परिसंस्था स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

 






1.खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.



अ. हवा, पाणी, खनिजे, ही परिसंस्थेतील .......घटक होय.


(भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय) 


उत्तर - भौतिक


आ. परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे मृदा परिसंस्थेची उदाहरणे आहे. 


(भूतल, जलीय, कृत्रिN

 उत्तर -  जलिय



इ. परिसंस्थेमध्ये 'मानव' प्राणी...... गटात मोडतो.


(उत्पादक, भक्षक, विघटक) 

उत्तर - भक्षक



2. योग्य जोड्या जुळवा.


उत्पादक - परिसंस्था



अ. निवडुंग - वाळवंटीय 


आ. पाणवनस्पती - जलीय


इ. खारफुटी - खाडी 


ई. पाईन - जंगल


 

3. माझ्याविषयी माहिती सांगा.


अ. परिसंस्था 


उत्तर -


आपल्या सभोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे. सजीव आणि निर्जिव. सजीवांना जैविक (Biotic) घटक आणि अजैविक (Abiotic) घटक असे म्हणतात. या सजीव आणि निर्जिव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो. या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते.


आ. बायोम्स 


उत्तर


पृथ्वीवरील काही भागांत बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना 'बायोम्स' (Bi omes) असे म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या 'बायोम्स' आढळतात.

भू-परिसंस्था (Land Biomes) व जलीय परिसंस्था (Aquatic Biomes)


भू-परिसंस्था 

 ज्या परिसंस्था फक्त भू-भागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भू परिसंस्था असे म्हणतात.

 उदा. गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था.


जलीय परिसंस्था (Aquatic Biomes) 

 जलपरिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्त्वाचे मानले जातात. उदा. गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, खाडी परिसंस्था.



इ. अन्नजाळे


उत्तर -


एक भक्षक अनेक मार्गांनी भक्ष्य मिळवितो. तर तोच भक्षक अनेक भक्षकांचे भक्ष्य असतो 

उदा. - बेडूक हा भक्षक अनेक प्रकारचे कीटक खातो पण त्याला साप खातो, साप हे पक्ष्याचे भक्ष्य ठरू शकते. हाच पक्षी कीटक किंवा बेडूक देखील खाऊ शकतो. अशा रितीने परिसंस्थेतील जैविक घटकांतील परस्परसंबंध अतिशय क्लिष्ट अन्नजाळी निर्माण करू शकतात.


4. शास्त्रीय कारणे दया.



अ. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.


उत्तर -

 

१) वनस्पती या प्रकाश-संश्लेषण करून अन्न निर्मिती करतात.


२)सौर ऊर्जेचा वापर करून अन्न तयार करताना वनस्पती मातीतून असेंद्रिय क्षार आणि पाणी यांचे शोषण करतात व सेंद्रिय अन्नपदार्थ बनवतात. म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.


आ. मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात.


उत्तर - 


धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणांमुळे नदीचा खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात.



इ. दुधवा जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले.


उत्तर 


दुधवा' हे जंगल दीड शतकापूर्वी एकशिंगी गेंड्यांचे मोठे वसतिस्थान होते पण अनिर्बंध शिकारीमुळे विसाव्या शतकात हा प्राणी येथून नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्यांचे येथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यात त्यांचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात (अधिवासात) सोडले गेले. सर्वप्रथम सत्तावीस चौरस किमी., गवताळ प्रदेश व वने ज्यात बारमाही जलस्रोत आहेत, असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला. तसेच दोन निरीक्षण केंद्रे बसविण्यात आली. या प्रयत्नांना चांगले यश आले आहे.





5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले?


उत्तर -


परिसंस्थेमध्ये मानवप्राणी 'भक्षक' या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्यावाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली त्यामुळे परिसंस्थावर ताण वाढला पण टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले.


आ. परिसंस्थेच्या हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे ?


उत्तर -


वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो आहे. यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात.


इ. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे का होतात ?


उत्तर -


जमीन, पाणी, खनिजसंपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदांतून युद्ध होते. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बाँबवर्षाव-सुरुंग स्फोट केले जातात. यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही, तर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्टसुद्धा होतात.


अशा प्रकारे भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थांत रूपांतर होते, काही परिसंस्थांचा हास होतो, तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात.



 ई. परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा.


उत्तर -


परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक उदाहरणार्थ, हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. एखादया परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते.


सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी-जास्त होत असते. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाचा सभोवतालच्या अजैविक घटकावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होतो.



उ. सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा.


उत्तर -


सदाहरित जंगल


(1) पृथ्वीचा सुमारे 7% भूभाग हा सदाहरित जंगलांनी व्यापलेला आहे.


(2) पृथ्वीवरचे जवळपास निम्मे भूचर प्राणी आणि जमिनीवरच्या वनस्पती सदाहरित जंगलांमध्येच असतात.


(3) विषुववृत्तीय सदाहरित जंगले ही घनदाट आणि अनेक 

थरांची असतात.


गवताळ प्रदेश


(1) पृथ्वीचा सुमारे 30% भूभाग हा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे.


(2) बहुसंख्य चरणारे प्राणी गवताळ प्रदेशात असतात.


(3) गवताळ प्रदेशात अतिशय उंच गवत वाढते. ही मुख्यत्वे रान-गवते असून एखादे झाड देखील या प्रदेशात दिसते.




Post a Comment

Previous Post Next Post