बल व बलाचे प्रकार स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Bal Va Balache Prakar Swadhyay std 6th General Science solution




१. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा.


अ...........वस्तूची........बदलण्यासाठी.......लावावे लागते.

 (बल, गतिमान, दिशा) 

उत्तर - गतिमान, बल, दिशा




आ. हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर............व............ ही बले लावलेली असतात. 

(स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, घर्षण बल) 

उत्तर - स्नायू बल, घर्षण बल, गुरुत्वीय बल



इ. एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला. त्याची ......... असेल, तर त्यावर लावावे लागते.

 (बल, गती, गुरुत्वाकर्षण)

उत्तर - गती ,बल



उ. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या..........कार्य करते. 

(दिशेने, विरोधात)

उत्तर - विरोधात






शोधा पाहू, माझा सोबती कोण ?


'अ' गट


१. बैलाने गाडी ओढणे - स्नायू बल

२. क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे - चुंबकीय बल

३. ताणकाट्याने वजन करणे - गुरुत्वीय बल

४. सायकलला ब्रेक लावणे - घर्षण बल

५. घासलेल्या प्लॅस्टिक -     स्थितिक विदयुत  कागदाचे कपटे बलपट्टीने उचलणे 








३. खालील उदाहरणांमध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा.


अ. उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू 

उत्तर - गुरुत्वीय बल


आ. आकाशातून जाणारे विमान.

उत्तर - यांत्रिक बल, स्नायू बल, घर्षण बल, गुरुत्वीय बल



इ. उसाच्या चरकातून रस काढताना

उत्तर - यांत्रिक बल, स्नायू बल, घर्षण बल



ई. धान्य पाखडले जात असताना 

उत्तर - स्नायू बल, गुरुत्वीय बल




४. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


स्नायू बल, गुरुत्वीय बल, यांत्रिक बल, स्थितिक विदयुत बल, घर्षण बल व चुंबकीय बल 



* स्नायू बल

उत्तर - स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात.

उदा. - वजन उचलताना स्नायूंचा उपयोग होतो.


* गुरुत्वीय बल

उत्तर - पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात.

उदा. - आपण कोणतीही वस्तू आकाशात फेकली असताना. ती परत जमिनीवर येते.



* यांत्रिक बल

उत्तर - यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात.

उदा. - शिलाई मशिन, विद्युत पंप , वॉशिंग मशिन , मिक्सर इत्यादी



* स्थितिक विदयुत

उत्तर - घर्षणामुळे पदार्थांवर विदयुतभार निर्माण होतो. अशा विदयुतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विदयुत बल म्हणतात.

उदा.- रबर, प्लॅस्टिक, एबोनाईट


* घर्षण बल

उत्तर - दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यांमध्ये घर्षण बल कार्य करू लागते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते.

उदा. - सायकल चालवताना ब्रेक लावला, की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते.



* चुंबकीय बल 

उत्तर - चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला 'चुंबकीय बल' म्हणतात.

उदा. - टेबलावर एक चुंबक ठेवा. एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या. तो चुंबकाला चिकटतो.



असे का ?


अ. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते.

उत्तर -

जर यंत्रात तेल घातलेले नसेल तर त्याचे निरनिराळे भाग घर्षण करतील. यामुळे घर्षण बल वाढेल आणि कामाच्या गतीला विरोध होईल. असे होऊ नये म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते.




आ. वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते.

उत्तर -

जेव्हा आपण एखादी वस्तू वर फेकतो त्यावेळी त्या वस्तूला पृथ्वीवर कार्य करत असलेले गुरुत्वाकर्षण बल खाली खेचते यामुळे ती वस्तू पुन्हा जमिनीकडे आकर्षित होते.




इ. कॅरम बोर्डवर पावडर टाकतात.

उत्तर - कॅरम बोर्डवर पावडर टाकल्यावर कॅरम बोर्डवरील घर्षण कमी होते. यामुळे सोंगट्याची गती वाढते 


ई. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो.

उत्तर -

रेल्वेस्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग जर खडबडीत नसून गुळगुळीत असेल तर तेथे घर्षण बल राहणार नाही आणि घाईघाईने जाणारे लोक घसरून पडतील. असे होऊ नये आणि लोकांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत करून तेथील घर्षण बल वाढवलेले असते.




६. आमच्यातील वेगळेपणा काय ? 


अ. स्नायू बल व यांत्रिक बल


स्नायू बल


१. स्नायू बल आपल्या स्वतःच्या शरीरात असते.

२. स्नायू बलासाठी आपल्या अन्नातून मिळणारी ऊर्जा वापरली जाते.




यांत्रिक बल


१. यांत्रिक बल यंत्रात असते.

२. यांत्रिक बलासाठी इंधनाची किंवा विदयुत ऊर्जेची आवश्यकता असते.




आ. घर्षण बल व गुरुत्वीय बल



घर्षण बल


१. घर्षण बल दोन भिन्न पृष्ठभागांमध्ये निर्माण होते.

२. घर्षण बल नेहमी सरकणाऱ्या वस्तूच्या विरोधात कार्य करते. गतीच्या

३. घर्षण बल वाढवता किंवा कमी करता येते.





गुरुत्वीय बल


१. गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून निर्माण होऊन पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूवर क्रिया करते.

२. गुरुत्वीय बलामुळे पडणाऱ्या वस्तूच्या गतीत नेहमीच वाढ होत जाते.

३. गुरुत्वीय बल कमी-अधिक करता येत नाही.







७. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ. बल लावून काय काय करता येते ? 

उत्तर -

बल लावून अनेक क्रिया करता येतात. वाहतूक करणे, अवजड सामान उचलणे या कामांत आणि अनेक शास्त्रीय उपकरणे वापरताना बलाचा उपयोग करण्यात येतो.




आ. वजन म्हणजे काय ?

उत्तर -

'वजन' म्हणजे एखादया वस्तूवरील गुरुत्वीय बल होय.




इ. स्नायू बलाने चालणारी यंत्रे कोणती ?

उत्तर -

सायकल, हातगाडी, नांगर, बैलगाडी, होडीची वल्हे, घोडागाडी,पाटा-वरवंटा. 




८. खालील शब्दकोडे सोडवा.


उभे शब्द 


१. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी.... बल लावावे लागते.

२. सांडलेल्या पिना उचलण्यासाठी...... बलाचा उपयोग करता येतो.



आडवे शब्द


३. लोखंडी खिळ्याला स्वतःकडे ओढतो.

४. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरले तेव्हा... बल लावले गेले.

५. ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर बलामुळे पडतात.










Post a Comment

Previous Post Next Post