१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ. ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात, त्या जोडणीला.... म्हणतात.
उत्तर - सांधा
आ. बाह्यत्वचेच्या थरांमधील पेशींत.. नावाचे रंगद्रव्य असते.
उत्तर - मेलॅनिन
इ. मानवी त्वचेचे......व..... दोन थर आहेत.
उत्तर - अधित्वचा, अंतस्त्वचा
ई. मानवी अस्थिसंस्था भागात विभागली जाते.
उत्तर - दोन
जोड्या जुळवा
'अ' गट
उत्तर
१. उखळीचा सांधा - खांदा
२. बिजागिरीचा सांधा - गुडघा
३. सरकता सांधा - मनगट
३. चूक की बरोबर ते लिहा. जर वाक्य चुकीचे असेल, तर दुरुस्त करून लिहा.
अ. हाडांची रचना मऊ / मृदू असते.
उत्तर - चूक ( हाडांची रचना कठीण असते )
ब. मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतरेंद्रियांचे रक्षण करते.
उत्तर - बरोबर
४. योग्य त्या ठिकाणी अशी खूण करा.
अ. शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे...
उत्सर्जन संस्था
अस्थिसंस्था
श्वसन संस्था
रक्ताभिसरण संस्थ
उत्तर - अस्थिसंस्था
ब. पायांची व हातांची बोटे यांत ....... सांधा असतो. प्रकारचा
बिजागिरीचा सांधा
उखळीचा सांधा
अचल सांधा
सरकता सांधा
उत्तर - बिजागिरीचा सांधा
५. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्ये करते ?
उत्तर -
१) शरीराच्या अंतरंगाचे जसे, स्नायू, हाडे, इंद्रियसंस्था इत्यादींचे रक्षण करणे.
२) शरिरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे.
३) 'ड' जीवनसत्त्वाची निर्मिती करणे.
४) शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे.
५) उष्णता, थंडी यांपासून संरक्षण करणे.
६) त्वचा स्पर्शेद्रिय म्हणून कार्य करते.
आ. तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल ?
उत्तर
कॅल्शिअमयुक्त फळे, भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश हवा. नियमित व्यायाम, चलनवलन यानेही हाडे मजबूत राहतात.
इ. मानवी अस्थिसंस्थेची कार्ये कोणती ?
उत्तर -
१) शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण होते
२) हाडांमध्ये शरीराला आधार मिळतो
३) शरीराला विशिष्ट आकार हाडांमुळेच मिळतो
ई. आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा.
उत्तर -
१) अपघातात पडणे
२) हाडे कमकुवत झाल्यावरही ते मोडण्याची शक्यता असते
3. हाडांचे प्रकार किती व कोणते ?
उत्तर -
१) चपटी हाडे
२) लहान हाडे
३) अनियमित हाडे
४) लांब हाडे.
६. काय होईल ते सांगा.
अ. जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले, तर ?
उत्तर - आपण हालचाल करू शकणार नाही
आ. आपल्या त्वचेमध्ये 'मेलॅनिन' नावाचे रंगद्रव्यच नसले, तर ?
उत्तर -
१) आपल्या त्वचेचा रंग हा मेलॅनिन मुळेच ठरतो जर मेलॅनिन नसेल तर त्वचा पांढरी दिसेल
२) आपल्या त्वचेचे व आतील भागाचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते.
इ. आपल्या शरीरातील मणक्याच्या ३३ हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते, तर ?
उत्तर -
१) आपण बसणे, वाकणे या क्रिया आपल्याला करता आल्या नसत्या
७. आकृती काढा.
अ. सांध्यांचे विविध प्रकार
आ. त्वचेची रचना
> /
ReplyDelete