१. गतीचा प्रकार ओळखा.
अ. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे..........
उत्तर - वर्तुळाकार, नियतकालिक
आ. छताला टांगलेला फिरणारा पंखा....
उत्तर - आंदोलित, वर्तुळाकार
इ. आकाशातून पडणारी उल्का
उत्तर - एकरेषीय
ई. जमिनीवरून उडवलेले रॉकेट.
उत्तर - एकरेषीय
उ. पाण्यात पोहणारा मासा...
उत्तर - यादृच्छिक.
ऊ. सतारीची छेडलेली तार
उत्तर - आंदोलित
२. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
(एकरेषीय, नैकरेषीय, वर्तुळाकार, एकरेषीय समान, एकरेषीय असमान, समान वर्तुळाकार, असमान वर्तुळाकार, यादृच्छिक)
अ. इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तोगतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो...........गतीने जमिनीवर येईल.
उत्तर - एकरेषीय असमान, नैकरेषिय
आ. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती ...असते.
उत्तर - एकरेषीय
इ. आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार गतीने उडते.
उत्तर - वर्तुळाकार
ई. फिरत असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती.......तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती ........ असते.
उत्तर - समान वर्तुळाकार, असमान वर्तुळाकार
३. आमच्यातील वेगळेपण काय ?
अ. आंदोलित गती व रेषीय गती
उत्तर -
आंदोलित गती
१. आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकारची गती आहे.या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नाहीत.
२. आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ येते. जागी
३. उदा., घड्याळातील लंबक, शिवणयंत्रातील सुई.
रेषीय गती
१. रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात.
२. रेषीय गती दर्शवणारी वस्तू मूळ जागेपासून दूर जाते.
३. उदा., सैनिकांचे संचलन, धावणारी आगगाडी.
आ. रेषीय गती व यादृच्छिक गती
उत्तर -
रेषीय गती
१. ज्या गतीची दिशा एका बिंदूपासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सरळ दिशेला जाते, त्या गतीला 'रेषीय गती' असे म्हणतात.
२. रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात.
३. उदा., सैनिकांचे संचलन, धावणारी आगगाडी.
यादृच्छिक गती
१. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते, अशा गतीला 'यादृच्छिक गती' असे म्हणतात.
२. या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत कधीच जात नाहीत.
३. उदा., फुलपाखराचे उडणे, फुटबॉलचा खेळ.
इ. यादृच्छिक गती व आंदोलित गती
उत्तर
यादृच्छिक गती
१. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते, अशा गतीला 'यादृच्छिक गती' असे म्हणतात.
२. यादृच्छिक गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते.
३. या गतीतल्या वस्तू पुन्हा मूळ जागी कधीच येत नाहीत.
४. उदा., फुलपाखराचे उडणे, फुटबॉलचा खेळ.
आंदोलित गती
१. आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकारची गती आहे. या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नसल्यामुळे त्या मूळ जागी पुन्हा येतात.
२. आंदोलित गतीला निश्चित दिशा असते.
३. आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते.
४. उदा., घड्याळातील लंबक, शिवणयंत्रातील सुई.
४. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अ. रेषीय गती
उत्तर -
रेल्वेगाडी व रस्त्यावरून येणारी-जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून, एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल, तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो.
उदा. पिस्तुलातून सुटणारी गोळी
आ. आंदोलित गती
उत्तर -
झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात. त्याचप्रमाणे घड्याळाचा फिरणारा लंबक, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा हीदेखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत.
इ. वर्तुळाकार गती
उत्तर -
वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात.
उदा. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरी गो राउंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. यांसारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते.
ई. यादृच्छिक गती
उत्तर -
ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
उदा. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गतीसुद्धा याच प्रकारची असते. रांगणारे बाळ,भटकी जनावरे या सर्वांची गती यादृच्छिक असते.
उ. नियतकालिक गती
उत्तर -
काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे, घड्याळाचा मिनिट काटा बरोबर ६० मिनिटांत एक फेरी पूर्ण करतो तर मेरी गो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूंमधील या गतीला 'नियतकालिक गती' असे म्हणतात.
५. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात ?
उत्तर
बहुतेक पक्षी रेषीय गती दाखवतात तर घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात
आ. रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हांला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा.
उत्तर -
सायकल चालवताना पॅडल मारताना वर्तुळाकार गती , सायकल ज्या दिशेने जात आहे ती एकरेषीय गती , सायकलाचा वेग आपण कमी जास्त करता असतो तेव्हा ती रेषीय असमान गती होते.
६. खालील कोडे सोडवा.
१. घड्याळातील काट्यांची गती
२. झाडावरून पडणाऱ्या फळांची गती
३. गोफणीची गती
४. मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती
उत्तर