कंसातील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा.
अ. विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे. त्यासाठी लावले असता घडेल. कारण पाण्याचे होणार आहे.
(विस्थापन, कार्य, बल)
उत्तर - बल,कार्य, विस्थापन
आ. घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल. म्हणजेच ऊर्जेत होईल. ऊर्जेचे रूपांतरण
(गतिज, स्थितिज, गती)
उत्तर - गती, स्थितिज, गतिज
इ. दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल. ऊर्जेचे रूपांतरण ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय.
(प्रकाश, अणू, रासायनिक, सौर)
उत्तर - रासायनिक , प्रकाश
ई. सौर चूल हे सूर्याच्या. ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विदयुतघट व सौर दिवे हे सूर्याच्या ऊर्जेचे उपयोजन आहे. (प्रकाश, रासायनिक, उष्णता)
उत्तर - उष्णता, प्रकाश
उ. एका मजुराने चार पाट्या खडी १०० मीटर अंतरावर वाहून नेली. जर त्याने दोन पाट्या खडी २०० मीटर अंतरावर वाहून नेली, तर कार्य घडेल.
(समान, अधिक, कमी)
उत्तर - समान
ऊ. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे....होय.
(ऊर्जा, विस्थापन, बल)
उत्तर - ऊर्जा
२. सांगा मी कोणाशी जोड़ी करू ?
'अ' गट
१. घरंगळणारा पदार्थ - गतिज ऊर्जा
२. अन्न - रासायनिक ऊर्जा
३. ताणलेले धनुष्य - स्थितिज ऊर्जा
४. सूर्यप्रकाश - उष्णता ऊर्जा
५. युरेनिअम - अणुऊर्जा
३. काय सांगाल ?
अ. विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल ?
उत्तर - ज्या वेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते; तेव्हा विस्थापन झाले, असे म्हणता येईल.
आ. कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल ?
उत्तर - कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल.
इ. ऊर्जेची विविध रूपे कोणती ?
उत्तर - यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विदयुत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत.
ई. निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा.
उत्तर - जलचक्राच्या प्रक्रियेमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफेचे ढग होतात.त्यांच्यापासून पाऊस पडतो, पाणी नद्यांमधून वाहून धरणांमध्ये साठते. धरणाचे पाणी उंचावर असल्यामुळे त्यात स्थितिज ऊर्जा असते. ते खाली येत असताना स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होते असे पाणी जनित्रातील पात्यावर पडले, की त्याची गतिज ऊर्जा जनित्राला मिळते व पाती फिरल्यामुळे विदयुत ऊर्जेची निर्मिती होते पुढे त्याचे रूपांतर विविध ऊर्जेत होते.
उ. ऊर्जा बचत का करावी ?
उत्तर - ऊर्जा बचत करणे काळाची गरज आहे. अन्यथा जागतिक तापमानवाढीसारख्या गंभीर समस्येला तोंड दयावे लागेल.
ऊ. हरित ऊर्जा कशाला म्हणतात ?
उत्तर - ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कार्बन, त्याचे विविध घटक जसे, कार्बन डायॉक्साइड व धूर व कार्बन मोनॉक्साइड निर्माण होत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना 'हरित ऊर्जा स्रोत' म्हणतात. अशा स्रोतांच्या वापराची आज गरज आहे.
ए. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात ?
उत्तर - हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहेत व विविध स्वरूपांत ते पुन्हा पुन्हा वापरले जातात. उदा. सौर ऊर्जा , पवन ऊर्जा
ऐ. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो ?
उत्तर - सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर केला गेला आहे आणि त्यामुळे अन्न शिजवणे, पाणी गरम करणे, धान्य वाळवणे शक्य झाले आहे. जसे, सौर चूल, सौर जलतापक, सौर शुष्कक, सौरविदयुत घट इत्यादी.तसेच सौर विदयुत घटामुळे विदयुत ऊर्जा मिळवणे शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात विदयुत निर्मिती करण्याची क्षमता सौर विदयुत संयंत्रात आहे. या संयंत्रात अनेक सौर विदयुतघट असतात.
ओ. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे?
उत्तर - हे ऊर्जा स्त्रोत नवीकरणीय आहेत. त्यांचा साठा न संपणारा आहे. याउलट पारंपरिक ऊर्जास्त्रोत संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाहीत. तसेच यांच्या वापरामुळे प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यांसारख्या समस्या उद्भवतात.
४. आमच्यात वेगळा कोण ?
१. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा
उत्तर - वाहता वारा
२. धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक, दप्तर उचलणे.
उत्तर - टेबलावर ठेवलेले पुस्तक
३. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल
उत्तर - पेट्रोल
४ बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात ए.सी. चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे.
उत्तर - घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे.
खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा.
उत्तर -
१) उष्णता
२) स्थितिज
३) गतिज
४) विदयुत
५) पवन
६) रासायनिक.