मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Manavi snayu va Pachansanstha swadhyaya prashna uttare std 7th general science solution

 







1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.


अ. पचनाची क्रिया .........पासून सुरू होते. 

(जठर / मुख)

उत्तर - मुख



आ. पापण्यांमध्ये.......... प्रकारचे स्नायु असतात. (ऐच्छिक/अनैच्छिक)

उत्तर - ऐच्छिक



इ. स्नायूसंस्थेचे.............हे कार्य नाही असतात.  

(रक्तपेशी बनवणे / हालचाल करणे)

 उत्तर - रक्तपेशी बनवणे 



ई. हृदयाचे स्नायू हे.......असतात

 (सामान्य स्नायू / हृद स्नायू)

उत्तर - हृद स्नायू




उ. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ........चे कार्य आहे. 

(जठर / ग्रासनलिका)

उत्तर - ग्रासनलिका



2. सांगा माझी जोडी कोणाशी ?


'अ' गट


1. हृद् स्नायू - आम्ही कधीच थकत नाही


2. स्नायूंमुळेच होतात - जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली


3.पेप्सिन - जाठररसातील विकर


4. पेटके येणे - स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन


5. अस्थिस्नायू - नेहमीच जोडीने कार्य करतात. 




3. खोटे कोण बोलतोय ?


अवयव



1. जीभ - माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात.

उत्तर -

जीभ खोटं बोलत आहे कारण जीभ सर्व चवी ओळखते.


2. यकृत -  मी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे.

उत्तर -

यकृत खरे बोलत आहे.


3. मोठे आतडे - माझी लांबी 7.5 मीटर आहे.

उत्तर -

मोठे आतडे खोटं बोलत आहे त्यांची लांबी १.५ मीटर आहे.



4. ॲपेंडिक्स - पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही.

उत्तर -

ॲपेंडिक्स खोटं बोलत आहे कारण ॲपेंडिक्स हे शरीरातील कोणतेच कार्य करत नाही



5. फुफ्फुस - उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो.

उत्तर -

फुफ्फुस खोटं बोलत आहे त्याचाही उत्सर्जन क्रियेत सहभाग असतो.



4. कारणे लिहा.


अ. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते.

उत्तर -

जठराच्या भित्तिकेत जाठरग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते.


आ. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

उत्तर -

हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालु असते. म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात.




इ. मादक पदार्थांचे सेवन करू नये.

उत्तर -

मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते. म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये.



 ई. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत.

उत्तर -

आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात. ते जर व्यवस्थित नसले, तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात. म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत.




5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते ? 

उत्तर -

स्नायू मुख्यतः तीन प्रकारचे असतात 

1. अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू 

2. हृदयाचे स्नायू किंवा  हृद् स्नायू 

3. मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू


आ. आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर का परिणाम होतो ?

उत्तर -

जठर आम्ल तयार करते आणि पित्तरस यकृत तयार करते. दोन्हीचे सामू निरनिराळे आहेत. याच्याप्रमाणे आम्लपित्त वाढले की डोके दुखते उलट्या होतात, अंगावर पुरळ उठते इत्यादी. काही लोक आम्लपित्ताला अॅसिडीटी असेही म्हणतात.


इ. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे ?

उत्तर -

दातांचे प्रमुख चार प्रकार आहेत. ते म्हणजे पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा होय. यांपैकी  पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेष वाढलेले नसतात. भक्ष्याची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर आहारातील प्रथिनांचे चर्वण करायला होतो.



6. पचनसंस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे दया व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर -

तोंड : तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते. त्याचे बारीक बारीक तुकडे होतात.


ग्रसनी / घसा : अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.


जठर : अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जाठरग्रंथींमधून जाठररस स्रवतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्यूकस (श्लेष्म) हे जाठररसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते.


लहान आतडे : लहान आतडे


सुमारे सहा मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.


मोठे आतडे : मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला 'ॲपेंडिक्स' हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.


लाळग्रंथी : कानशिलांजवळ आणि | घशाजवळ जिभेखाली असलेल्या | वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. |तेथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते.


यकृत यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात.



स्वादुपिंड: स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. त्यात अनेक विकरे असतात.









Post a Comment

Previous Post Next Post