स्थितिक विद्युत स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान Sthitik Vidyut Swadhyay Std 7th General Science solution

 





रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. 


(सदैव प्रतिकर्षण, सदैव ऋणप्रभाराचे विस्थापन, धनप्रभाराचे विस्थापन, अणू, रेणू, स्टील, तांबे, प्लॅस्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू, सोने)




अ. सजातीय विदयुत प्रभारांमध्ये.........होते.

उत्तर - सदैव प्रतिकर्षण


आ. एखादया वस्तूमध्ये विदयुतप्रभार निर्माण होण्यासाठी.........कारणीभूत असते.

उत्तर - ऋणप्रभाराचे विस्थापन


इ. तडितरक्षक.........पट्टीपासून बनवला जातो.

 उत्तर - तांब्याच्या


 ई. सहजपणे घर्षणाने .........विदयुतप्रभारित होत नाही.

उत्तर - प्लास्टिक 


उ. विजातीय विदयुतप्रभार जवळ आणल्यास ..........होते.

उत्तर - सदैव आकर्षण


ऊ. विदयुतदर्शीने...........ओळखता येते.

उत्तर - प्रभारित वस्तू




2. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा.

उत्तर -

छत्रीचा दांडा हा धातूचा असतो आणि मुसळधार पावसामध्ये विजा चमकत असतात. यामुळे जर छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाण्याची शक्यता असते. यामुळे विजेचा झटका किंवा मृत्यूही होऊ शकतो. 



3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.


अ. विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल ? 

उत्तर -

घराला तडिरक्षक बसवलेले असावे. यामुळे वीज जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते  तसेच मुसळधार पावसामध्ये बाहेर जाणेही धोकादायक असते या गोष्टी अनुसरून आपण विजेपासून स्वतःचा बचाव करू शकतो.




आ. प्रभार कसे निर्माण होतात ?

उत्तर -

दोन विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या असता, एका वस्तूवरील ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तू ऋणप्रभारित होते, तर पहिली वस्तू धनप्रभारित होते.



इ. तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते ?

उत्तर -

तडितरक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी. इमारतीच्या सर्वांत उंच भागावर याचे एक टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते.



ई. पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात ?

उत्तर -

ही पहार तडिरक्षकाचे काम करते यामुळे वीज जमिनीत पसरली जाते आणि नुकसान टळते.




उ. पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत ?

उत्तर -

जेव्हा ढगांवर फार मोठ्या प्रमाणावर विदयुतप्रभार निर्माण होतो, तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते.



4. स्थितिक विदयुतप्रभाराची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर -

१) स्थितिक विद्युतप्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात.

२) दोन वस्तू परस्परांवर घासल्या त्या वस्तूंवर जे विद्युतप्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधीकरताच असतात. 

३) दोन वस्तूंवरील मिळून निव्वळ विदयुतप्रभार शून्य असतो.

 

5. वीज पडून काय नुकसान होते? ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल ?

उत्तर -

१) जीवितहानी सुद्धा होते.

३) घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात.

या सर्व गोष्टी न व्हाव्या यासाठी आपण खालील गोष्टींचे पालन करायला हवे.

१) मुसळधार पावसात विजा कडाडत असताना घराच्या बाहेर पडू नये

२) इमारतीला तडिरक्षक असावे.



Post a Comment

Previous Post Next Post