प्रश्न 1. वनस्पतींची तीन उदाहरणे दया.
(1) काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या - फणस, धोत्रा, एरंड.
(2) खोडावर काटे असणाऱ्या - निवडुंग, गुलाब, काटेसावर
(3) लाल फुले असणाऱ्या - जास्वंद, पांगारा, पळस
(4) पिवळी फुले असणाऱ्या - सोनमोहर, बहावा, भेंड
(5) रात्री पाने मिटणाऱ्या - पर्जन्यवृक्ष, गुलमोहर, आवळा
(6) एकच बी असणारी फळे असणाऱ्या - आंबा, बोर, काजू
(7) फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या - कलिंगड, पेरू, फणस
प्रश्न २ . काय सारखे ? काय वेगळे ?
(1) ज्वारी आणि मूग :
उत्तर - सारखेपणा - दोन्ही अन्नपदार्थ आहेत.
ज्वारी
1. ज्वारी एकदलीय वनस्पती आहे.
2. ज्वारीला एकदल बी असते.
3. ज्वारी पिष्टमय पदार्थ देते.
4. ज्वारीचे कणीस असते.
मूग
1. मूग द्विदलीय वनस्पती आहे.
2. मुगाला द्विदल बी असते.
3. मूग प्रथिने देतात.
4. मूग शेंगेत तयार होतात.
(2) कांदा आणि कोथिंबीर :
उत्तर - सारखेपणा - स्वयंपाकात पूरक पदार्थ म्हणून वापरतात. दोन्ही सॅलेडच्या स्वरूपात खातात.
कांदा
1. कांदा ही एकदलीय वनस्पती आहे.
2. कांदयाचे बी असते किंवा तो कंदापासून रुजतो.
3. आपण खातो तो कांदा हा रूपांतरित पान
असतो.
कोथिंबीर
1.कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे.
2. कोथिंबीर ही धन्यापासून रुजून येते.
3. कोथिंबिर ही पाने असतात.
(3) केळीचे पान व आंब्याचे पान
उत्तर - सारखेपणा दोन्ही धार्मिक कार्यात वापरतात.
केळीचे पान
1. केळ ही एकदलीय वनस्पती आहे.
2. केळीच्या पानाला समांतर शिराविन्यास असतो.
आंब्याचे पान
1. आंबा विदलीय वनस्पती आहे.
2. आंब्याच्या पानाला जाळीदार शिराविन्यास असतो.
(4) नारळाचे झाड व ज्वारीचे ताट
उत्तर : सारखेपणा दोन्ही एकदल वनस्पती असून, ते अन्नपदार्थ देतात.
नारळाचे झाड
1. नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते.
2. नारळाचे झाड बहुवार्षिक असते.
3. नारळाच्या झाडाची मुळे तंतुमय आगंतुक प्रकारची असतात.
ज्वारीचे ताट
1. ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते.
2. ज्वारीचे ताट कणीस येऊन गेल्यानंतर मरते.
3. ज्वारीच्या ताटाची मुळे आधारक- आगंतुक प्रकारची असतात.
प्र. वनस्पतींच्या अवयवाची कार्य स्पष्ट करा.
उत्तर -
मूळ - माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे ही कार्ये मुळे करतात.
खोड - मुळांनी शोषलेले पाणी आणि पानात तयार झालेले अन्न इतर भागांना पोहोचवणे, निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेशन करते.
पाने - प्रकाश संशलेशनाच्या साहाय्याने अन्ननिर्मिती
फुल - प्रजनन व पुनरुत्पादन करणे.
फळ - अन्नसंचय
प्र. खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा.
(1) गुळगुळीत पृष्टभाग - केळ - केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळयाचे घड मिळतात. एका घडात साधारणपणे 20 पर्यंत केळी असतात.
(2) खडबडीत पृष्ठभाग - पारिजातक - पारिजातकाचे पान खडबडीत असते. पारिजातक हे छोटे झुडूप आहे. याची पाने खरखरीत व खडबडीत दिसतात, परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत. पण याची फुले सूर्य उगवल्यावर सुकत जातात.
(3) मांसल पर्णपत्र - जलपर्णी - जलपर्णीची पाने मांसल असतात. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. त्याचे खोडदेखील फुगीर आणि हिरवे असते. या वनस्पतीला वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात.
(4) पर्णपत्रावर काटे - केवडा - केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात, खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते. झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असल्यासारखा भासतो. केवड्याची सुगंधी पाने स्त्रिया केसात माळतात.
● प्रश्न. पुढील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा
(1) 'अ' हे चित्र एकदल बीचे आहे. हा मक्याचा दाणा आहे. 'आ' हे चित्र द्विदल बीचे आहे. हा वाल आहे.
(2) प्रत्येक चित्रात अखंड बी आणि त्याचा उभा छेद आहे.
(3) 'अ' चित्रातील बीमध्ये आदिमूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असता
(4) 'आ' चित्रातील बीमध्ये आदिमूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत.
कृती - तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे पुढील चौकटीत शोधा.