1. आमच्यातील वेगळे कोण आहे?
अ. दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात.
उत्तर - रेल्वे अपघात
आ. अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, त्सुनामी.
उत्तर - अवर्षण
इ. शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड.
उत्तर - टोळधाड
ई. पिके वाहून जाणे, पिकांवर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे.
उत्तर - ज्वालामुखी
2. सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय .
अ. दुष्काळ
उत्तर -
1. पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे.
2. स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे.
3. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे, तसेच वृक्षतोड थांबवणे.
4. हवामानांतील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे.
आ. वीज पडणे
उत्तर -
1. मैदानात, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
2. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नका.
3. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नका.
4. दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल, तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.
5. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका..
6. दोन व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
7. प्लग जोडलेली विदयुत उपकरणे वापरू नका. मोबाइल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका.
8. पायांखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा.
9. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा.
10. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा.
11. पक्के घर सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडितरक्षक आहे का ही माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडितरक्षक बसवून घ्या.
इ. वादळे
उत्तर -
1. इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा.
2. आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवा.
3. तुम्ही स्वतः बाहेर असलात, तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.
4. गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा. वीजपुरवठा खंडित
करा.
5. तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करा. त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना दया.
6. घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय दया.
ई. ढगफुटी
उत्तर -
1.ढगफुटी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित होतात. जागी जाणे महत्त्वाचे आहे.
2. डोंगरपायथ्याशी, नदीकिनारी किंवा समुद्राच्या किनारी थांबण्यात धोका आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे.
3. आपण सुरक्षितरीत्या घरात राहावे आणि दुसऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करावी.
3. सत्य की असत्य ते सकारण सांगा.
अ. वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते.
उत्तर
असत्य - वादळ येणार असले की तेथल्या रहिवाशांना सतर्क करायचे असते. लोकांना आधीच माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी हलवले तर प्राणहानी टळू शकते
आ. आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये.
उत्तर
सत्य - आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते. पाण्यात विजेचा प्रवाह शिरल्यास गंभीर इजा होते किंवा मृत्यूही होऊ शकतो.
इ. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे.
उत्तर -
असत्य - ज्वालामुखीचा उद्रेक अटळ नैसर्गिक घटना आहे. कोणत्याही उपायांनी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने असा उद्रेक थांबवता येणार नाही.
ई. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो.
उत्तर -
असत्य - अतिवृष्टीने पीक वाहून जाते. अशा दुष्काळाला ओला दुष्काळ असे म्हणतात.
4. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. त्सुनामी म्हणजे काय ? कशी निर्माण होते ?
उत्तर -
त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना 'त्सुनामी लाटा' म्हणतात जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते, परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते.
आ. ढगफुटी म्हणजे काय ?
उत्तर
काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. परिणामी त्या ढगांत वाफेचा अधिक साठा होतो. शीघ्र संघनन क्रियेमुळे अचानकपणे एखादया विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलिमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो याला ढगफुटी म्हणतात.
इ. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा.
उत्तर
1. शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात, त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते.
2. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते.
3. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो.
4. उष्ण वायूमुळे तापमान वाढते.
5. उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात.
ई. विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत ?
उत्तर
1. मैदानात, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
2. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नका.
3. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नका.
4. दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल, तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.
5. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका.
6. दोन व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
7. प्लग जोडलेली विदयुत उपकरणे वापरू नका. मोबाइल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका.
8. पायांखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा.
9. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा.
10. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा.
11. पक्के घर सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडितरक्षक आहे का ही माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडितरक्षक बसवून घ्या.
5. महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत?
उत्तर -
भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली आहे. पूरनियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केलेले आहेत. राष्ट्रीय स्तरापासून ते गावपातळीपर्यंत पूरनियंत्रणासंदर्भात आराखडा तयार केलेला असतो. या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते.