सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान sajiv srushti anukulan va vargikaran swadhyay std 7th general science





1. शोधा पाहू माझा जोडीदार !


अ' गट


1. कमळ - पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित

2. कोरफड - वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित. 

3.अमरवेल - अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.

4. घटपर्णी - फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात. ई



5. परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

मी पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो.


अ. माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे ?

उत्तर - पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. त्याच्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. त्याची त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. त्यांचा पांढऱ्या रंगामुळे ते बर्फाच्या रंगासोबत मिसळतात व भक्षकांपासून त्यांचे रक्षण होते.


आ. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो ?

उत्तर - एकत्र राहिल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते व सोबतच भक्षकांपासून संरक्षण होते.


इ. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये अनुकूलन हवे आणि का ?

उत्तर - ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शरीरावर जाड त्वचा , चरबीचा जाड थर , केस असले पाहिजे ज्यामुळे शीत तापमानात राहणे जमले पाहिजे.


ई. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का?

उत्तर - मी ध्रुवीय प्रदेशात राहतो. माझे खादच भरपूर प्रमाणात इथे मिळते म्हणून विशेषकरून अंटार्क्टिका खंडातच जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे.


3. खोटे कोण बोलतो ?


(1) झुरळ मला पाच पाय आहेत.

उत्तर - झुरळ खोटे बोलते. झुरळाला सहा पाय आहेत.


(2) कोंबडी : माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत.

उत्तर - कोंबडी खोटे बोलते. कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात.


(3) निवडुंग : माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे.

उत्तर - निवडुंग खोटे बोलतो. निवडुंगाचा हिरवा भाग हे त्याचे खोड आहे. 




4. खालील विधाने वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा.


अ. वाळवंटात खूप उष्णता आहे.

उत्तर - वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात.


आ. गवताळ प्रदेश हिरवागार असतो.

उत्तर - गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते. त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात; तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते, त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात. डोंगरउतारावर, पठारी व मैदानी प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात.


(3) कीटक जास्त प्रमाणात आढळतात. 

उत्तर - कीटक वर्गातील प्राणी कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे अनुकूलित झालेले असतात. काही कीटक हवेत उडू शकतात. त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली आहेत. उदा., हलके शरीर, पंखांच्या दोन जोड्या इत्यादी. पाण्यावर आणि पाण्यात राहणारे कीटकही त्याप्रमाणे अनुकूलित असतात. आपल्या रंगसाघम्यान ते •परिसरात मिसळून जातात. त्यांची प्रजननक्षमता देखील जास्त असते. कोटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात.


(4) आम्ही लपून बसतो.

उत्तर - लपून राहणाऱ्या प्राण्यांपैकी आम्ही दुबळे प्राणी आहोत, म्हणून भक्षकापासून संरक्षण होण्यासाठी आम्ही लपून राहतो. त्यासाठी आमच्या शरीराचा रंग आजूबाजूच्या परिसराशी मिळताजुळता असतो. तर दुसरे स्वतःच भक्षक असतात. जसा सरडा, कॅमेलियॉन वगैरे परिसराशी साधर्म्य बाळगून स्वतः दिसेनासे होतात. पण भक्ष्य पकडण्यासाठी झेप घालतात.


5) आमचे कान लांब असतात.

उत्तर - आम्ही शाकाहारी प्राणी आहोत. आमच्यावर एखादा मांसाहारी भक्षक कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे आम्ही नेहमी आमच्या लांब कानाच्या मदतीने दूरवरचा आवाज ऐकू शकतो. व भक्षक येण्याच्या आधी आम्ही तेथून पळू शकतो.


 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ. उंटाला 'वाळवंटातील जहाज' का म्हणतात ? 

उत्तर - उंटाची त्वचा जाड असते. त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते, त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते. लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात.त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो. या सर्व अनुकूलनांमुळे उंट वाळवंटातून चालू शकतो. वाळवंटात वाहतूक करण्यासाठी उंट चांगला पर्याय आहे. म्हणून उंटाला 'वाळवंटातील जहाज' असे म्हणतात.



आ. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज का जगू शकतात ?

उत्तर - वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते त्यामुळे ते मांसल बनते. पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात. या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात. तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात. या वनस्पतींच्या खोडावरदेखील मेणचट पदार्थांचा जाड थर असतो.



इ. सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे ?

उत्तर - प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला 'अनुकूलन' म्हणतात.

या बदलांमुळे सजीव त्या त्या परिस्थिती मध्ये त्यांचा रचने नुसार स्वतः चे रक्षण करतात.


ई. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते?

उत्तर - आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले आहे. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. याची सुरुवात प्राणी सृष्टी अथवा वनस्पती सृष्टी येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मांतील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात. यालाच 'वर्गीकरणाचा पदानुक्रम' (Hierarchy of classification) म्हणतात.

1 Comments

Previous Post Next Post