* रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ. सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला......म्हणतात.
उत्तर - स्तंभिका
आ. लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे ........परावर्तन असते.
उत्तर - अनियमित
इ. कॅलिडोस्कोपचे कार्य ........ गुणधर्मावर अवलंबून असते.
उत्तर - परावर्तित प्रकाशाचे परावर्तन
2. आकृती काढा.
दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी 90° चा कोन करतात. एका आरशावर आपाती किरण 30° चा आपतन कोन करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा.
उत्तर -
* आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल ?
उत्तर -
रात्रीच्या वेळी दिवा बंद केल्यास लगेच तुम्हांला खोलीतील वस्तू दिसेनाशा होतील, तर दिवा पुन्हा चालू केल्यास वस्तू पूर्ववत दिसतील म्हणजेच वस्तूंपासून येणारा प्रकाश जेव्हा परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणांस दिसू लागतात.
* नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.
उत्तर -
प्रकाशाचे नियमित परावर्तन
१) सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास 'नियमित परावर्तन' म्हणतात.
२)नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.
३) त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात.
४) जर आपाती किरणांचे आपाती कोन i1, i2, i3... असतील व त्यांचे परावर्तन कोन क्रमशः r1, r2, r3... असतील, तर
i1= i2 = i3 ------ r1 = r2 = r3 = -------
प्रकाशाचे अनियमित परार्तन (Irregular reflection) : खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास 'अनियमित परावर्तन' म्हणतात. अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात व म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान नसतात. म्हणजे i #i#i\--, r\#r,#r,#--. त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाहीत, ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात.
प्रकाशाचे अनियमित परार्तन -
१) खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास 'अनियमित परावर्तन' म्हणतात.
२) अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात
३) म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान नसतात.
४) म्हणजे i1 ≠ i2 ≠ i3 ---, r1 ≠ r2 ≠ r3 ≠ -----
त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाहीत, ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात.
* खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट
करा.
उत्तर -
* आपाती किरण - जे प्रकाशकिरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात, त्यांना आपाती किरण (Incident ray) म्हणतात
* स्तंभिका - आपतन बिंदूच्या पृष्ठभागाशी 90° चा कोन करणाऱ्या रेषेस स्तंभिका म्हणतात.आपतन कोन -
* परावर्तन कोन - परावर्तित किरण व स्तंभिकेमधील कोनास परावर्तन कोन म्हणतात.
*आपात बिंदू - आपाती किरण पृष्ठभागावर बिंदूवर पडतात, त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात.
* परावर्तित किरण - पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण (Reflected ray) म्हणतात
* आपतन कोन - आपाती किरण व स्तंभिकेमधील कोनास आपतन कोन म्हणतात.
* खालील प्रसंग अभ्यासा.
स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना.
* खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा.
अ. प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे, यांचा काही संबंध आहे का
उत्तर -
संथ पाण्यात नियमित परवर्तन होत असल्यामुळे पाण्याची प्रतिमा स्पष्टपणे दिसते पण पाण्यात दगड टाकल्यामुळे लहरी निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते त्यामुळे प्रतिमा विस्कळीत होते.
आ. यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा.
उत्तर -
१) नियमित परावर्तन
२) अनियमित परावर्तन
इ. प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का ?
उत्तर - होय.
१) सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन 40° चा असेल, तर आपतन कोन व परावर्तन कोनांची मापे काढा.
उत्तर -
सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन = 40°
आपतन कोन = i
परावर्तन कोन = r
r = परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन
= 90° - 40°
= 50°
आपतन कोन i = r = 50°
२) आरसा व परावर्तित किरण यांमधील कोन 23° असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती असेल ?
उत्तर -
r = 90° - 23°
= 67°
i=r = 67°.