प्रश्न १. जोड्या लावून साखळी बनवा.
उत्तर
(१) लाटा-वारा- भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात.
(२) केंद्रोत्सारी प्रेरणा - पृथ्वीचे परिवलन-वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते.
(३) गुरुत्वीय बल - चंद्र, सूर्य व पृथ्वी - पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते.
(४) उधाणाची भरती - अमावास्या - सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते.
(५) भांगाची भरती-अष्टमी - चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात.
प्रश्न २. भौगोलिक कारणे सांगा.
(१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
उत्तर - सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते.यामुळे भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
(२) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
उत्तर -
१) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते.
२) त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते.
३) अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात.
४) अशा भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
(३) ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
उत्तर -
१) जेव्हा एखादया रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या =त्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले ते व तेथे भरती येते.
२) भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तांवरील ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा.
उत्तर -
१) जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे पारी १ वाजून १२ मिनिटे व त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटे अशी असेल.
२) ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण सांगा.
उत्तर - ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्यावेळी १०७° श्चिम रेखावृत्तावर भरती असेल.
कारण -
१) पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते.
२) ७३° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस १०७° पश्चिम रेखावृत्त आहे.
(३) लाटानिर्मितीची कारणे स्पष्ट करा.
उत्तर -
१) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे.
२) काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास किंवा वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात.
प्रश्न ४. पुढील बाबींचा भरती-ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
उत्तर -
(१) पोहणे - भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. यामुळे योग्य माहिती असल्यावर पोहण्यास जाणे सुरक्षीत असते.
(२) जहाज चालविणे - भरतीच्या वेळी जहाज समुद्रकिनाऱ्यावरून सागरजलात नेणे व सागरजलातून समुद्रकिनाऱ्यावर आणणे अधिक सोपे असते.
(३) मासेमारी - भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.
(४) मीठ निर्मिती - भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
(५) सागरी किनारी सहलीला जाणे - भरती-ओहोटीबरोबरच एखादया ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे.
५. भांगाची भरती-ओहोटी या आकृती ३.८ चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) ही आकृती कोणत्या तिथीची आहे ?
उत्तर - ही आकृती अष्टमी या तिथीची आहे.
(२) चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे?
उत्तर - चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात याप्रमाणे आहे.
(३) या स्थितीचा भरती-ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल ?
उत्तर - या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती (भांगाची भरती) व सरासरीपेक्षा लहान ओहोटी (भांगाची ओहोटी) निर्माण होईल.
प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.
(१) भरती व ओहोटी
उत्तर
भरती
१. सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ, म्हणजे 'भरती' होय.
२. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते.
ओहोटी
१. सागरजलाच्या पातळीत होणारी घट, म्हणजे 'ओहोटी' होय.
२. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते.
(२) लाट व त्सुनामी लाट प्रश्न
उत्तर -
लाट
१. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते.
२. लाट विनाशकारी नसते.
त्सुनामी लाट
१. सागरतळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखींमुळे त्सुनामी लाट निर्माण होते.
२. त्सुनामी लाट विनाशकारी असते.
७. भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा.
उत्तर -
चांगले परिणाम -
१) भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.बंदरे गाळाने भरत नाहीत.
२) भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात.
३) भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
४) भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते.
६)भरती-ओहोटीमुळे तिवराची वने, किनारी भागांतील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.
वाईट परिणाम -
१) भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप फॉर रेगुलर अपडेट
Thank you🌹
ReplyDeleteवास्तविक पाहता येईल का
ReplyDelete