प्रश्न १. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
(१) ध्वनीचे प्रसारण......मधून होत नाही.
उत्तर - निर्वात पोकळी
(२) ध्वनी प्रदूषण ही एक ........आहे.
उत्तर - सामाजिक समस्या
(३) कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला........ म्हणतात.
उत्तर - गोंगाट
(४) गोंगाटाचा........वर वाईट परिणाम होतो.
उत्तर - कानावर
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. कंपन म्हणजे काय ?
उत्तर
ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची, म्हणजेच स्पीकरचा पडदा, रबरबँड, तबल्याचा पडदा यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते, म्हणजेच या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते. जलद गतीने आंदोलन होत असते म्हणजेच वस्तूचे कंपन होत असते.
आ. ध्वनीचे प्रसारण स्थायूंतून कसे होते, हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
उत्तर
आपण दरवाजावर टकटक केली की, दरवाजाच्या पलीकडे असणाऱ्याला आवाज स्पष्ट येतो.
इ. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ?
उत्तर
ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय.
ई. ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल ?
उत्तर -
१) गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नयेत.
२) घरातील टीव्ही, रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत
३) वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी.
४) कारखाने, विमानतळे, रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत.
* तक्ता पूर्ण करा
ध्वनीचे स्वरूप
बोलणे - त्रासदायक नसणारे
कुजबुजणे - त्रासदायक नसणारे
विमानाचा आवाज - त्रासदायक
गाड्यांचे हॉर्न - त्रासदायक
रेल्वे इंजिनचा आवाज - त्रासदायक
पानांची सळसळ - त्रासदायक नसणारे
घोड्यांचे खिंकाळणे - त्रासदायक नसणारे
घड्याळाची टिक्टिक् - त्रासदायक नसणारे