* शोधा म्हणजे सापडेल.
अ. प्लॅस्टिकमध्ये........ हा गुणधर्म आहे, म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो.
उत्तर - अकार्यता
आ. मोटारगाड्यांना .........चे कोटिंग करतात.
उत्तर - टेफ्लोन
इ. थर्मोकोल ....... तापमानाला द्रव अवस्थेत जातो.
उत्तर - १००° हून अधिक
ई. .......... काच पाण्यात विरघळते.
उत्तर - जलकाच
* माझा जोडीदार कोण ?
अ स्तंभ
1. शिसेयुक्त काच - विदयुत बल्ब
2. बँकेलाईट - इलेक्ट्रिक स्विच
3. थर्मोकोल - प्लेट्स
4. प्रकाशीय काच - भिंगे
5. पॉलिप्रोपिलीन - चटया
* खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. थर्मोकोल कोणत्या पदार्थापासून तयार करतात ?
उत्तर -
थर्मोकोल म्हणजे पॉलीस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप होय.
आ. PVC चे उपयोग लिहा.
उत्तर -
बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विदयुतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी
इ. पुढे काही वस्तूंची नावे दिली आहेत त्या कोणत्या निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थांपासून तयार होतात ते लिहा.
(चटई, पेला, बांगडी, खुर्ची, गोणपाट, खराटा,
सुरी, लेखणी)
उत्तर -
(1) चटई
निसर्गनिर्मित - सुती, तागाचे धागे, सुतळी
मानवनिर्मित - पॉलीप्रोपिलीन
(2) पेला
निसर्गनिर्मित - धातू किंवा धातू संमिश्रे
मानवनिर्मित - काच (सिलिका काच, बोरोसिलिकेट काच)
(3) बांगडी
निसर्गनिर्मित - सोने, चांदी, लाख, तांबे
मानवनिर्मित - प्लॅस्टिक, काच
(4) खुर्ची
निसर्गनिर्मित - लाकूड
मानवनिर्मित - प्लॅस्टिक (PVC)
(5) गोणपाट
निसर्गनिर्मित - ज्यूट किंवा ताग, काथ्या, कापूस
मानवनिर्मित - प्लॅस्टिक (PVC)
(6) खराटा
निसर्गनिर्मित - वनस्पती तंतू
मानवनिर्मित - प्लॅस्टिक तंतू
(7) सुरी
निसर्गनिर्मित - लोहासारखे धातू किंवा धातू संमिश्रे
मानवनिर्मित - प्लॅस्टिक
(8) लेखणी
निसर्गनिर्मित - धातू, लाकूड
मानवनिर्मित - प्लॅस्टिक
ई. काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत ?
उत्तर -
सिलिका आणि सिलिकेट
उ. प्लॅस्टिक कसे तयार करतात ?
उत्तर -
आकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक होय. सगळ्याच प्लॅस्टिकची रचना एकसारखी नसते.
* फरक स्पष्ट करा.
अ. मानवनिर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ
उत्तर -
मानवनिर्मित पदार्थ -
१) मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केले. या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात आले. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात.
२) उदा. - लाकूड, खडक, खनिजे, पाणी
निसर्गनिर्मित पदार्थ -
१) पदार्थ नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात म्हणून त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतात.
२) उदा. - काच, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकोल इत्यादी.
आ. उष्मा मृदू प्लॅस्टिक व उष्मादृढ प्लॅस्टिक
उष्मामृदू -
१) ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लॅस्टिक (उष्मामृदू) म्हणतात.
२) उदा. पॉलीथीन, PVC यांचा उपयोग खेळणी, कंगवे, प्लॅस्टिकचे ताट, द्रोण इत्यादी.
उष्मादृढ -
१) दुसरे प्लॅस्टिक असे आहे की ज्यास एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही. त्यास थर्मोसेटिंग (उष्मादृढ) प्लॅस्टिक म्हणतात.
२) याचे उपयोग म्हणजे घरातील विदयुत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण इत्यादी.
* खालील प्रश्नांची तूमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ. पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थांचा
होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा.
1. प्लॅस्टिक
उत्तर -
परिणाम - प्लास्टिक हा पदार्थ अविघटनशील आहे त्यामुळे तो वर्षानुवर्षे तसाच राहतो त्यामुळे ते पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदुषक आहे.
उपाय - प्लॅस्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरावयास हव्यात. उदाहरणार्थ, सूतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या इ.
2. काच
उत्तर -
परिणाम - १) काच तयार करताना मिश्रण 1500°C पर्यंत तापवावे लागते. यासाठी लागणाऱ्या इंधनांच्या ज्वलनातून सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो.
२) काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात.
उपाय - काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो.
3. थर्मोकोल
उत्तर -
परिणाम - १) नैसर्गिक पद्धतीने थर्मोकोलचे विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो, म्हणून बरेचसे लोक त्याला जाळून नष्ट करणे हाच उपाय समजतात. परंतु तो तर पर्यावरणीय दृष्टीने अधिकच घातक उपाय आहे. थर्मोकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात.
२) समारंभांमध्ये जेवण, पाणी, चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावळी व कप / ग्लास थर्माकोलपासून बनवलेले असतात. त्याचा परिणाम, आरोग्यावर होतो. जर थर्माकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्नपदार्थांमध्ये विरघरळण्याची शक्यता असते. त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते.
३) थर्मोकोल बनविणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर होणारा परिणाम : खूप अधिक कालावधीसाठी : स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना डोळे, श्वसनसंस्था, त्वचा, पचनसंस्थेचे आजार संभवण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो. द्रवरुप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो.
आ. प्लॅस्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत, या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल ?
उत्तर -
प्लॅस्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करू
उदाहरणार्थ, सूतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या इ.
6. टीपा लिहा.
* काचनिर्मिती
उत्तर -
काच बनविण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशिअम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात. वाळू म्हणजेच सिलिकॉन डायॉक्साईड वितळण्यास सुमारे 1700°C तापमानाची गरज असते. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. त्यामुळे सुमारे 850°C तापमानावर वितळते. मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपात गेल्यानंतर ते 1500 °C पर्यंत तापवून एकदम थंड केले जातात. एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूप घेत नाहीत, तर एकजिनसी अस्फटिक पारदर्शक रूप प्राप्त होते. यालाच सोडा लाईम काच म्हणतात.
आ. प्रकाशिय काच
उत्तर -
वाळू, सोडा, चुनखडी, बेरिअम ऑक्साइड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते. चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनविण्यासाठी शुद्ध काचेची गरज असते.
इ. प्लॅस्टिकचे उपयोग
उत्तर -
प्लॅस्टिक गंजत नाही. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. त्याच्यावर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम सहजासहजी होत नाही. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनविता येतात. आकार्यता या गुणधर्मामुळे कोणताही आकार देता येतो. उष्णता आणि विदयुतचा दुर्वाहक आहे. वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे आहे.