ताऱ्यांची जीवनयात्रा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी सामान्य विज्ञान Taryanchi Jivanyatra Swadhyay std 8th General Science digest prashna uttare

 






* शोधा म्हणजे सापडेल.


अ. आपल्या दीर्घिकेचे नाव .......हे आहे.


उत्तर - मंदाकिनी


आ. प्रचंड अंतरे मोजण्यासाठी....... हे एकक वापरतात.  

 उत्तर   - प्रकाशवर्ष


इ. प्रकाशाचा वेग ...km/s एवढा आहे.

उत्तर - ३०००००

ई. आपल्या आकाशगंगेत सुमारे.
........ तारे आहेत.

उत्तर - १०० अब्ज

उ. सूर्याची अंतिम अवस्था असेल.

उत्तर -  श्वेत बटू

ऊ. ताऱ्यांचा जन्म........मेघांपासून होतो.

उत्तर - आंतरतारकीय

ए. आकाशगंगा ही एक..... दीर्घिका आहे.

उत्तर - चक्राकार

ऐ. तारे हे...... .वायूचे गोल असतात..

उत्तर  -  तप्त

ओ. ताऱ्यांचे वस्तुमान.........वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.

उत्तर - सूर्याच्या

औ. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास........एवढा वेळ लागतो.

उत्तर - ८ मिनिटे , १ सेकंद

अं. ताज्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची.......... जलद गतीने होते.

उत्तर - उत्क्रांती

अः ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या........ अवलंबून असते.

उत्तर - वस्तुमानावर



2. कोण खरे बोलतय ?


अ. प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात.

उत्तर - चूक

आ. ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते.

उत्तर - बरोबर

इ. ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो.

उत्तर - चूक

ई. कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो.

उत्तर - चूक

उ. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल.

उत्तर - चूक

ऊ. सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल.

उत्तर - बरोबर


3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. ताऱ्यांची निर्मिती कशी होते?

उत्तर -

दीर्घिकांतील ताऱ्यांच्यामध्ये असलेल्या रिक्त जागांत ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात, ज्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. आकृती 19.3 मध्ये हबल दुर्बिणीने टिपलेले अशा मेघांचे एक प्रकाशचित्र दाखवले आहे. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाशवर्ष (light year) हे एकक वापरतात. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा वेग 3, 00, 000 km/s असल्याने एक प्रकाशवर्ष हे अंतर 9.5 x 102 km इतके असते. आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाश वर्षे इतका असतो. म्हणजे प्रकाशाला या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत जाण्यास काही वर्षे लागतात. यावरून तुम्ही या मेघांच्या प्रचंड आकाराची कल्पना करू शकता.
     एखादया विक्षोभामुळे (disturbance) हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊ लागतात. या आकुंचनामुळे त्यांची घनता वाढत जाते व तसेच त्यांचे तापमानही वाढू लागते व त्यांमधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर तेथे अणुऊर्जा (अणुकेंद्रकांच्या युतीने निर्माण झालेली ऊर्जा) निर्मिती सुरू होते. या ऊर्जा निर्मितीमुळे हा वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो म्हणजेच या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो असे आपण म्हणू शकतो.
    

आ. ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते ?

उत्तर -

ताऱ्याची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मांत बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थांत रूपांतर होण्याची प्रक्रिया.

ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचा साठा कमी होणे हे आहे. केंद्रातील इंधन संपुष्टात आल्यावर ऊर्जा निर्मितीही संपुष्टात येते व ताऱ्याचे तापमान कमी होऊ लागते. तापमान कमी झाल्याने वायूचा दाबही कमी होतो व तो गुरुत्वीय बलाशी संतुलन राखू शकत नाही. गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा अधिक असल्याने तारा आकुंचित होतो. यामुळे दुसरे इंधन वापरात येते.

इ. ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या ?

