नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान Naisargik sansadhananche gundharm swadhyay

 






रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 


अ. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या ......प्रमाणे ठरते.

उत्तर - आर्द्रता


आ. पाण्याला स्वतःचा ........ नाही, परंतु निश्चित ....व ...आहेत.

उत्तर - आकार, घनता , वस्तुमान


इ. पाणी गोठताना त्याचे ..... वाढते

उत्तर - आकारमान


ई. ........ मृदेचा pH 7 असतो.

उत्तर - उदासीन




2. असे का म्हणतात ?


अ. हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे.

उत्तर -हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत. हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात. मुळेच त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हटले जाते.

आ. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

उत्तर -  पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात, म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

इ. स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

उत्तर -   पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात. अंघोळ करणे, कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त, सहज आणि सोपा पर्याय स्वच्छतेसाठी नाही. म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.



3. काय होईल ते सांगा.


अ. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले. 

उत्तर - हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल. अशी हवा दमट वाटते.


आ. जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले.

उत्तर - जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषकद्रव्ये कमी होतील. पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील, तर जमिनीचा पोत बिघडेल. जमीन पेरणीयोग्य राहणार नाही. पीक योग्यरीत्या येणार नाही.



4. सांगा, मी कोणाशी जोडी लावू ?


'अ' गट


1. हवा - प्रकाशाचे विकीरण

2. पाणी - उत्सर्जन क्रिया

3. मृदा - आकार्यता



5. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा..


अ. रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.

उत्तर - बरोबर


आ. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.

उत्तर -  बरोबर


इ. हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.

उत्तर - बरोबर



6. खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.




पाणी

उत्तर - 

1) चित्र 'अ'मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे. हे पाणी द्रव स्वरूपात आहे.

2) चित्र 'आ'मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे.

3) हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले.

4) बर्फ बनू लागले म्हणजे तापमान 4°C पेक्षा कमी होत आहे.


(आ)


5) 4 °C पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते. 

6) याच तापमानाला पाणी प्रसरण पावते. हे प्रसरण पावणारे पाणी बाणाच्या साहाय्याने चित्र 'आ' मध्ये दाखवले आहे.

7) पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो.




7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ. हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते?

उत्तर -

 हवेमध्ये काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते. जेव्हा सूर्याचे प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात, तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांनी विखुरतो. अशा प्रकारे प्रकाशाचे विकिरण होते.


आ. पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा.

उत्तर - 

1. पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनित्राच्या साहाय्याने वीजनिर्मिती करतात.

2. पाणी हे उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेडिएटर्समध्ये इंजिनचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.

3. पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्नपदार्थांमध्ये, शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियांमध्ये होतो.

4. अंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादींसाठी पाण्याचा उपयोग होतो.


इ. समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते ? 

उत्तर - समुद्राच्या पाण्यात क्षार असतात म्हणून त्या पाण्याची घनता जास्त असते.



ई. चांगल्या मृदारचनेचे महत्त्व काय आहे?

उत्तर - मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते.चांगल्या मृदारचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात.

1. मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

2. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते.


उ. मृदेचे विविध उपयोग कोणते ? 

उत्तर -

 मृदेचे उपयोग 

1. वनस्पती संवर्धन : वनस्पतींची वाढ करणे.

2. जलसंधारण : मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे, तळी या माध्यमांतून पाण्याचा आपल्याला बाराही महिने उपयोग करता येतो.

3. आकार्यता : मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ, मूर्ती, विटा.


ऊ. मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे ?

उत्तर -

1. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण मृदापरीक्षणामध्ये तपासले जाते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदापरीक्षण केले जाते. 

2. मृदापरिक्षणामुळे मृदेची चाचणी झाल्यामुळे शेतकऱ्याला उत्तम पीक काढण्यास मदत होते.


ए. ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय ? 

उत्तर -

आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून समजते, की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो.



ऐ. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये ?

उत्तर -

4 °C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. म्हणजेच 4 °C ह्या तापमानाला पाण्याची घनता सर्वांत जास्त असते व 4 °C च्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. म्हणजेच 4 °C च्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते.  पाणी प्रसरण पावून यामुळे काचेची बाटली फुटू शकते. 


2 Comments

  1. सीबीसीसीसींगी फग तर आपल्या र आहेत हे स्पष्ट झाले आहेत आणि

    ReplyDelete
Previous Post Next Post