पेशीरचना आणि सूक्ष्मजीव स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Peshirachana ani sukshmjiv Swadhyay Std 7th General Science solution

 





1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. पेशी म्हणजे काय ?

उत्तर -

पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे.



आ. पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत ?

उत्तर -

केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, रायबोझोम, गॉल्जीपिंड, लयकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिक पेशींमधील विविध अंगके आहेत.


इ. सूक्ष्मजीव म्हणजे काय ?

उत्तर -

पृथ्वीतलावर असंख्य सजीव आहेत. त्यांपैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात




ई. सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते?

उत्तर -

आकार व जीवनप्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल, कवके, आदिजीव, जीवाणू, विषाणू यांमध्ये वर्गीकरण केले जाते.




2. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.



अ. हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते.

उत्तर - लवक



आ. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे .......मध्ये रूपांतर होते.

 उत्तर - खतामध्ये



इ. पेशीमध्ये......... मुळे प्रकाश संश्लेषण होते.

उत्तर -  हरितलवका



ई. ............अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो

उत्तर - सूक्ष्मजीव/पेशिअंगकाच्या




 3. आमच्यातील फरक काय आहे?


उत्तर -


अ. वनस्पती पेशी व प्राणी पेशी 


वनस्पती पेशी


1. वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली

पेशीभित्तिका असते.

2. यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते.

3. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे यातील एका कडेला सारल्यासारखे दिसते.

4. यामध्ये लयकारिका नसतात.

5. यामधल्या तंतुकणिकांची संख्या कमी असते. 

6. लवके केवळ वनस्पती पेशीतच आढळतात.

7. यातील रिक्तिका एक किंवा जास्त आणि आकाराने

मोठ्या असतात.

8. यातील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असतात.



प्राणी पेशी

 

1. प्राणी पेशीत अशी पेशीभित्तिका नसते.

2. यातील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते.

3. यातील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते.

4. यामध्ये लयकारिका असतात.

5. यामधल्या तंतुकणिकांची संख्या जास्त असते.

6. यात लवके नसतात.

7. यातील रिक्तिका आकाराने लहान आणि तात्पुरत्या निर्माण झालेल्या असतात.

8. यातील रिक्तिका अन्नाने किंवा टाकाऊ पदार्थांनी

भरलेल्या असतात.





आ. आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशी


 आदिकेंद्रकी पेशी


1. आदिकेंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो.

2. आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात.

(1 ते 10 um).

3. यात केंद्रकपटल नसल्याने पेशीद्रव्याशी थेट संबंध येतो. केंद्रकद्रव्याचा

4. आदिकेंद्रकी पेशीतील पेशीअंगके पटलविरहित असतात.

5. आदिकेंद्रकी पेशीत अस्पष्टसा केंद्रकाभ असतो व

यात डी.एन.ए. सारखी जनुकीय द्रव्ये असतात. या केंद्रकाभात एकच गुणसूत्र असते.


6. या प्रकारच्या पेशीत तंतुकणिका नसतात. 

7. हरितद्रव्य गोलीय पीटिकांमध्ये असते.

8. जीवाणू आणि नीलहरित शैवालांमध्ये आदिकेंद्रकी पेशी आढळतात.



दृश्यकेंद्रकी पेशी


1. दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये केंद्रकपटल, केंद्रकी आणि केंद्रकद्रव्य असलेले केंद्रक असते.

2. दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. (5 ते 100 um).

3. केंद्रकपटलामुळे केंद्रकद्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशीद्रव्यात मिसळत नाही.

4. दृश्यकेंद्रकी पेशीतील पेशीअंगकांना पटलाचे आवरण असते.

5. दृश्यकेंद्रकी पेशीत सुस्पष्ट केंद्रक असून त्यात अनेक गुणसूत्रे असतात. या गुणसूत्रांत डी.एन.ए.चे रेणू असतात.

6. या पेशीत तंतुकणिका असतात.

7. हरितद्रव्य लवकांमध्ये असते.

8. उच्चविकसित बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांत दृश्यकेंद्रकी पेशी आढळतात.



वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.







वनस्पती पेशी


1) वनस्पती पेशीच्या सर्वांत बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते. 

2) पेशीपटल पेशीभित्तिकेच्या आत असतो. त्याच्या आत पेशीद्रव असतो. यात काही पेशीअंगके असतात. 

3) लवके हे महत्त्वाचे पेशीअंगक केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते. त्यापैकी हरितलवक प्रकाश-संश्लेषण करू शकते. 

4) केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, गॉल्जीपिंड, तंतुकणिका ही इतर पेशीअंगके पेशीद्रवात विखुरलेली असतात. 

5) रिक्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते. रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशीद्रव कडेला सरकलेला दिसतो.



