चुंबकाची गंमत स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Chumbakachi Gammat swadhya std 6th General Science digest prashna uttare

 





प्रश्न १. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा 


(१) पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हूकला टांगल्यास, त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो. (दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम)

उत्तर - उत्तर


(२) एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास, पट्टी चुंबक तयार होतात; तर एकूण ध्रुव तयार होतात. (६, ३, २)

उत्तर - ३ ६


(३) चुंबकाच्या ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते; तर त्याच्या ध्रुवांमध्ये आकर्षण असते.

उत्तर - सजातीय, विजातीय



(४) चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला.....प्राप्त होते.

(कायम चुंबकत्व, प्रवर्तित चुंबकत्व)

उत्तर - प्रवर्तित चुंबकत्व



(५) एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो; तर तो तुकडा असला पाहिजे.

(लोखंडाव्यतिरिक्त इतर कोणताही धातू, चुंबक किंवा लोखंडी तुकडा, अचुंबकीय पदार्थ) 

उत्तर -चुंबक किंवा लोखंडी तुकडा


(६) चुंबक दिशेत स्थिर राहतो. 

(पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर)

उत्तर - दक्षिण-उत्तर



कोणता चुंबक वापराल ?


१) कचऱ्यातून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे. 


उत्तर - विदयुत चुंबक.



२) तुम्ही जंगलात वाट चुकला आहात.


उत्तर - होकायंत्र.


३) खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड-बंद होते. 


उत्तर - कायमचे चुंबक.


(४) दारावरची घंटा वाजली पाहिजे. 


उत्तर - विदयुत चुंबक.



९. कसे कराल ?


अ. पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे.

उत्तर 

पदार्थ चुंबकाच्या जवळ नेला. तो जर चुंबकाला चिकटला तर तो पदार्थ चुंबकीय असतो जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला नाही तर तो अचुंबकीय असतो


आ. चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते, हे समजावून दयायचे आहे.

उत्तर 

जितक्या भागात त्या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोहकीस आकर्षित झालेला दिसेल. जिथे लोहकीस चुंबकाला चिकटत नाही, त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही


इ. चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे.

उत्तर 

चुंबक एका दोरीने आडवा टांगून ठेवावा. आपल्याला जर  उत्तर दिशा माहीत असेल तर टांगलेल्या चुंबकाचे जे टोक उत्तरेला स्थिर राहते, तो उत्तर ध्रुव होईल. 

जर आपल्याला आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहीत नसेल तर होकायंत्राच्या साहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव येईल. होकायंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेल्यास तो प्रतिकर्षण दाखवील. जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो उत्तर ध्रुव-असे आपण म्हणू शकतो.










खालील प्रश्नांची उत्तरे लिहा


अ. विदयुतचुंबक कसा तयार करतात ?

उत्तर -

साहित्य - अंदाजे १० सेमी लांबीचा लोखंडी खिळा. एक मीटर लांब तांब्याची तार, एक बॅटरी, टाचण्या किंवा इतर चुंबकीय वस्तू 




       आकृतीत दाखवल्याप्रमाणे खिळ्याभोवती तांब्याची तार गुंडाळा. तारेची दोन्ही टोके बॅटरीला जोडा. आता लोखंडी खिळ्याच्या टोकाजवळ टाचण्या न्या.

       ही कृती केल्यानंतर आपल्या असे लक्षात येते, की टाचण्या खिळ्याला चिकटतात. आता विदयुतप्रवाह बंद करून काय होते ते पहा. खिळ्याला चिकटलेल्या टाचण्या पडतात. असे का होते? विदयुतप्रवाहामुळे खिळ्यामध्ये चुंबकत्व निर्माण होते. तो बंद केला, की नाहीसे होते. अशा चुंबकास विदयुतचुंबक म्हणतात. विदयुतचुंबकत्व हे तात्पुरते असते.


आ. चुंबकाचे गुणधर्म लिहा.

उत्तर

(१) चुंबक नेहमी उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर होतो.

(२) चुंबकीय बल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले असते.

(३) चुंबकाचे ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. जर एका चुंबकाचे दोन भाग केले; तर त्यापासून दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात.


(४) चुंबकाच्या सान्निध्यात दुसरा चुंबकीय पदार्थ नेल्यास, त्यातही प्रवर्तित चुंबकत्व तयार होते. (५) चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. (६) चुंबकीय वस्तूंमध्ये चुंबकत्व निर्माण होते; पण ते तात्पुरते असते.



इ. चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते ?

उत्तर 

    दैनंदिन  जीवनामध्ये विदयुतचुंबकत्वाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.  पिन होल्डर किंवा कपाटाच्या दाराला लावलेले चुंबक हे कायमचे चुंबक असते. कायम चुंबके निकेल, कोबाल्ट व लोह यांच्या मिश्रणांपासून बनवतात. उदाहरणार्थ, आल्निको हा पदार्थ अॅल्युमिनिअम, निकेल, कोबाल्ट यांचे मिश्रण आहे. दारावरची घंटा, क्रेन अशा उपकरणांमध्ये विदयुतचुंबकत्वाचा वापर होतो.

Post a Comment

Previous Post Next Post