उत्तरे लिहा
१) बातमी कशाविषयीची आहे?
उत्तर - वरोरामध्ये अतिवृष्टीची (मुसळधार पाऊस पडल्याची) बातमी आहे.
२) बातमीचे शीर्षक काय आहे?
उत्तर - मुसळधार पावसाने वरोरा जलमय' हे बातमीचे शीर्षक आहे.
३) शीर्षकावरून तुम्हांला काय कळले? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा.
उत्तर - वरोरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला व त्यामुळे संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला, असे शीर्षकावरून कळले. 'वरोरात मुसळधार पाऊस' हे दुसरे शीर्षक देता येईल.
(४) वरोरामध्ये कोणकोणत्या भागांत पाणी साचले ?
उत्तर - वरोरा येथील बसस्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता व शिक्षक वसाहत या भागांत पाणी साचले.
(५) वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे, ते बातमीतील कोणत्या वाक्यावरून समजते ?
उत्तर - वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्हयाचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. या वाक्यावरून वरोरा तालुका चंद्रपूर जिल्हयात आहे, हे समजते.
६) ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे? ते कसे ठरवले?
उत्तर - ही बातमी ऑगस्ट महिन्यातली आहे. कारण बातमीमध्ये 'संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला ' हे वाक्य आहे. व बातमी ऑगस्ट महिन्याच्या ८ तारखेची आहे.
७) वरील बातमीतील जोडाक्षर असलेले शब्द शोधून लिहा.
उत्तर :
१) आमच्या
२)झालेल्या
३) संपूर्ण
४) चारच्या
५) वाजेपर्यंत
६) बसस्थानकाचा
७) चंद्रपुर
८) रस्ता
९) सर्व
१०) गेल्यामुळे
११) नव्हता
१२) त्यामुळे
१३) छत्र्या
१४) आपापल्या
१५) ओसरल्यावर
१६) तालुक्यात
१७) भद्रावती
१८) जिल्ह्याचा
१९) राहिल्याचे
२०) उदया
२१) मध्यम
२२) स्वरूपाचा
२३) पडण्याची
२४) शक्यता
२५) खात्याने
२६) वर्तवली