उत्तर -

१) सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची (M star <8 M अंतिम अवस्था :

२) सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान (8 M < 25M ) असलेल्या ताऱ्यांची अंतिम <M अवस्था

३) सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटींहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची (M > 25M ) अंतिम
star Sun अवस्था

ई. कृष्ण विवर हे नाव कशामुळे पडले ?

उत्तर -

      या ताऱ्यांची उत्क्रांती दुसऱ्या गटातील ताऱ्यांप्रमाणेच होते पण महाविस्फोटानंतरही कोणताच दाब त्यांच्या प्रचंड गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही व ते नेहमीसाठी आकुंचित होत राहतात. त्यांचा आकार लहान होत गेल्यामुळे त्यांची घनता व त्यांचे गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते. यामुळे ताऱ्याजवळील सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही, अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. तसेच ताऱ्यावर पडलेला प्रकाशही परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. यामुळे आपण ताऱ्यास पाहू शकत नाही व त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसू शकेल. म्हणून या अंतिम स्थितीस कृष्ण विवर (black hole) हे नाव दिले आहे.

उ. न्युट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते ?

उत्तर -

        सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान (8 M Sun < M star < 25 M ) असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था -
           हे तारेदेखील वरीलप्रमाणे तांबडा राक्षसी तारा व नंतर महाराक्षसी तारा या अवस्थांमधून जातात. महाराक्षसी Sun अवस्थेत त्यांचा आकार 1000 पटीपर्यंत वाढू शकतो. त्यांत शेवटी होणारा महाविस्फोट (supernova explosion) खूप शक्तिशाली असतो व त्यांतून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे ते तारे दिवसादेखील दिसू शकतात. महाविस्फोटातून उरलेला केंद्रातील भाग आकुंचित होऊन त्याचा आकार 10 km च्या जवळपास येतो. या अवस्थेत ते संपूर्णपणे न्यूट्रॉनचे बनलेले असतात. यामुळे त्यांना न्यूट्रॉन तारे असे म्हटले जाते. ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून नसतो व तो अनंतकालापर्यंत गुरुत्वीय बलास संतुलित करण्यास सक्षम असतो. न्यूट्रॉन तारे ही या ताऱ्यांची अंतिम अवस्था असते.

4. अ. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दांत लिहा.

उत्तर -

रात्री आकाशात आपण सुमारे 4000 तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. सूर्य हा त्यातील एक सामान्य तारा आहे. सामान्य म्हणण्याचे कारण असे की तो आपल्यापासून सगळ्यांत निकट असल्यामुळे जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात. सूर्याचे काही गुणधर्म खालील तक्त्यात दिले आहेत. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हायड्रोजन आहे, तर 26% भाग हेलिअम आहे. उरलेले 2% वस्तुमान हेलिअमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे.

सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे व त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे. इतर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1 10 M 10 -) पासून ते 100 पट (100M शकते व त्यांची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येहून Sun पर्यंत असू 10 1000 पटपर्यंत असू शकते.


ब. श्वेत बटू बद्दल माहिती दया.

या ताऱ्यांच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रसरण होते व त्यांचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो. या अवस्थेत त्यांना 'तांबडा राक्षसी तारा' म्हणतात. हे नाव त्यांच्या मोठ्या आकारामुळे व त्यांचे तापमान कमी झाल्याने ते लालसर दिसत असल्याने दिले गेले आहे. इतर प्रकारच्या ताऱ्यांच्या सापेक्ष तांबड्या राक्षसी ताऱ्याचा आकार आकृती 19.2 मध्ये दाखविला आहे. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. ताऱ्यांचे बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते व आतील भाग आकुंचित होतो. या आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकाराइतका होतो. ताऱ्यांचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वीइतका झाल्याने ताऱ्यांची घनता खूप वाढते. अशा स्थितीत त्यांतील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून असत नाही व तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंतकाळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा असतो. या अवस्थेत तारे श्वेत दिसतात व त्यांच्या लहान आकारामुळे ते श्वेत बटू (White dwarfs) म्हणून ओळखले जातात.

2 Comments

Previous Post Next Post