१. आमचे वर्गीकरण करा.
तरफ, कप्पी, उतरण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ध्वजस्तंभाची वरची चक्री, अडकित्ता, कात्री, ओपनर, कुऱ्हाड, क्रेन, सुरी.
उत्तर
साधी यंत्रे = तरफ, कप्पी, उतरण, पाचर
चाक व आस = ध्वजस्तंभाची वरची चक्री
पाचर = कुऱ्हाड, सुई, सुरी
उतरण = घसरगुंडी, जिना
तरफ = अडकित्ता, कात्री, ओपनर.
गुंतागुंतीचे यंत्र = क्रेन
२. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा.
अ. मध्यभागी ........असून एका बाजूला...... व दुसऱ्या बाजूला....... हा तरफेचा पहिला प्रकार आहे
उत्तर - टेकू, बल, भार
आ. मध्यभागी..........असून एका बाजूला...... व दुसऱ्या बाजूला हा तरफेचा दुसरा प्रकार आहे.
उत्तर - भार, टेकू, बल
इ. मध्यभागी ....... असून एका बाजूला......... व दुसऱ्या बाजूला हा तरफेचा तिसरा प्रकार आहे.
उत्तर - बल, भार, टेकू
३. खालील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल ?त्यांचे प्रकार लिहा.
अ. टिनच्या डब्याचे झाकण काढणे.
उत्तर - टीन ओपनर
आ. उंच इमारतीवर विटा पोहोचवणे.
उत्तर - वजन उचलण्यासाठी चाक व दोरी
इ. भाजी चिरणे.
उत्तर - सुरी किंवा विळी
ई. विहिरीतून पाणी काढणे.
उत्तर - रहाट व दोरखंड
उ. पापड भाजणे.
उत्तर - चिमटा
४. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. साधी यंत्रे म्हणजे काय ?
उत्तर
ज्या यंत्रांची रचना साधी आणि सोपी असते त्याला साधी यंत्रे म्हणतात.
आ. यंत्र वापरण्याचे फायदे सांगा.
उत्तर
श्रम कमी व्हावे, कमी वेळात अधिक काम व्हावे यांसाठी यंत्रे वापरली जातात.
इ. गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय ?
उत्तर
या यंत्रांमध्ये अनेक भाग आहेत. एक काम पूर्ण करण्यासाठी त्यांत अनेक प्रक्रिया होत असतात. त्यासाठी या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात म्हणून या यंत्रांना 'गुंतागुंतीची यंत्रे' म्हणतात.
ई. तरफ म्हणजे काय? तरफेचे प्रकार कशावरून केलेले आहेत ?
उत्तर
शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत आहे. अशा यंत्राला 'तरफ' म्हणतात. तरफेचे बल, भार आणि टेकू हे तीन भाग असतात.
बल, भार आणि टेकू यांच्या स्थानांवर तरफेचे तीन प्रकार पडतात
पहिल्या प्रकारात टेकू मध्यभागी असतो; दुसऱ्या प्रकारात भार मध्यभागी असतो आणि तिसऱ्या प्रकारात बल मध्यभागी असते.
५. असे का?
अ. प्रवासी बॅगांना चाके असतात.
उत्तर - चाक हे साधे यंत्र आहे. प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती ढकलत नेणे सोपे असते. यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात.
आ. यंत्राची निगा राखावी लागते.
उत्तर
यंत्रे वापरली जात असताना त्यांचे भाग एकमेकांवर घासतात. धूळ बसून खराब झालेल्या भागांमध्ये अधिक घर्षण होते. हवामानाच्या परिणामाने काही भाग गंजतात असे भाग घासले जाऊन त्यांची झीज होते. त्यामुळे यंत्रे निकामी होतात. हे टाळण्यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते.
यंत्राची निगा राखताना त्यांचे सर्व भाग पुसून स्वच्छ केले जातात. एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागांत वंगण सोडतात, जेणेकरून त्यांमधील घर्षण कमी होऊन त्यांची झीज कमी होईल. वापरात नसताना त्यावर धूळ बसू नये म्हणून यंत्रे झाकून ठेवली जातात. हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यंत्रातील धातूंपासून बनलेल्या भागांवर रंग दिला जातो आणि यंत्रे कोरडी राहतील याची दक्षता घेतली जाते.
इ. सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे.
उत्तर
सायकल हे अनेक साधे यंत्र एकत्र होऊन बनलेले गुंतागुंतीचे यंत्र आहे जसे हॅण्डल, चाक , चैन, इत्यादी
६. खाली दिलेल्या उताऱ्यातील तरफेमध्ये टेकू, भार, बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा.
रवी व सविता बागेमध्ये एका सी-सॉ वर बसतात.दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो. तो माणूस बागेतील कचरा, दगडगोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो. नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो. सरबत विक्रेता लिंबू चिरून लिंबू पिळणीच्या साहाय्याने सरबत करून देतो व त्या ग्लासामध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो.
उत्तर
सी-सॉ
टेकू - मध्यभागी
भार - दुसऱ्या बाजूला
बल - एका बाजूला
प्रकार - पहिला
कात्री
टेकू - मध्यभागी
भार - दुसऱ्या बाजूला
बल - एका बाजूला
प्रकार - पहिला
कचरागाडी
टेकू - एका बाजूला
भार - मध्यभागी
बल - दुसऱ्या बाजूला
प्रकार - दुसरा
लिंबू पिळणी
टेकू - एका बाजूला
भार - मध्यभागी
बल - दुसऱ्या बाजूला
प्रकार - दुसरा
चिमटा
टेकू - दुसऱ्या बाजूला
भार - मध्यभागी
बल - एका बाजूला
प्रकार - तिसरा
Arpita
ReplyDeleteMalti Pawar
ReplyDelete