 प्राणी पेशी


1) प्राणी पेशीच्या सर्वांत बाहेर पेशीपटल असते. 

2) पेशीपटलाच्या आत पेशीद्रव असतो. हा सर्व बाजूने पसरलेला असतो. यात काही पेशीअंगके असतात. 

3) पेशीअंगके पुढीलप्रमाणे असतात : केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, गॉल्जीपिंड, लयकारिका, तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका. 

4) प्राणी पेशीत लवके नसतात.






5. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा.



सूक्ष्मजीवांची उपयुक्तता -


रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार अशा रोगाची लस अगोदरच टोचलेली असेल, तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते व त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी होते.


कातडी कमावणे, घायपातापासून धागे मिळवणे ह्या प्रक्रियांमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. त्यांच्या मदतीने समुद्रात तेलगळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते.


शेतातील पालापाचोळा व कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्रांच्या माध्यमातून जैववायू व खतनिर्मिती केली जाते.




सूक्ष्मजीवांची हानिकारकता -


जलाशयांजवळील अस्वच्छता व सांडपाण्याशी संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या, उघड्यावरील (माश्या बसलेल्या) अन्नात सूक्ष्मजीव असतात. असे दूषित अन्न सेवन केल्यास आमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होतात. श्वसनमार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसनमार्गात जाऊन सर्दी, खोकला, घटसर्प, न्यूमोनिया, क्षय असे रोग होऊ शकतात.


कचऱ्याचे ढीग, गटारे, साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास वाढते. डासांच्या मादयांच्या दंशांतून हिवताप (मलेरिया), डेंग्यू, हत्तीरोग, पीतज्वर (Yellow fever), चिकुनगुनिया, झिका ताप (Zika fever) इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.





6. कारणे लिहा.


अ. महापूर, अतिवृष्टी या काळांत रोगप्रसार होतो.

उत्तर -

महापूर आणि अतिवृष्टी यांमुळे सगळीकडे पाणी साचून जंतूंचा प्रादुर्भाव होतो. घरमाशीचे प्रजनन होऊन जंतुप्रसाराला त्या पूरक ठरतात. दमट हवामानामुळे अन्नदेखील लवकर खराब होते. पूर ओसरला तरी पाण्याच्या डबक्यांमुळे डास निर्माण होतात. डास अनेक रोगांना कारणीभूत होतात. अशा अनेक बिघडून ज कारणांनी महापूर, अतिवृष्टी या काळांत रोगप्रसार होतो.



आ. शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते.

उत्तर -

अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो. हे सूक्ष्मजीव एन्टेरोटॉक्झिन्स या विषारी निर्मिती करतात. हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विषबाधा होते. म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते.



इ. जमीन मशागतीमध्ये माती खाली-वर करतात.

उत्तर -

मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात. त्यांच्यामुळे खतनिर्मिती होते. तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात. या जीवाणूंमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकड भागते. म्हणून पिकांची होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खाली-वर करून जीवाणूंची सरमिसळ करतात.




ई. बुरशी ओलसर जागी चटकन वाढते.

उत्तर -

बुरशीच्या वाढीसाठी ओलसर, उबदार आणि दमट जागा आवश्यक असते. कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही.



उ. घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात.

उत्तर - 

  शीतकपाटात कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत.थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत. त्यांची वाढ 15°C ते 35°C याच तापमानात होऊ शकते. म्हणून अन्नपदार्थ टिकवण्यासाठी शीतकपाटांचा वापर केला जातो.


ऊ. पाव तयार करताना फुगतो.

उत्तर -

पाव तयार करताना त्यात यीस्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो. यीस्ट किण्वन प्रक्रिया करतो. त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्यामुळे पाव तयार करताना तो फुगतो.


ए. दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात.

उत्तर -

आंबोण हे गुरांचे खादय आंबवले जाते. आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात. जीवनसत्त्वांची वाढ होते. दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्याचे चांगले पोषण केले जाते. म्हणून दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात.



7. साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल ? कसा ते सविस्तर लिहा.

उत्तर -

1) साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो. त्याच्याखाली कीटक शरीर, फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात. 

2) केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात. 

3) याच्यात 100 ते 450 पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते. त्यामुळे पेशी, ऊती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो.

4) ज्या वस्तूचे निरीक्षण करावयाचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मंचावर हा आपला निरीक्षण-नमुना ठेवता येतो.  

5) संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात.

6) काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली जाते. मंचाखालचा प्रकाशस्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो. 

 7) नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते. 

 8) अगोदर स्थूल समायोजक वापरून आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते.

 9) आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरणसंपात स्थानात (Focus) दृष्टी एकाग्र करू शकतो. अशा रितीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो.




1 Comments

Previous Post Next Post