प्रकाश व छायानिर्मीती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Prakash Va Chayanirmiti swadhyay std 6th General Science digest prashna uttare

 







प्रश्न १. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा 


(पर्याय : सात, तारे, आरपार, पारदर्शक, अपारदर्शक, रंग, आकार, सुलटी, उलटी, दीप्तिमान, मेणबत्ती.) 





१) प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान आहे.


उत्तर - तारे


२) हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहे. 


उत्तर - मेणबत्ती


३) लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो रंगांत विभागतो. 


उत्तर - सात


४) सूचिछिद्र प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा असते.


उत्तर - उलटी


५) छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये वस्तू आल्यामुळे होते.


उत्तर - अपारदर्शक



६) प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये वस्तू आली की, त्यातून प्रकाश जातो.


उत्तर - पारदर्शक, आरपार.





खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिहीन किंवा दीप्तीमान आहे ते लिहा.

उत्तर -


वस्तू - दीप्तिहीन


पुस्तक - दीप्तिहीन


पेटलेली मेणबत्ती - दीप्तिमान


मेणकापड - दीप्तिहीन


पेन्सिल - दीप्तिहीन


पेन - दीप्तिहीन 


बल्ब -दीप्तिमान


टायर - दीप्तिहीन


विजेरी - दीप्तिमान




३. सांगा मी कोणाशी जोडी लावू?


उत्तर


'अ गट


अ. आरसा - परावर्तन

 

आ. काजवा - दीप्तिमान


इ. सूचिछिद्र प्रतिमाग्राहक - उलट प्रतिमा


ई. चंद्र - दीप्तिहीन






४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ? 

उत्तर

छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्या परस्परांमधील अंतर व दिशेवर अवलंबून असते.



आ. वस्तू केव्हा दिसू शकते ?

उत्तर

प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाशकिरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. याला 'प्रकाशाचे परावर्तन' म्हणतात. परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोचली की वस्तू आपल्याला दिसते.



इ. छाया म्हणजे काय ?

उत्तर 

एखादी अपारदर्शक वस्तू जेव्हा तिच्यावर प्रकाश पडतो तो प्रकाश त्या वस्तूंमुळे अडवला जातो आणि वस्तुपलिकडे असलेल्या पृष्ठभागावर जिथे प्रकाश पोहोचत नाही असा भाग काळा दिसतो.

Post a Comment

Previous Post Next Post