


उत्तर - म्हैस रेडकाला  म्हणाली अरे, नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत अन् खारूताई किती बुटकी आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना ? पण खारूताईपेक्षा तू मोठा आणि उंच रेडकू आहेस की नाही ? मग तुला घाबरायचं काय कारण.





 प्रश्न ३. कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा 


(१) आता मी खरंच म्हातारी झालीय. 

उत्तर -  "आता मी खरंच म्हातारी झालीय" असे म्हैस रेडकाला म्हणाली; कारण तिला कडवा चावता " येत नव्हता.


(२) "गुडघ्याइतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील.

 उत्तर -  "गुडघ्याइतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील." असे बैल रेडकाला म्हणाला; कारण बैलाच्या मते नदीत कमी पाणी होते. 


(३) "वाहून जाशील. मार्ग फिर. " 

उत्तर - "वाहून जाशील. मार्ग फिर. "  असे खारूताई रेडकाला म्हणाली; कारण खारूताईच्या मते नदीत खूप पाणी होते.


(४) "मग तुला घाबरायचं काय कारण?" 

उत्तर - "मग तुला घाबरायचं काय कारण?" असे म्हैस रेडकाला म्हणाली; कारण रेडकू खारूताईपेक्षा मोठा व उंच होता.


(५) "मला सहज जाता येईल." 

उत्तर -  "मला सहज जाता येईल." असे रेडकू स्वतःशीच म्हणाले; कारण म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता.



जोड्या जुळवा 

(अ) लाकडाची - मोळी

(आ) मेथीची - जुड़ी

 (इ) पुस्तकांचा - गठ्ठ्ठा


नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्याइतके होते, गाढवाच्या पोटाएवढे तर रेडकाच्या गुडघ्यांच्या थोडे वर होते. समजा नदीमधून पुढील प्राणी चालले आहेत. त्यांच्या पायांच्या कुठपर्यंत पाणी येईल? की ते बुडतील विचार करून लिहा.


(१) म्हैस -गुडघ्याइतके 

(२) जिराफ - गुडघ्याच्या थोडे खाली 

(३) हत्ती - गुडघ्याइतके

(४) उंट- गुडघ्याच्या थोडे खाली

(५) कुत्रा - गळ्यापर्यंत (कुत्रा पोहू शकतो)

(६) मांजर - गळ्यापर्यंत ( मांजर पोहू शकते)

(७) उंदीर - पाण्यात बुडेल

(९) बेडूक - पाण्यात बुडेल 

(१०) मासा - पोहता येते.


शब्दार्थ 

* कडबा - ज्वारी, बाजरीची कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग, वैरण

* कडबाकुट्टी - कडव्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र. 

* चघळणे - खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे.




Post a Comment

Previous Post Next Post