1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन)
अ. सर्वाधिक उष्णता ..........रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.
उत्तर - काळा
आ. उष्णतेच्या..........साठी माध्यमाची आवश्यकता नसते.
उत्तर - प्रारण
इ. उष्णतेचे वहन पदार्थांमधून होते.
उत्तर - सुवाहक
ई. थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता .........क्रियेने कमी करतो.
उत्तर - परावर्तन
उ. अन्न शिजवण्याची भांडी गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात.
उत्तर - सुवाहक
ऊ. सूर्यापासून पृथ्वीला .......... मुळे उष्णता मिळते.
उत्तर - प्रारण
2. कोण उष्णता शोषून घेईल ?
स्टीलचा चमचा, लाकडी पोळपाट, काचेचे भांडे, तवा, काच, लाकडी चमचा, प्लॅस्टिकची प्लेट, माती, पाणी, मेण.
उत्तर
उष्णता शोषणारे पदार्थ - स्टीलचा चमचा, तवा
उष्णता कमी प्रमाणात शोषणारे - लाकडी चमचा, प्लॅस्टिकची प्लेट, लाकडी पोळपाट, काच, काचेचे भांडे , माती
मेण वितळू शकते.
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो ?
उत्तर -
थंड पाण्याची पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते, त्यामुळे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो.
आ. राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात ?
उत्तर -
राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खूप जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे आपाती उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात.
इ. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा.
उत्तर -
उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार - वहन, अभिसरण व प्रारण.
ई. खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा.
उत्तर -
दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती वर जाते. या वेळी समुद्रावरील त्यामानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसारणाने खारे वारे वाहतात.
रात्री जमीन लवकर थंड होते. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते. त्यामानाने समुद्रावरील हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते. अशा वेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात.
उ. अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो?
उत्तर -
अंटार्क्टिका खंडात वातावरणाचे तापमान कमी असते. काळ्या रंगाच्या पदार्थावर पडणाऱ्या उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते. पेंग्विन पक्ष्यांचा रंग काळा असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास त्याची मदत होते.
ऊ. खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात ?
उत्तर -
उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची/तळालगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते. त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात. म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात.
4. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही.
उत्तर -
साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वहन वेगाने न झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी पडते तेथील काचेचे लगेच प्रसरण होते. परंतु त्या शेजारील भागाचे त्यामानाने फार कमी प्रसरण झाल्याने बाटली तडकते.
बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वहन झाल्याने काचेचे पावते. सामान्यतः दोन फारसे नैकसमान प्रसरण होत नाही. त्यामुळे ती बाटली तडकत नाही.
आ. उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात.
उत्तर -
उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान जास्त असते तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे टेलिफोनच्या तारा लोंबकळतात. हिवाळ्यात वातावरणाचे तापमान कमी असते तेव्हा तारांचे आकुंचन झाल्याने त्या समांतर होतात.
इ. हिवाळ्यात गवतावर दबबिंदू जमा होतात.
उत्तर -
हवेत पाण्याची वाफ असते. हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जादा पाण्याचे गवतावर संघनन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात.
ई. हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो.
उत्तर -
लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे, आणि लाकूड उष्णतेचे दुर्वाहक आहे. हिवाळ्यात रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा बरेच कमी असते. अशा वेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे होते. त्यामुळे आपल्या हाताला तो खांब थंड लागतो. मात्र लाकडी दांड्याला हात लावल्यास त्या प्रमाणात उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही.