* रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ. ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला...... म्हणतात. तर कमी दाब व घनतेच्या भागाला .....म्हणतात.
उत्तर - संपीडन , विरलन
आ. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज......
उत्तर - असते
इ. एका ध्वनीतरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या १००० इतकी आहे. या ध्वनीतरंगाची वारंवारिता. Hz इतकी असेल.
उत्तर - 500 Hz
ई. वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची वेगवेगळी असते.
उत्तर - वारंवारिता
उ. ध्वनिक्षेपकामध्ये ऊर्जेचे रूपांतर. ऊर्जेमध्ये होते.
उत्तर - यांत्रिक , ध्वनी
* योग्य जोड्या जुळवा.
मानवी स्वरयंत्र - स्वरतंतुंची कंपने
ध्वनिक्षेपक - पडदयाची कंपने
जलतरंग - हवेच्या स्तंभातील कंपने
नादकाटा - धातूच्या भुजांची कंपने
तानपुरा - तारेची कंपने
* शास्त्रीय कारणे सांगा.
अ. तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूंवरचा ताण बदलणे आवश्यक असते.
उत्तर -
फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूंवरील ताण कमी जास्त करू शकतात. स्वरतंतूंवरील ताण वेगवेगळा असल्यास निर्माण होणारा ध्वनीही वेगळा असतो.
आ. चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही.
उत्तर -
चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहून बोलले तरी त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येणार नाही. चंद्रावर हवा नाही. ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम दोन अंतराळवीरांमध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. यामुळे ते अंतराळवीर भ्रमणध्वनीसारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते.
इ. ध्वनीतरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते.
उत्तर -
3. गिटारसारख्या तंतूवादयातून आणि बासरीसारख्या फुंकवादयातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते ?
उत्तर -
तंतुवाद्यांमध्ये वापरलेल्या तारांवरचा ताण कमी-जास्त करून तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटांनी कमी-जास्त करून कंपनांची वारंवारिता बदलली जाते. यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते.
बासरीसारख्या फुंकवादयात बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून, बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी-जास्त केली जाते. त्यामुळे कंपनाच्या वारंवारितेमध्ये बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. याचप्रमाणे बासरीवादनासाठी वापरलेली फुंक बदलूनही वेगळ्या स्वरांची निर्मिती होते.
4. मानवी स्वरयंत्रापासून आणि ध्वनिक्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो ?
उत्तर -
मानवामध्ये ध्वनी हा स्वरयंत्रामध्ये निर्माण होतो. घास गिळताना आपल्या हाताची बोटे घशावर ठेवल्यास काहीसा हालणारा एक उंचवटा तुम्हांला जाणवेल. हेच ते स्वरयंत्र (Larynx). आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये दोन स्वरतंतू (Vocal Cords) असतात. या स्वरतंतूंमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूंवरील ताण कमी जास्त करू शकतात. स्वरतंतूंवरील ताण वेगवेगळा असल्यास निर्माण होणारा ध्वनीही वेगळा असतो.
दोन चुंबक एकमेकांजवळ आणल्यास त्यांच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते, हे तुम्ही पाहिलेच असेल. अशाच प्रकारे, इथे कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागे-पुढे हलू लागते. कुंतलाचे हे हलणे, म्हणजेच त्याची वारंवारिता आणि आयाम, त्यातून वाहणारा विदयुत प्रवाह कशाप्रकारे बदलत आहे, त्यावर अवलंबून असते. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडदयाची मागे पुढे हालचाल होवू लागते.
नादकाट्याच्या भुजांच्या मागे-पुढे होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनीतरंग निर्माण होतात. याचप्रकारे, येथे ध्वनिक्षेपकाच्या पडदयाच्या मागे-पुढे अशा होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनीतरंग निर्माण होतात.
ध्वनी निर्मिती करत असलेल्या एखादया ध्वनिक्षेपकाच्या पडदयाला हलकासा स्पर्श करून या पडदयाच्या कंपनांचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा.
• ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा.
उत्तर -
ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते, हे प्रयोगाने सिद्ध करता येते. प्रयोगाची रचना आकृती मध्ये दाखविली आहे. या रचनेत काचेची एक हंडी (Bell jar) सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे. एका नळीमार्फत ही हंडी एका निर्वात पंपाला (Vacuum-pump) जोडली आहे. निर्वात-पंपाच्या साहाय्याने आपण हंडीतील हवा बाहेर काढू शकतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे, हंडीमध्ये एक विदयुत-घंटी (Electric bell) असून तिची जोडणी हंडीच्या झाकणाद्वारे केलेली आहे.
प्रयोगाच्या सुरवातीला निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असेल. यावेळी, विदयुत घंटीची कळ दाबली असता, तिचा आवाज हंडीच्या बाहेर ऐकू येईल. आता निर्वात-पंप सुरू केल्यास, हंडीतील हवेचे प्रमाण कमी कमी एकमे होत जाईल. हवेचे प्रमाण जसे जसे कमी होईल, तशी तशी एकमेक विदयुत-घंटीच्या आवाजाची पातळीही कमी कमी होत जाईल. नाही. निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच दोन कमी होईल. अशा वेळी विदयुतघंटीचा आवाज अत्यंत क्षीण माध्यम असा ऐकू येईल. या प्रयोगावरून हे सिध्द होते की ध्वनीच्या नाही. निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता वापरून असते.